वरवेली, १० नोव्हें. (वार्ताहर) - सोशल मिडियाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील तेली समाजातील युवा वर्गाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात असून तेली समाज युवासंघ जिल्हा रत्नागिरी या WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तेली समाजातील युवावर्गाला एकत्र आणण्याचा महत्त्वाचे काम करण्यात येत आहे. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या कृपेने व आशीर्वादाने आम्ही तेली चषक २०१८ चे आयोजन सुध्दा या युवा संघाच्यावतीने करण्यात येत आहे. समाजोपयोगी कामे करण्याचा युवावर्गाचा मानस आहे. त्याला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभाग अध्यक्ष सतिश वैरागी, सचिव चंद्रकांत झगडे, रत्नागिरी जिल्हा तेली समाज अध्यक्ष रघुवीर शेलार, गुहागर तालुकाध्यक्ष शशिकांत पवार, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना लांजेकर यांचे तसेच जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी तसेच समाजबांधवांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याकामी संदीप रहाटे (पिंपर), संतोष रहाटे (संगमेश्वर), वैभव रहाटे (वेळंब), सुमित राऊत (हेदवी), प्रदीप महाडिक (खामशेत), नितेश राऊत (रत्नागिरी), प्रितम रहाटे (वेळंब), राजस कदम (रत्नागिरी), प्रथमेश रहाटे (गुहागर), संजय लांजेकर (झोंबडी), दिलीप रहाटे (संगमेश्वर) यांच्यासह शेकडो युवावर्ग समाजातील तरुण-तरुणींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या युवावर्गाच्यावतीने कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम सतत राबविण्यात येणार आहेत. युवावर्गाला नक्कीच तेली समाज बांधवांचा पाठिंबा मिळणार हे मात्र नक्की.