श्री. पोपटराव गवळी, अध्यक्ष प. महाराष्ट्र :- प्रा. भुषण कर्डीले यांच्या विषयी माझे काही मतभेद असले तरी मी त्यांच्या या भाषणाचा समर्थक आहे. आपण ही राजकारण न करता या परिवर्तनाच्या प्रवाहात सामील व्हा.
श्री. जयसिंगराव दळवी :- उपाध्यक्ष प. महाराष्ट्र - प्रसिद्धी झालेले वक्तव्य सत्य आहे. कोयना नगर येथेच वातावरण तापू पहात होते परंतु मी माझ्या पातळीवर समाजाला शांत केले.
श्री. अनिल भोज अध्यक्ष समस्त तेली समाज संघ सातारा जिल्हा :- प. महाराष्ट्रातील पदाचे हौशी जे आहेत ते समर्थक म्हणुन उभे आहेत. मी व माझी संघटना त्याच वेळी कोयना नगर येथे विरोधात गेलो आम्ही पोटशाखा विसरणारे आहोत. पण कुणाला हिन लिखु नयेे.
श्री. दिलीप शिंदे, प्रसिद्धी प्रमुख पुणे विभाग :- भाषणाचा आशय हा पोटशाखा विसरावे असा आहे. कोणत्या एका शाखेला जबाबदार धरता येणार नाही. आपण सर्वच पोटशाखा विसरून समाज एक संघ करूया.
श्री. चंद्रकांत व्हावळ, अध्यक्ष प. पुणे जिल्हा :- तेली आपण एक आहोत आपल्यात एैक्य निर्माण करताना भेद नसावेत. आशा भेदातून संधटनेच्या तळातील कार्यकर्ते काम करताना अडचनी येतात.
श्री. रामदास धोत्रे, मा. अध्यक्ष तिळवण तेली समाज पुणे :- मी व तिळवण तेली समाज पुणे या वरील शब्दाचा जाहीर निषेध करतो. कारण आमच्या संस्थेच्या माध्यमातुन पुण्यात जी शेकडो पोट जाती अंतर्गत लग्न झालीत. तेथे तिळवण तेली व इतर शाखा हा भेद झाला नाही. आम्ही ही कृतीतुन परिवर्तन केले. व करतोय म्हणुन इतर कोणत्याही शाखेला टारगेट करणे हे समाज एैक्याला सुरूंग लावणारे आहे.
श्री. अशोक सकपाळ, सचिव तेली महासभा सांगली :- यातुन भेद वाढविण्याचे काम काही पडद्या मागून करतात, लिंगायत तेली समाजा विषयी असे उदगार काढले असते तर समाज पातळीवर तिव्र प्रतिक्रीया उमटल्या आसत्या.