जीवनाच्या जडघडणीत आपल्याला प्रसंगारूप अनेक व्यक्ती भेटतात. काही व्यक्ती आपला आयुष्यात ठसा उमटून ठेवतात. ललाटी सैज्यन्याचा आणि विनम्रचा आलेख घेऊनच अशी माणसं जन्म घेतात. अंगात कतु्रत्व असते, मनात दातृत्व असते, काळजात प्रचंड समाजाबाबत माया घेवून जगणारी अशी माणसं ही भेटतात. अशा व्यक्तींपैकी एक थोर विभुती म्हणजे सर्वांचे आवडते समाजभुषण कै. हरिश्चंद्र कृष्णाजी वैरागी हे होय !
कै. हरिश्चंद्र कृष्णाजी वैरागी हे यांचा जन्म पेण, जि. रागयड येथे झाला. संत संताजींचे पहिले भाष्याकार व संताजी चिरत्र लिहिणारे कै. कृष्णकांत वैरागी यांचे चिरंजीव होय. श्री. भालचंद्र वैरागी ज्यांनी 1948 मध्ये संताजीवर समग्र चरित्र लिहीले व ते नामनिर्देष व आंधारात राहिले व पेणचे जेष्ठ पत्रकार श्री. दशरथ वैरागी यांचे लहान बंधु होते. लहापणापासुनत्यांना बासरी वदन, नाटकात भाग घेणे, जादुचे प्रयोग करणे व सर्वांना पाहण्यास शिकविण्याचा छंद त्यांना होता. समाजात कै. हरिशचंद्र वैरागी यांना बापू वैरागी म्हणुन ओळखत होेते. सुंदूबरे संस्थे मध्ये ते गेली 15-20 र्वे शिक्षण समिती चिटणीस म्हणुन काम पहात होते. त्यांच्या शिक्षण समतीचा व्यवहारामध्ये पारर्शकता होती व त्यांना शिक्षणाची महत्वाची जाणीव असल्यामळे ते जास्ती जासत गोर गरीब मुलापर्यंत पोहचण्याची पराकाष्टा घेत असत. कित्येक वेळा ते खेड्या गावात गाडीची वाट न पहता सायकलवर प्रवास करीत असत. तेली साजावर अफाट निष्ठा होती. सुदूुंबरे येथे नियमीत जात असे त्यावेळी निवार्याची सोय नव्हती. थंडी-वार्यात त सुुंदूबरे येथे रूममध्ये आठ-आठ दिवस राहत असे. सामंजस्यपणे आपली आभ्यास पूर्ण मत माडत असत यातुन समाजाला दिशा मिळत होती. नुसती संताजी पुण्यतिथी न करता समाजाला काही ती देणे लागते ही त्यांची भुमिका समाजाला दिशा देणारी होती. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांंना शिक्षण मदत किंवा दत्तक घेणे ही प्रणाली राबवण्यात कै. बापू वैरागी हे अग्रसर होते. शिक्षण समितीद्वारे गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत मिळावी म्हणून ते महाराष्ट्रात दौरे करीत. समाजाचे काम करीत असताना अवेळी जेवण, जागरण व प्रवासामुळे त्यांना पोटदुखीचा असर सुरू झाला. परंतु त्यांनी स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्षकरत समाजसेवा करीत राहिले. आयुष्य जगतांना दुसर्यासाठी (समाजासाठी) झिजत असताना ते स्वत:चे जीवन कृतार्थ समजत होते. ते व्यासंगी, ध्येयवादी, नीतीमान व नोकरीवर निष्ठा ठेवुन वागले. कै. बापू वैरागी यांची मधुर भाषा, नम्रता व विनोद स्वभाव यातुन निधी संकलनास चालना मिळाली. त्यांना सहली व फोटेाग्राफीची खुपच आवड असे. ते दर वर्षी फक्त समाजातील 40-50 लोकांना धार्मिक स्थळी दर्शनासाठी कित्येक वर्षे नेत होते. त्यांची सहल म्हणजे ना-नफा, ना तोटा या तत्वावर करीत असते म्हणजे गरिबाची सहल म्हणत असत. समाजातील गरीब लोकांना धार्मिक स्थळी दर्शन व्हावे हीच त्याची इच्छा असे. त्याच प्रमाणे ह्या वर्षी समाजातील ठाणे, मंबई, पुणे, रायगड, भागातील 27 जणांना घेऊन सिमला, मणाली, रोजात पास, नैनना देवी, ज्वाला देवी अशा उंच पर्वताच्या स्थळी गेले होते. त्या पर्वतावरून उतरल्या बरोबर त्यांची जीवन यात्रा संपुष्टात येऊ लागली. त्यांना किडनीच्या विकाराने त्याना साथ दिली नाही. अश परिस्थितीतते समजाच्या लोकांना - मला काहीच होत नाही म्णहून धीर देत होते. कै. बापू वैरागी हे यांना किती तरी आतुन दु:ख व यातना असल्या तरी ते कोणाला दाखवत नसे. सतत हसरा चेहरा व सकरात्मक विचार त्यांचे असयचे. अशा प्रकारे 10 जुन ते 21 जुन पर्यंतसमाजाबरोबर सहली प्रवास करून आल्यावर घरी न येता ठाणे भायखळा हास्पिटल मध्ये उपचार घेत होते.
सरते शेवटी नियतीच्या पुढे जाता येत नाही त्याप्रमाणे कै. बापू वैरागी यांची दिनांक 9/7/2016 रोजी देहवासन झाले. त्यांच्या समाजाच्य थोर कार्याबद्दल समाज जनही नांव काढते. कै. बापू वैरागी हे प्रेम व विश्वास साठवण ठेऊन वाटचाल करताना समाज निष्ठा, समाज प्रेम, समाजास त्याग, समाज सेवा ही कै. बाप वैरागी यांची गंगाजली व धुरा त्यांचे पुतणे महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महाराष्ट्राचे कोकण अध्यक्ष श्री. सतीष भालचद्र वैरागी यांच्यावर सोपविली आहे. कै. बापू वैरागी हे समाजाला सोडून गेले तरी समाजाचे दीपस्तंभ आहे.