बीड.(प्रतिनिधी) आष्टी .जि.बीड येथील भगवान बाबा महाविद्यालयाची विदयार्थीनी कु.लक्ष्मी भारत शेंदूरकर हिने टारगेट बॉल स्पर्धेत भारतीय टीमचे प्रतिनिधीत्व करीत भुतान येथे झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कसब दाखवत देशाला सुवर्णपदक मिळवत बेस्ट प्लेअर ऑफ द वर्ल्ड हा मान मिळवत आपल्या कर्तृत्वाने जिल्हयाचा देशाचाच नव्हे तर समाजाचाही अटकेपार झेंडा फडकवल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
आष्टी येथील समाजबांधव श्री.भारत दशरथ शेंदूरकर हे मजुरी व फिरुन परंपरागत व्यवसाय आजही खेडयापाडयात करीत आहेत. त्यांची कन्या कु. लक्ष्मी शेंदूरकर ही सध्या भगवानबाबा महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षात शिकत असुन खेळाची आवड असल्याने माध्यमिक विद्यालयातच ती हॅन्डबॉल स्पर्धेत विद्यापीठस्तरीय पहिला क्रमांक पटकावला आहे गेल्या काही वर्षात या नव्यानेच आलेल्या टारगेट बॉल खेळातही तिने रुची दाखवत आपले कसब पणाला लावीत नंदूरबार, पंजाब येथे यश संपादन केल्यावर जागतिक पातळीवर खेळण्याची संधी मिळवली. दि. १८ व १९ मे २०१५ रोजी भुतन येथे जागतिक पातळीवर झालेल्या सांघीक स्पर्धेत तिने भारताचे नेतृत्व करीत असतांना पाकिस्तान, भुतान, नेपाळ, बांगलादेश, या देशाबरोबर खेळताना याच खेळात वैयक्तिक कसब दाखवला बेस्ट प्लेअर ऑफ द वर्ल्ड असा जागतिक पातळीवर उत्कृष्ट खेळाडु म्हणुनही सुवर्णपदक मिळविले. ग्रामीण भागात राहुन अत्यंत हालकीच्या परिस्थितीत नवीनच खेळात जागतिक पातळीवर यश संपादन केल्याने तिचे सर्व स्तरातुन कौतुक केले जात आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade