दापोली - व्यासपिठावर समाजाचे समाज भुषण व तेली समाज सेवकचे संपादक श्री वसंतराव कर्डीले, महाराष्ट्र प्रांतीक महासचिव श्री. डॉ. भुषण कर्डीले, महाराष्ट्र प्रांतीक तैलीक कोकण विभागाचे अध्यक्ष श्री. सतीश वैरागी, श्री. गणेश धोत्रे (कार्याध्यक्ष). श्री. गजानन शेलार, पनवेलश्री गणेश कटके व स्नेहसंमेलन अध्यक्ष, श्री. रमाकांत रहाटे उपस्थित होते.
स्नेहसंमेलन विद्यार्थी यांना क्रिडा, परीक्षेत क्षेत्रांत यश मिळविणार्यांना बक्षीस देण्यात आले. प्रथम श्री. संदीप महाडीक यांनी प्रस्तावना समाजाबाबत केलेले कार्याबाबत सांगितले.
श्री. वसंराव कर्डीले यांनी भामा शाहा, डॉ. मेघानंद सहा, श्रीकृष्णाची सेवा करणारी मॉ. कर्मा असे समाजातील थोर व्यक्तीचे महत्व सांगितले.
श्री. सतीश वैरागी यांनी डॉ. भुषण कर्डीले व श्री. वसंतराव कर्डीले या व्यासपिठावर उपस्थित रहातत हे आपले भाग्य आहे. डॉ. वसंतराव कर्डीलेयांचे आर्थिक व योगदान थोर आहे. ते तेली समाज सेवक मध्ये संपादक लेखा मार्फत समाज जागृती करीत असतात त्यांचे वय होऊन त्यांना समजाच्या कार्यक्रमामध्ये जाण्यात आवडते. डॉ. भुषण कर्डीले हे महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेर झंझांवतीदौरे करीत असतात. श्र. वसंतराव कर्डीले यांचे थोर उपकार आहे की समाजाचे भुषण समजलेले डॉ. भुषण कर्डीले, हे पुत्र समाजाला दिल आहे.
डॉ. भुषण कर्डले यांनी महाराष्ट्र प्रातीक तैलीक महासभेचे महत्त्व समजावुन सांगतिले, समाज संघटीत व्हा व संघर्ष करा हे डॉ. आंबडकर चे ब्रीद वाक्याची आठवण करुन दिली. आपण सुर्व युवा पिढी एकत्र येवून समाजावर अन्याय हा न्या मिळवुन देण जरूरी आहे. कै. केशरकाकु ते आतपर्यंत समाजच्या घडामोडी बाबत आढावा सांगितला व जनगनणा करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपले समाजात किती डॉक्टर, इंजीनीअर, व्यपाारी, शेतकरी यांचे आडकेमोडचा अभ्यास होईल व यावरून चित्र बदलण्यास मदत होईल.
श्री. अरूण इंगवले यांनी आपल्या भाषणात कै. कृष्णाजी नारयण वैरागी यांनी यंताजी जगनाडे यांचे चरित्र पुस्तक बाबत उल्लेख केला. तसेच श्री. वसंत कर्डीले यांनी समाजासाठी 51 लाख रूपयेचे योगदान केल्याबाबत मंडळातर्फे आभार मानले. डॉ. भुषण कर्डीलेच वक्तृत्व बाबत खुपच कौतुक केले. त्यांच्या भाषाणामुळे समाजाच संघटना होत आहे.
श्री. संदीप महाडीक यांनी आभार प्रदर्शन केले. सभेचे वैशिष्ट म्हणजे रात्रीचे 11.30 ते 12.00 वजले तरी समाज जागेवरुन हटला नाही.