सालाबाद प्रमाणे याही वर्षी चाळीसगाव तेली समाजातर्फे श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा मूर्ती पूजन दिनांक 10-12-2017 रोजी रविवारी सकाळी आठ वाजता ठिकाण श्री संताजी मंदिर तेली गल्ली तेरी बहन चाळीसगाव कीर्तन सप्ताह दिनांक 10-12-2017 ते 17-12-2017 वेळ रात्री 9 ते 11 तर महाप्रसाद दिनांक 17-12-2017 रविवार रोजी सकाळी 11 ते तीन वाजेपर्यंत होईल. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दिनांक 17 12 2017 रोजी दुपारी चार वाजल्यापासून चौधरी केबल नेटवर्क रोड तेली गल्ली पासून सुरुवात होईल. तरी सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चाळीसगाव तेली समाजातर्फे करण्यात आले आहे.