कोल्हापूर लिंगायत तेली समाज को ट्रस्ट व बसवेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य व्यापी लिंगायत तेली समाज कोल्हापूर वधू-वर पालक परिचय मेळावा केशवराव भोसले या भव्य नाट्यगृहात आयोजित केला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास उत्कर्ष प्रगती त्याची व हाच खरा धर्माचा हेतू अल्प वेळात कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उपयुक्त हात या मेळाव्याचा उद्देश सर्वांनी एकत्र यावे एकमेकांना भेटावे आढावा तो वृद्धिंगत व्हावा नवीन नाती निर्माण व्हावी हा ध्यास या उदात्त हेतुने हा मेळावा साकार होत आहे. सर्व इच्छुक वधूवरांना व पालकांना वेळेत उपस्थित राहून आपल्या वधु-वर पालक परिचय मेळावा यशस्वी करावा अशी विनंती लिंगायत तेली समाज कोल्हापूर यांच्याकडून करण्यात आलेली आहे.
रविवार दिनांक 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी आठ ते पाच पर्यंत कार्यक्रम स्थळ केशवराव भोसले नाट्यगृह खासबाग मैदान कोल्हापूर इथे लिंगायत तेली समाज कोल्हापूर वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे स्वरूप सकाळी 8 पासून वधू-वर नाव नोंदणी, कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी अकरा ते एक, भोजन समारंभ दुपारी एक ते दोन, वधू-वर परिचय दुपारी दोन ते पाच पर्यंत राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सुनील गाताडे अध्यक्ष कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाज, आर्किटेक इंजिनिअर डेव्हलपर्स अँड बिल्डर्स कोल्हापूर, प्रमुख मान्यवर उद्घाटक प्रकाश तेली, प्रगतिशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख मान्यवर पाहुणे बाळासो सिद्धाप्पा साध्याण्णावर सामाजिक कार्यकर्ते, युवराज दिनकर तेली सामाजिक कार्यकर्ते, तर प्रमुख उपस्थिती श्रीकांत दत्तात्रेय वनछोडे, उपाध्यक्ष श्री जगद्गुरु पंचाचार्य एज्युकेशन सोसायटी, श्री दत्तात्रेय भिमराव तारळेकर, अध्यक्ष लिंगायत तेली समाज कराड तालुका दक्षिण , पंडितराव गणपती विभुते, अध्यक्ष व्यापारी संघटना मलकापूर, राहुलकुमार विठ्ठल खडके, संचालक आर के. कुरियर अकॅडमी मर्चंट नेव्ही कराड, एडवोकेट अमित वाडकर, कोल्हापूर, प्रमोद मदन देशमाने, जिल्हाध्यक्ष लिंगायत तेली समाज सेवा संघ, सातारा जिल्हा व उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग, नंदकुमार फल्ले, दुग्धजन्य पदार्थ उत्पादक गणेश वाडी, सुनिल वसंतराव फल्ले, सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती इस्लामपूर, शिवाजीराव बाळाप्पा पाटणे, सौ. उमा शिवानंद वनछोडे, विद्यमान नगरसेविका कोल्हापूर मनपा कोल्हापूर, श्रीमती नलिनी महादेव बनछोडे, सामाजिक कार्यकर्त्या कोल्हापूर, डॉक्टर रवींद्र तेली, प्रभारी प्राचार्य युवराज कॉलेज गडहिंग्लज, चंद्रकांत आनंदराव वाडगावकर, माधुरी बेकरी कोल्हापूर, इत्यादी प्रमुख उपस्थिती असेल. तरी लिंगायत तेली समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करण्यात आलेली आहे.