वैरागड : समाजाची सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रगती करायची असेल तर तर तेली समाजाने पोटजातीचे जोखड तोडून हुंडा देणे व घेण्यासारखी कुप्रथा कालबाह्य करावी, तेव्हाच समाजाचा विकास शक्य आहे, असा सूर मान्यवरांनी काढला. येथील संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याचे उद्घाटन बबनराव फंड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, माजी प्राचार्य पी. आर. आकरे, पं.स. सदस्य विनोद बावनकर, फाल्गुण मेहरे, प्रभाकर वासेकर, विलास भांडेकर, उपसरपंच श्रीराम अहीरकर, केशव गेडाम, पूनम गुरुनुले, शंकरराव बावनकर, गोरखनाथ भानारकर, विजय गुरुनुले, डोनूजी कांबळे, मुनेश्वर मडावी, अतुल मेश्राम, नलिनी सहारे, सुभाष बरडे, महादेव दुमाने, मुख्याध्यापक बोबाटे, श्रावण नागोसे, पी.एस. खोब्रागडे, मुरलीधर शेंदरे, लीलाधर उपरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमारंभी तेली समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच वर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला.
प्रास्ताविक भास्कर बोडणे यांनी केले. संचालन नेताजी बोडणे तर आभार प्रदीप बोडणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी घनश्याम लांजेवार, पांडुरंग बावनकर, रमेश लांजेवार, सचिन ढंगरे, राजेश बावनकर, गंगाधर बोधनकर, रमेश बोडणे, कैलश मेहरे, गायत्री आकरे, मंदा बोधनकर, उषा बोडणे, दिक्षा लांजेवार, इंदूबाई खोब्रागडे, कल्पना बोडणे, कल्पना आकरे, लिला क्षिरसागर, वंदना खोब्रागडे, पीतांबर लांजेवार, मुखरू खोब्रागडे, सुरेंद्र बावनकर, आकाश सोमनकर, गंगाधर लांजेवार, अशोक लांजेवार, प्रकाश आकरे आदींसह समाजबांधवांनी सहकार्य केले.