श्री. संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदुंबरे यांचे वतीने व तिळवण समाज चाकण यांच्या सहकार्याने दिनांक २४/०५/२०१५ रोजी चाकण येथे १० वी, १२ वी व पदवीनंतर काय ? या बाबत मोफत विद्यार्थ्यांसाठी शिबीर आयोजित केले होते.
उपरोक्त शिबिरासाठी चाकण/खेड परिसरातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा. श्री. प्रशांत सोनवणे - तज्ञ मार्गदर्शक व मा. श्री. दिलीप फलटणकर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. जनार्दन जगनाडे, कार्याध्यक्ष श्री. विजय रत्नपारखी, खजिनदार श्री. राजेंद्र घााटकर, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत वाव्हळ, शिक्षण समितीवे चिटणीस श्री. बाळासाहेब शेजार, मुख्य चिटणीस, श्री. रामचंद्र रायरीकर, श्री. गोपाळशेठ जगनाडे, श्री. सुभाष शिंदे, श्री. रविकांत खळदकर, श्री. जिवन केदारी , श्री. हनुमंत काळे, श्री. संजय जगनाडे, श्री. सुरेश जगनाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, श्री. नितीन जगनाडे यांनी केले. आभार श्री. संजय शेजवळ यांनी मानले.