पैठण : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांची गाथा संकलन करणारे तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त तिळवण तेली समाज पैठणच्या वतीने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून दिनांक ३ जानेवारी पासून पद्मपुराण कथेला प्रारंभ झाला असून दि. १० जानेवारी ला शोभायात्रा मिरवणूक व ह.भ.प.रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होणार आहे , तरी श्रीक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या या पुण्यतिथी सोहळ्यास समस्त तेली समाज व संताजी भक्तांनी उपस्थित राहून अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजन समितीच्या वतीने सोमनाथ बद्रीनाथ सर्जे यांनी केले आहे. स्थळ: श्री संताजी महाराज मंदिर , तिळवण तेली धर्मशाळा , श्री क्षेत्र पैठण
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade