गोवा-मडगांव (प्रतिनिधी): अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे राज्याचे रा.कॉ.विधीमंडळ उपनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांची तिसर्यांदा बिनविरोध निवड झाल्याची घोषण मुख्य निवडणुक अधिकारी तथा महासभेचे कार्याध्यक्ष रामलाल गुप्ता यांनी जाहिर केले. राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुक कार्यक्रम विविध राज्यातील सदस्यांचा मागणीवरुन महाराष्ट्राच्या बाहेर गोवा राज्यात मडगांव येथे दि.१७ रोजी घेण्यात आला.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक कार्यक्रम आ.जयदत्त क्षीरसागर व ऍड. आंनदकुमार बिहार यांचे अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज आले. त्यानंतर आ.जयदत्त क्षीरसागर यांना अनेक राज्यातुन पाठींबा मिळत असल्याचे पाहून आंनदकुमार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येत असल्याचे घोषणा केली आणि मुख्य निवडणुक अधिकार्यांनी आ.जयदत्त क्षीरसागर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवडीची घोषणा करताच संपुर्ण हॉल टाळयांच्या कडकडाटाने व घोषणांनी दणाणुन गेला. यावेळी श्रीहरीहरन(भोपाळ) व अर्जुनन (त्रिवेंद्रम)यांनी सहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन कामकाजात मदत केली. यापुर्वी मार्च २००५ मध्ये जालना येथे २३ नोव्हेंबर २००९ मध्ये पुणे येथे आमदार जयदत्त क्षीरसागर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. आता तिसर्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.
यानंतर देशभरातुन आलेल्या प्रत्येक राज्यातील प्रतिनिधीनी राज्यपातळीवरील संघटनेच्या कामकाजाची माहिती देत आ.जयदत्त क्षीरसागरांच्या निवडीला समर्थन देत खंबीरपणे साथ देण्याची ग्वाही दिली. तर प्रत्येक वक्त्याने आता दिल्लीवर स्वारी म्हणुन एक भव्य मेळावा दिल्लीस्थित रामलिला मैदानावर घेण्याचा नूतन अध्यक्षांकडे आग्रह धरला.
यावेळी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महासभेच्या यापुर्वीच्या कार्यकाळात केलेले काम ,बैठका,भेटी याबाबत सांगुन मंत्रीपदाच्या काळात कामाच्या व्यापात अडचणी आल्याचे सांगत आतापर्यत कार्यकारीणीने केलेल्या सहकार्याबददल आभार व्यक्त करुन भावी काळात मोठया जोमाने काम करण्यासाठी सर्वानी सक्रीय व्हावे असे आवाहन करीत दिल्ली येथे मेळावा घेण्यासाठी सहमती दर्शवली.गोवा राज्यातील मडगांव येथील मेट्रोकॉल हॉल महासभेची कार्यकारीणी विविध राज्याची पदाधिकारी महासभेच्या आजीव सदस्यांनी खचाखच भरला होता.तर महिलांचीही उपस्थिती होती.
यावेळी हैद्राबादचे पी.रामकृष्णैया,सी.प्रकाशम,मनिरत्नम चेट्टीयार,त्रिवेंद्रम येथील कुट्टपन,कर्नाटकचे श्री.निवास,पी.रघुनाथन, तामिळनाडुचे जयपाल, ऍड.गालमुरगन पॉडीचेरी, येथुन रामलिंगनम, छत्तीसगड चे सांसद लखनलाल साहू, छत्तीसगडचे कृपाराम साहु, मोतीलाला साहू, विपीन साहू, सियाराम साहू, ममता साहु हेमलता साहू, शंतनू साहु, झारखंडचे दयानंद कश्यप, रिपुसुदन साहु, बिहारचे हिरालाल साहू, आनंदकुमार, अमेंद्रकुमार,कृष्णाप्रसाद, राजस्थान चे टि.सी.चौधरी,शौकिनचंद राठोड, ईश्वरलाल चौधरी, गुजरात चे सुरेश साहु, हिरालाल तेली,एन.टी.राठेड,युपीचे रामलाल गुप्ता, विनोद गुप्ता, कैलाश साहू, ओरियाचे रघुनाथ साहु, एच.के.साहु, गोवाहुन ए.के.तेली, मोहन डिचोलकर ,पश्चिम बंगाल चे रवी गोराई, भगवानदास आर्य, रामअवतार प्रसाद, दिल्ली प्रदेशहुन ईश्वरी प्रसाद, एस.राहुल , महाराष्ट्रातातुन खा.रामदास तडस महाराष्ट्र प्रांतिकचे कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, गजानन शेलार, (कोषाध्यक्ष) प्रा.भुषण कर्डीले (महासचिव) महासभेचे महासचिव डॉ.प्रकाश सेठ (भोपाळ) अतिरिक्त महासचिव डॉ.अरुण भस्मे,कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर,पोपटराव गवळी,विजय चौधरी, जे.यू.मिटकर,बापूराव वाळके,संजय विभुते, जयसिंग दळवी,कल्याणसेठ बरकसे, विजय रत्नपारखी,कचरु वेळंजकर, भरतसेठ कसबेकर, भगवान मिटकर,बाबासाहेब राऊत, लोखंडे, पांडुरंग क्षीरसागर,डॉ.राऊत,रामभाऊ दावलबाजे, ऍड,सुभाष भरदम,राजेंद्र पवार, प्रमोद भांडकर, बबन गोरे, राजेश क्षीरसागर, हरीसेठ क्षीरसागर, देविदास पेंढारे, प्रा.किशोर मचाले, गोविंद सांळुके,देशमाने, एम.ए. राऊत, के.डी.चौधरी. राहुल मसुरे,विलास सोनवणे, कचरुसेठ नवपुते, रवि पवार, एकशिंगे सर, मोहन डिचोलकर,उदयोगपती संभाजी सेठ जाधव,सखाराम मिसाळ, चंद्रकांत पेंढारे, लक्ष्मण राऊत, मनोहरसेठ शिनगारे, व्ही.आर.शिंदे, सतीष साखरे,भगवानराव देशमाने, प्रांतिकच्या महिला अध्यक्षा प्रिया महिंद्रे, महासभेच्या महिला अध्यक्षा ममता साहू, डॉ.पी.एस.सोनु, आर.बी.राऊत, यु.के.भद्रशेट्टी ,प्रा.शिवानंद क्षीरसागर, प्रा.पी.आर.मुळे, सुनिल शिंदे,मधुकर रणखांब,अशोक भिसे,लालजी गुप्ता, राजु मचाले, सुरेश पडवळकर (मा.कोकण स्नेही ) छगन मुळे (मा.स्नेहीजन) प्राचार्य.क्षीरसागर, आदिसह महाराष्ट्र इतर राज्यातील महासभेचे कार्यकारीणी सदस्य व आजीव सदस्य असे ५०० चे वर प्रतिनिधी उपस्थित होते. आ.क्षीरसागर यांच्या बिनविरोध निवडीमुळे देशभरातुन अंभिनदन होत आहे.