तारकेश्वर भैरव प्रतिष्ठान आयोजित गुरुदेव संत नारायण बाबा तारकेश्वर गड यांच्या प्रेरणेने सुरू झालेला व सतत 29 वर्ष अव्याहतपणे चालू असलेला संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा मार्गशीर्ष कृष्ण 13 शके 1940 गुरुवार दिनांक 3-1-2019 रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भव्य मिरवणूक संत पूजन तसेच ध्वजारोहण ह भ प संतोष महाराज शास्त्री भगवानगड व पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प महंत परम पूज्य गुरुदेव आदिनाथ महाराज शास्त्री जी तारकेश्वर गड यांचे हरिकीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे भव्य पंगत होईल. याप्रसंगी समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव संत ह.भ.प आदिनाथ महाराज शास्त्री तारकेश्वर गड असतील. कार्यक्रमाचे स्थळ हनुमान मंदिर प्रांगण लोहसर ( खांडगाव), तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आहे. तरी सर्व तेली समाज बांधव व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade