संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती
संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी व चामोर्शी तेली समाजा च्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम दिनांक ०८ डिसेंबर २०१८ (शनिवार) दुपारी १.०० वाजता स्थळ : बाजार चौक, नगरपंचायत, चामोर्शी कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष मा.संजय येरणे प्रसिद्ध साहित्यिक तथा संताजी जगनाडे एक योद्धा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, प्रमुख वक्ते मान. दिलीप तेली प्रसिध्द विचारवंत, जळगांव, किर्तनकार मान. तुषार सुर्यवंशी, सप्तखंजेरी वादक, नागपुर (सत्यपाल महाराज यांचे शिष्य)
महाराष्ट्राला संत परंपरेचा एक मोठा इतिहास आहे. या संतानी सुद्धा तत्कालीन अनिष्ठ रूढी, परंपरा व अंधश्रद्धेवर फार मोठे कोरडे ओढले आणि समाजाला त्यातुन बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रूजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.पंरतु समाजाला कायम अंद्धश्रद्धेत ठेऊ इच्छिणाच्या प्रस्थापित वर्गाला हे खटकाणारे असल्याने त्यांनी संताचा सुद्धा फार मोठा छळ केला.
"नवसे कन्या पुत्र होती। तरी का करणे लागे पती ।।'' असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन रुजविणा-याला संत तुकारामाच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवून त्याचा खुन केला आणि ते सदेह वैकुंठाल गेले अशी कंडी पिकवली. त्यांचे शिष्य संत संताजी जगनाडे महाराजांना याचे अतिव दुःख झाले. म्हणुन ज्यांनी गावोगाव फिरून संत तुकाराम महाराजांचे मुखोद्गत अंभग लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. परंतु अजुनही समाज त्या जुन्या अनिष्ठ, रूढी, परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखडातुन मुक्त झालेला दिसत नाही. याउलट समाज जितका अधिक उच्च शिक्षित होत आहे, त्या प्रमाणात तो अधिक अंधश्रद्धाळु होतांना दिसत आहे.
प्रिय बंधुजनहो,०८ डिसेंबर १६२४ हा संत जगनाडे महाराजांचा जन्मदिन आहे.त्यादृष्टीने त्याचे परिवर्तनवादी विचार, समाजात रूजावे, जनतेत वैचारीक परिवर्तन व्हावे, असे वाटते, कारण विचारांचा प्रभाव परिवर्तनवादी असेल तर कौटुंबीक जीवन प्रगतीपथावर जाईल. विचारात घडलेला बदल सवयी बदलतो, सवयीतुन व्यक्ती घडते व समर्थ लोकशाही राष्ट्र बनवायचे असेल तर परिवर्तनासाठी महापुरूषांना अभ्यासुन व वास्तव स्विकारून पुढे जावे लागेल. म्हणुन संत जगनाडे महाराज यांचा जन्मदिनाचे औचित्य साधून समाज प्रबोधन व किर्तन कार्यक्रम आयेजित करण्यात आलेला आहे. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लेखक संताजी महाराज, यमुना, मेघनाद सहा, ताई तेलीन, यांचा कथाविचार संजय येरने आयोजक : संताजी स्नेही मंडळ, चामोर्शी ता.चामोर्शी जि.गडचिरोली