माधवराव अंबिके, माजी अध्यक्ष पालखी सोहळा
कै. दादासाहेब भगत (पुणे), कै. धोंडीबा राऊत (इंदुरी) आणि शरद देशमाने व श्री. माधवराव अंबिके आम्ही सर्व मंडळी ८२ भवानी पेठ, तिळवण तेली समाज कार्यालय येथे विचार विनीमयासाठी बसलो असताना संताजी महाराजांची पालखी सुरू करावी का ? असा विचार पुढे आला.
संत संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांचे मित्र होते. ते सर्व अभंग लिघीत सवरूपात जतन करीत. अश्या या जगनाडे महाराजांची पालखी असावी अशी संकल्पना रूजली. आणि त्यासाठीची घडामोड चालू झाली.
ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या बरोबर पालखी सुरू करावी व सन १९७८ साली सर्व समाज बांधवांनी पालखी काढण्याचा मोठा निर्णय घेतला. पालखी काढण्यासाठी लागणारी सामृग्री व माणसांची जमवाजमव सुरू झाली.
आम्ही सर्व मंडळींनी आळंदीचे साखरे महाराज यांच्याशी विचार विनीमय करून आमचा पालखी काढण्याबाबत विचार त्यांच्यापुुढे मांडले. त्यांनी आमचे विचार ऐकून आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले.
तुकाराम महाराजांच्या सोहळा प्रमुखाची भेट घेऊन संताजी महाराज पालखी साठीचा निर्णय त्यांना सांगितला परंतु त्यांनी आमच्या पालखीच्या मागे येऊ नये अशी ताकीदच आम्हाला दिली.
नंतर आम्ही ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखाची भेट घेतली. त्यांनी आम्हाला खुप सहकार्य केले.. त्यांनी त्याबाबतीत लागणार्या गोष्टीची इथंबुत माहिती दिली. शेवटी माऊलींच्या मागे जायचे ठरले. पुढे आमचा कार्यक्रम सुरु झाला. पायी वारीतील सर्व गांवाना आमचे समाजबांधवांनी भेटी दिल्या त्यांच्याकडून आम्ही मुक्कामाचे स्थळे निश्चित केले. बरड गावी आम्ही गेलो तेव्हा अर्जुनशेठ तेली यांनी सर्वातोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. अर्जुनशेठ यांनाच अध्यक्ष करावे असे ठरले.
असेच सहकार्य आम्हाला सर्व गावांच्या समाजबांधवांकडुन मिळाले. सर्वजन आपआपल्या परीने सहकार्य करीत होते. चांदखेडच्या समाजबांधवांनी पालखी दिली.
पालखी सोहळा साहीत्य जमा करण्यासाठी सर्व बांधवांना आवाहन केले.
पुण्यातील बर्फ कारखाना मालकाने बर्षाचा छकडा व एक बैल दिला त्यामुळे पालखी ठेवण्यासाठी छकडा भेटला नंतर टाळ, मृंदुग इतर साहीत्य योगदानातुन मिळाले. एकेक म्हणता म्हणता ३५ जण (मंडळी) वारकरी पालखी सोबत जाण्यासाठी तयार झाले. शरद देशमाने यांनी सर्व आर्थिक मदत केली. दादा भगत यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन जेवणाची व्यवस्था केली. धोंडीबा राऊत यांनी भजन किर्तनाची जबाबादारी उचलील माझ्या कडे म्हणाजे माधवराव अंबिके यांनी सर्व पालखीच्या नियोजनाचे काम घेतले.
गावोगावी मुक्काम करीत अनेक अडीअडचणींवर मात करीत माऊलीच्या मागे ३५ लोकांच्या सहभागांने हा सोहळ्याचा मुक्काम पंढरपुर येथील धर्मशाळेत पार पडला पंढरपुर मध्ये जेव्हा पाडुरंगाच्या दर्शनाने काल्यांच्या दिवशी पालखीचा परतीचा प्रवास चालू झाला. अश्या पद्धतीने पहीला पालखीचा सोहळा रंगला.
पुढील वाटचाल :- सर्व समाज बांधवाच्या सहाय्याने पालखी सोहळ्याच्या पुढील वाटचाल सुरू झाली ६ महिने आधीपासुनच वारीच्या नियोजनाची सुरूूवात झाली. पावसापासुन संरक्षणासाठी तंबु, राहुट्या, जेवनांची भांडी सर्व साहीत्याच्या जुळवा जुळव करण्यासाठी गावोगावी दौरे काढुन समाजबांधवांना विनंती करून साहीत्य जमा करण्यात आले.
बिट्टु शिंदे, आप्पा उबाळे (इंदोरी), फल्ले बंधु (अवसरी), आण्णा मेरूकर (पुणे), ताराचंद देवराय (पुणे) असे सर्व सदस्यांनी मिळून पालखी सोहळ्याची एक समिती स्थापन केली.
समिती स्थापन केल्यानंतर दुसरे वर्षही आनंदाने पार पडले.
तिसर्या वर्षी सदरच्या मंडळींनी पालखीच्या नाव नोंदनी करण्याचे ठरले.
माधवराव बबनराव अंबिके यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय झला.| इतर मंडळींना सभासद (सदस्य) करण्याचे ठरले. त्यानंतर पालखी मंडळाची नोंदणी सुरू झाली. पालखीच्यासाठी पावती पुस्तके छापण्यात आली.
महाराष्ट्रातील समाज बांधवांनी सहाय्यातुन तंबू, टाळ मृदुंग, पेटी, भांडी, सतरंजी इत्यादी साहित्य जमा झाले. पुणे येथील पन्हाळे यांनी सिंहासन पखवाद्याच्या गुढ्या देेणगी स्वरूपात दिले.
५ वर्षांपर्यंत पालखी सोहळा समृद्धा होत गेला. पालखी मध्ये आधी पितळी पादुका होत्या सदाशिव पवार यांनी वर्गणीतुन चांदीच्या पादुका तयार करण्यात याव्या असा प्रस्ताव मांडला आणि सर्व लोकांच्या साहाय्यातुन तो प्रस्ताव अस्तित्वात आणला गेला.
योगदान :-
पुढे पंढरपुर येथील समाजबांधवांनी पालखी तेली धर्मशाळेत उतरवण्यास मनाई केली तेव्हा पंढरपुर येथे बैठक घेऊन जागा घ्यायचे ठरले त्याप्रमाणे कैकाडी महाराज मठाच्या शेजारी कुंभारवाड्याच्या समोर १४ गुंठे ९००० हजार गुंठ्या प्रमाणे १४ गुंठे जागा घ्यायचे ठरवले ५०,००० रू. देऊन साडे खतावर जागा खरेदी केली. महाराष्ट्रात दौरे काढुन वर्गणी जमा केली. आणि सदरची जागा खरेदी करण्यात आली व जागेला कंपाउड तयार करण्यात आलें. ५ व्या वर्षी मोकळ्या जागी पालखी उतरण्याची व्यवस्था करण्यात आली. अवघ्या ३५ लोकांपासुन चालू झालेली पालखी ५ व्या वर्षापर्यंत हजार लोकांपर्यंत पोहचवली सदरच्या लोकांची भोजनाची २ वेळची व्यवस्था करण्यात आली.
आहे ती जागा व्यवस्थित बांधावी असे विचार पुढे आले.
आम्ही सदस्यांनी पुढाकाराने प्रत्येकी खोलीचा खर्च देण्यास तयार झालो. त्याच पद्धतीने १० खोल्या व महाराजाचे मंदीर बांधण्याचे ठरले.
वाघोलीच्या दहितुले महाराज यांनी मंदीराचे काम करून दिेले.
याच पद्धतीने १० खोल्या व मंदिराचे निर्माण करण्यात आले.
चांदोडकर बंधु (नाशिक) यांच्या आईच्या स्मरणार्थ १ खोली ५००००, ताराचंद देवराय यांनी माधाव अंबिके, मेरूकर (गजाननन) अण्णणा यांनी.
प्रत्येक एक एक (रूम) खोलीसाठी मदत केली.
बरीच मंडळी आहेत त्यांच्या वर्गणाीतुन ही जागा बांधली मंदिर बांधले.
तिथेच वारकर्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. राहण्याच्या जागेबरोबर संडास बाथरूम बोरचे काम करून घेतले.
आता त्या जागेत १५००/- ते २०००/- लोक इथे विनामुल्य उतरतात.
समाजातील लोकांसाठी विनामुल्य येथे सेवा दिली जाते. तिथ वारकर्याची राहण्याची व्यवस्था केली जाते.
अध्यक्ष म्हणुन सुमारे १५ वर्षे माधवराव बबनराव अंबिके यांनी कामे केले. त्यांच्या सदरच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी यांचा त्यांच्या कार्यामध्ये मोठा सहभाग होता. कलावती माधवराव अंबिके यांची अविरत सेवा पालखी सोहळ्याची ३५ वर्षे पुर्ण करीत आहेत. अजुनही त्या त्याच उत्साहात पालखी सोहळ्यात सहभागी होता.
विशेष सहाय्य :-
ताराचंद देवराय, मेरूकर अण्णा, गजानन फल्ले, दत्तात्रय फल्ले, साधु शेठ, घाटकर, दामू देठ जगनाडे, दादा भगत, धोंडीबा राऊत इत्यादी मंउळींनी तन, मन, धन अर्पुण पालखी सोहळ्याला मदत केली. सुधाकर पन्हाळे, रत्नपारखी यांनी मदत केली.
राका गॅस एजन्सी ने ६ सिंलेडर व पालखी उतरण्यासाठी जागेची व्यवस्था ते आजतागायत पर्यंत करत आहेत. ३८ वर्षे नियमित पालखी चालु आहे. सुदुंबरे येथे रथासाठी व साहित्य ठेवण्यासाठी खोल्या बांधलेल्या आहेत. तिथे शिंदे मामा त्या सर्व वस्तुंची व्यवस्था बघतात पादुका पुण्याच्या बँकेत ठेवल्या जातात.
अश्या प्रकारे ३५ लोकांनी लावलेले पालखी सोहळ्याचे रोपाचा वटवृक्ष झाला आज पालखीच्या मागे ५ दिंड्या आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपर्यातुन भावीक पालखीसाठी आर्वजुन उपस्थित असतात ५००० ते ३००० जनसमुदाय पालखीत सहभागी होतो.
आजही पालखीमध्ये सर्व समाजाच्या बांधवाचे स्वागत आहे.
उत्तरोउत्तर पालखी अजुन फुलत जावी ही महाराजां चरणी प्रार्थना.