श्री. रमेश भोज, सौ. राधिका मखामले, संतोष व्हावळ, कल्पना उनवणे उमेश भोज यांना महाराष्ट्र कामगार सभेच्या वतीने सत्यसेवा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
रमेश भोज हे तिळवण तेली समाज पुणे येथील विश्वस्त असुन महाराष्ट्र प्रांतीक तेली महासभा पुणे विभागाचे कार्याध्यक्ष ही आहेत त्याच बरोबर ओबीसी सेवा संघाचे पुणे जिल्ह्याचे ते अध्यक्षही आहेत. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड च्या माध्यमातुन वधु-वर मेळावे मुलांचा गुणगौरव, मोफत आरोग्य शिबीर, जेष्ठ समाज बांधवांचखा सत्कार अशा आनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना ह्या पुरस्काराने सणमानित करण्यात आले. त्याच बरोबर सौ. राधिका मखामले, यांचेही स्थान समाजात तेवढेच तोलामोलाचे आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा व ओबीसी महासभा पुणे जिल्ह्याच्या त्या महिला अध्यक्षा आहेत. गेली कित्येक वर्षापासुन समाजात काम करण्याचा त्यांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गरीब कष्टकरी महिलाना मोफत साडी वाटप, अनेक बचतगट त्यांच्याकडे आहे. अशाा प्रकारचे महिला संघअन त्यांनी पुणे शहरात फार मोठ्या प्रमाणात केलेले आहे. ओ.बी.सी. चे मेहावे मुंलांचा गुणगौरव, जेष्ठ समाज बांधवांचा सन्मान आशा अनेक प्रकारचेे सामाजीक कामामुळे समाजात ज्यांचे नावं घेतले जाते. संतोष व्हावळ, प्रांतिक तेली महासभा युवा अध्यक्ष पुणे शहरावे ते पदाधिकारी असुन सर्व सामाजीक कामात त्यांचा पुढाकार असुन मोफत शिलाई मशिन वाटपापासुन ते वारकर्यांना अन्नदाना पर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. सर्व कार्यक्रमाचे नियोजन करून तो यशस्वीरीत्या पार पाडण्यात त्यांचा हातखंड आहे. बेरोजगारांना रोजगार मिळवुन देणे हा एकच ध्यास त्यांना लागलेला आसतो.
सौ. कल्पना उनवणे महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा पुणे शहराच्या त्या सचिव असुन ओबीसी महासभा पुणे शहराच्या त्या अध्यक्षाही आहेत. त्याचबरोबर जयभवानी टेक्नीकल इंन्स्टीड्युट च्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. अनेक गरीब होतकरू महिलांना रोजगार निर्माण करूण देण्याच फार मोठे काम ह्या करीत आहेत. रमेश भोेज गेले ३५ वर्षापासुन कोथरूड मध्ये सामाजिक काम ते करीत आहेत रक्तदानासारख्या पवित्र कार्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे. कोणाला रक्ताची गरज लागली की रमेश भोजांची आठवण झाल्या शिावाय रहाणार नाही. आशा प्रकारचे वरील सर्वाना सत्यसेवा पुरस्काराने दि. ७/६/२०१५ रोजी महाराष्ट्र कामगार सभा व तीच्या सलंग्न संघटनेचा २१ वा वर्धापन दिन पुणयात सह्याद्री भवन टिहक रोड येथे आनेक मान्यवारांच्या उपस्थीतीत पार पाडण्यात आला या प्रसंगी विविध क्षेत्रात योगदान देणार्या व्यक्तींचा पुरस्कार देवुन सान्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक गरिबांचे कैवारी कामगार नेते ऍड. नाना क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्या आले. प्रसिद्ध उद्योगपती डि एस कुलकर्णी यांनाही अन्नदाता पुरस्कार घोषीत करण्यात आला. असंघईत कामगारांचे संघअन करून त्यांना न्याय देण्याचे काम नानांनी फार वर्षापासुन चालु ठेवलेले आहे. आतापर्यंत कामगार सभेच्या अनेक लहान मोठ्या संस्था नानांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत कै. खा. गोविंदराव आदिक यांच्या मार्गदर्शनामुळे घडलेले नानांनी कार्यक्रमाच्या अगोदर त्यांना श्रद्धांजली वाहुन कार्यक्रम थोडक्यात आवरता घेतला. वरील सर्व सत्कार मुर्तीचे हार्दिक अभिनंदन