उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून मुलांना प्रेरणा मिळावी यासाठी लग्नानंतर तब्बल चौदा वर्षांनी दांपत्याने बारावाची परीक्षा दिली. विशेष म्हणजे दोघेही उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या मुलांनी पेढा भरवून मम्मी पप्पांचे कैतुक केले.
नीलेश (वय ३४) व शिल्पा शिंदे (वय ३१) अशी त्यांची नावे आहेत. नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर येथे हार्म्स सोसायटीत हे दांपत्य दोेन मुलांसह राहत आहे. नीलेेश म्हणाले, रास्ता पेठेत घाऊक किराणामालाचे दुकान आहे. नववीत असताना माझे व्यवसायात मन रमू लागले. तेथे घरच्या माणसाची गरज होतीच त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. पुढे काही वर्षानंतर लग्न झाले.
शिल्पा म्हणाल्या, घरच्यांनी शिक्षण घेऊन काय उपयोग, लग्नच करायचे आहे, असा हेका धरला. त्यामुळे अकरावीत शिक्षण थांबवले होते. लग्नानंतर संसार, व्यवसाय व मुलांच्या शिक्षणात त्यांचे मन रमत गेले. त्यांचा थोरला मुलगा आदेश आठवीत तर धाकटा यश पाचवीत आहेे. पण एकेदिवशाी नीलेश व शिल्पा यांनी बारावीच्या परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुस्तके आणून मुलांसोबतच आभ्यास केला. परीक्षा दिली व यश मिळाले. नीलेश यांना ४९, तर शिल्पा यांना ५५ टक्के गुण मिळाले आहेत.