श्री. संताजी महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान श्री. क्षेत्र सुदुुंबरे येथुन दिनांक ८ जुलै २०१५ रोजी होत असुन महाराजांच्या पालखी रथासाठी या वर्षी श्री. ज्ञानोबा बाबूराव भगत रा. डोंजे, ता. हवेली, जि. पुणे यांच्या सर्जा-राजा या बैलजोडीस या वर्षाचा मान मिळालेला आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख श्री. अरूण काळे यांनी दिले.
या वर्षी बैल जोडीचा मान मिळवण्यासाठी संस्थेकडे ५ अर्ज प्राप्त झाले होते. सर्व बैलजोड्यांचे परिक्षण करून या वर्षी श्री. ज्ञानोबा भगत यांच्या बैलजोडीस मान देण्याचे ठरविले.
संस्थेच्या रथ व्यवस्था कमिठी मधील श्री. अरूण काळे (अध्यक्ष), श्री. नाराययणशेठ क्षिरसागर, श्री. शंकर काळे, श्री. बाळासाहेब रत्नपारखी या सदस्यांनी बैलाची शिंगे, रंग, शेप व खुरे तपासून श्री. भगत यांच्या बैलजोडीचा निर्णय घेतला. श्री. भगत हे कुटुंब धार्मिक व वारकरी सांप्रदायिक विचारांचे आहे. सर्जा- राजा या बैलजोडीबाबत श्री. भगत यांनी चांगली निगा राखली आहे. त्यांना गर्दीतुन जाव लागत असल्याने मागील २ महिन्यापासून त्यांनी तशी सवय लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. बैलांना योग्य खुराक व संतुलित आहार देण्यात येतो. सर्जा-राजा या बैलजोडीस रथाला मान मिळाल्याने डोंजे गावांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असुन त्या बैलजोडीची मिरवणुक गावातून काढण्यात आली.
सन २००८ ते २०१० कलावधीत सुद्धा भगत यांनी रथासाठी बैलजोडी दिली होती. परंतू ते बैल थकल्यानंतर रथासाठी आता ६ महिन्यापुर्वी सर्जा-राजा ही बैलजोडी नव्याने विकत घेऊन, त्यांनी पुन्हा रथासाठी मान मिळविलेला आहे. त्यामुळे श्री. भगत यांचे समाजासाठी विशेष कौतुक करण्यात येत आहे.