मराठावादी कॉंग्रेसच्या शारद पवारांच्या पायावर डोके ठेऊन समाजाचा विकास करण्यासाठी आपल्या पैशाने लाखो बांधवांच्या साक्षीने मेळावे घेतले. पवारांनी फक्त मत घेतली भुजबळांनी ओबीसी सांगत माळी समाजाचा नव्हे तर स्वत:चा विकास केला. पवरांनी मराठा - कुणबी ही अस्तीत्वात नसलेली नवी जात जन्माला घालुन आपले अधीकारच हिसकावुन घेतले. आपल्या पुढार्यांनी दोन हात केले नाहीत. उलट पुढार्यांच्या कळपातील एका म्होरक्याने मला सुनावले देशमानेे आता ओबीसीत दम नाही. या बाबत नगर जिल्हा महाराष्ट्र तेेली महासभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ डोळसे म्हणाले समाजात भांडणे खेळणार्या समाजाच्या पुढार्यांना घरा शेजारचा मराठा नुसता दिसला तरी बाजुला सरतात. त्याने हक्क हिसकावले. राजकारणात डोके वर काढू देत नाहीत हिंम्मत असेल तर यांच्याशी दोन हात करा. हे सर्व का मांडायचे मराठ्यांच्या दादागीरीला उत्तर सापडत नव्हते. या उत्तराच्या शोधात समाजाची पुढारी गर्तेत होते. लोकसभेचे बिगुल वाजताच गुजराथ मधुन सोमुभाऊ व त्यांच्या सह टोळक महाराष्ट्रात आले. आणि आमच्या अंगात बारा बैलांचे बळ आले. मोदी तेली म्हणुन भाजपाला मत. याच वेळी महाराष्ट्र तेली महासभेचे अध्यक्ष श्री.रामदास तडस यांना ना. गडकरी यांनी पकडले आणि खासदारकीला उभे केले विदर्भातील आठही मतदार संघात संदेश गेला किमान प्रत्येक मतदार संघात २० ते ४० टक्के मतदार असलेला समाज बांधव भाजपाला मत देऊन बसला. गडकरीं या कुटील डावात यशस्वी झाले. आज पर्यंत हाती भोपळा देऊन कॉंग्रेसने हेच केले होते. गडकरींनी तेच केले. फरक कॉंग्रेस मराठ्यांची होती. भाजपा ब्राह्मणांचा आहे. कॉंग्रेसच्या काळात परराज्यातील मंडळी तेली मतावर निवडूण येत उदा. नरसिंहराव , गुलाबनवी अझाद यांनी दिला मोठा भोपळा. या वेळच्या विधानसभेसाठी ३६ मतदार संघात फक्त ४ उमेदवार भाजपा देतो फक्त ३ विजयी होतात. याच दरम्यान महाराष्ट्र तेली महासभेचे पदाधिकारी निवडणूकीचे फड गाजवतात सांगत मोदी तेली म्हणून भाजपाला मत. तिकीट वाटपात गुजराथ मधले सोमु भाई का आले नाहीत. तेली समाजाला अधीक उमेदवार का देऊ शकले नाहीत खरा इथे प्रश्न आहे.