हे लेखन करण्यापुर्वी दोन तास अगोदर श्री. अनिल धोंडीबा राऊत यांच्याशी संताजी पालखी सोहळ्या विषयी बोलणे झाले. तेंव्हाचा एक प्रसंग प्रथम मांडतो पुणे जिल्ह्यातील एक खेडे गाव गावात समाजाची ८० ते ९० घरे. गावचा पाटील व सरपंच हा समाजाचा आरक्षणा पुर्वीची ही हीच आपल्या १० ते १५ वर्षात समाजाने एैक्याच्या बळावर प्रगती केली. परंतु प्रगती तशी आली तशी ही प्रगती मराठा समाजाला बोचु लागली. आज काय अवस्था असावी तर आम्ही आमचे वैरी झालो. या वैर पणात आपली हुकमत दान करून मिळालेला तुकडा मिळलेले पद दुसर्याच्या वळचनीला कुरवाळत बसलो हे उदाहरण या साठी दिले की आज आपण जागे झालोत या जागे पणातून माझा पैसा, माझी सत्ता, माझी बुद्धीमत्ता याचे मातणे म्हणजे समाजकार्य झाले आहे. यातून उतणे व त्यानंतर समाजासह आपली ही माती आपण करीत आहोत. या विषयी मांडणी करतो.
ब्राह्मणशाही म्हणजे काय हे मांडताना सांगावे लागते. आम्ही देव निर्माण करतो. देव निर्माण करतो म्हणुन आम्ही देवाचे बाप आहोत म्हणुन काही भागात आजही ब्राह्मणाला देवबप्पा म्हंटले जाते. तर हे देवाचे बाप सांगतील तो धर्म ते बोलतिल ते सत्य, ते सांगतील ते धर्मशास्त्र, ते म्हणतील ती राज्य सत्ता मग ती हिंदूंची असो किंवा मुसलीमांची ब्राम्हण्य म्हणजे दडपशाही. आसली दडपशाही अतिरेकीपणा, जुलमी पणा, ज्यांच्या जीवावर मोठे पण मिळवतो त्यांना झुंजवत, खेळवत त्यांचे मातणे करणे म्हणजे ब्राह्मण पणा. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून यांना शब्दांची शस्त्र करून लोळवळले. अगदी दंडेलशाही मातलेली भाषा, उतलेली करणी गुरूर पणा चव्हाट्यावर आणला. म्हणुन आरोपीच न्यायाधिश बनला. या आरोपी न्यायाधीशाने संत तुकारामांना शिक्षा सुनावली या शिक्षेतुन अभंग नष्ट करणे, बहिष्कृत होणे मालमत्ता जप्त होणे घडले. ब्राह्मणी दहशत, ब्राह्मणी मातणे पणा ब्राह्मणी उतणे पणा, ब्राह्मणीगुंडशाही धुळीत मिळवण्याचे काम संत संताजींनी केले. धर्मशास्त्राला पायदळी तुडवले आणी ज्या वाटा अंधारल्या होत्या चकचकीत उजळुन टाकल्या पण सत्य सांगीतले म्हणून जसे सख्या आईला ही राग येतो. का तर तीच आपल्या मुलावर प्रेम आसते. हे प्रेम आंधळे आसते जर ती माता डोळस प्रेमाने पाहू लागली तरच तिला चुका दिसतात आणि ह्या चुका तीला दिसल्या तर तीच मुलाचे भविष्य घडवू शकते. ही वेळ आज आली आहे.
सन १९२० च्या दरम्यान रावसाहेब केदारी हे आर्थिक बाबत अतिशय बलवान पैसा प्रतिष्ठा घरात पाणी भरत होते. परंतु संताजी सुर्य मिळताच त्यांनी आपली प्रतिष्ठा आपली संपत्ती संताजींच्या साठी खर्च केली. कारण त्यांच्या समोर ब्राह्मणशाही खंबीर उभी होती तर सोबतीला दडपलेला समाज त्यांनी खरा शत्रु ओळखुन समाजाला संघटीत करून त्यांनी वाटा उजाळल्या. त्या उजळलेल्या वाटेवर आपण वाटसरू म्हणून चालत आहोत. शक्यतो रस्ता दुरूस्त करुन मोठा करावयाचा आहे. वाड्या वस्त्यावर तो घेऊन जायच आहे. हे टपरी वजा दुकान चालवणारे, बाजारहाट करणारे रोजंदारीवर काम करणारे, कंत्राटी काम करणारे बांधव फार तर श्रमदान करतील पण ते पैसा पुरवू शकणार नाहीत ते विरोधका समोर रोजचा जगण्यासाठी कच खातील सत्य समजून पेडगावला जातील. भाकरीचा सुर्य हा सर्वात मोठा आसतो तो त्याला मिळवायचा आसतो परंतू प्रतिष्ठीत व्यपारी उद्योजक, उच्च पगारवाले यांचे तसे नसते. त्यांच्या पैशावर त्यांच्या त्यागावर समाज उभा रहातो. विरोधक एक तर थांबले किंवा चार पाऊले मागे ही जावू शकेल ते रावसाहेब केदारींनी सिद्ध केले आहे. परंतु आज तसे होत नाही. मी जे मांडतोय त्याला आपवाद आहे. पण आपवादाचे प्रमाण फार कमी आपल्या पैशावर संस्था ताब्यात ठेवणे, संघटना मुठीत ठेवणे. या बळावर इतर लाभ उठवने. समाजाच्या पदरात काय तर मोठा भोपळा. या भोपळ्या विषयी साधा विरोध ही या मंडळींना सहन होत नाही. आसा विरोध मोडून काढण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जातात. एक संस्थेतील आशाच धनशक्ती विरोधात एका जेष्ठ बांधवाने आवाज उठवला. हा आवाज दडपण्यासाठी काय करावे तर मारेकरी त्या जेष्ठ बांधवाच्या घरात पोहचले. आणि जेष्ठाचा आवाज हळू केला. ज्याच्याकडे संघटनेचे पद. हे पद मिळताच त्याने पैसा ओतून प्रतिष्ठा मिळवली खिशातले पहिले गुंतवावे. गुंतवलेले अन्य मार्गाने कदाचित त्या पेक्षा जास्त खिशाात गोळा करावेत. हा मार्ग निवडला जातो. सामान्य माणूस या भपंकपणाला, सामान्य माणुस भाषणाला, सामान्य माणुस भव्यदिव्य पणाला गोंजारत वाट चालत असतो. आणि हाच समाज एकाकी जेंव्हा होतो तेंव्हा तो दूर गेलेला आसतो. शेवट काय तर पैसेवाल्यांचे उतणे व मातणे दोघांचे ही मातेर करीत आसतो. (भाग 2 पहा .... )