तिळवण तेली समाजातील समाजहिताच्या गरजा लक्षात घेऊन पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात आज दि. ५/७/२०१५ चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर पुणे येथे श्री. रमेश भोज यांच्या अध्यक्षतेखाली श्री. विजय रत्नपारखी, सौ. राधिकाताई मखामले, श्री. दिलीप शिंदे, श्री. संतोष व्हावळ, श्री. प्रीतम केदारी, श्री. महेश अंबिके, श्री. गणेश चव्हाण, श्री. अनिल उबाळे, श्री. राजू हाडके, श्री. संदीप चिलेकर, श्री. सचिन काळे, श्री. सूर्यकांत बारमुख यांनी एकत्र येऊन विचरविनिमय करून नवीन संघटना स्थापना करण्याचे एकमताने ठरविले.
आम्ही यापूर्वी संताजी सेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. परंतु संताजी सेनेच्या संस्थापकांनी मालेगाव, अमरावती भागातून आर्थिक अफरातफर केल्यामुळे सदर संघटना पुण्यातून बरखास्त करून महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या प्रवाहात सामील झालो होतो. परंतु गेल्या वर्षभरातील महासभेला पुण्यातील प्रतिसाद लक्षात घेऊन कोणतेही समाजहिताचे कार्यक्रम होऊ शकले नाहीत. येथील स्थानिक विरोध, तसेच जुन्या पदाधिकार्यांचा युगो, मानपान, सामाजकार्यातील सहभाग लक्षात घेऊन आम्ही महासभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आम्हाला समाजकार्य करण्यासाठी कोणत्याही मोठ्या व्यासपीठाची गरज नाही. आमचे कोणतेही कार्यकर्ते हारतुर्यांसाठी काम करत नाहीत. आमचा उद्देश आहे. फक्त समाजकार्य. आम्ही कोणतेही राजकारण न करता फक्त समाजकारणाचाच विचार करत आहोत.
समाजातील जुन्याजाणत्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आग्रहाखातर फक्त पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात समाजकार्य करण्याचे ठरविले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून आज दि. ५/७/२०१५ रोजी विघ्नहर्त्याच्या साक्षीने गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री संताजी ब्रिगेड, पुणे या संघटनेची स्थापन केली आहे.
तरी या संघटनेच्या माध्यमातून ज्या समाजबांधवांना समाजकार्याची आवड आहे त्यांनी खालील मोबाइल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहान करीत आहेत.
संपर्क :- श्री. रमेश भोज, ९६०४७६७०६८, श्री. विजय रत्नपारखी ९८५०७३५४५४, सौ. राधिकाताई मखामले ९८५०८८३५२९, श्री. दिलीप शिंदे ९९२३३३९४३२, श्री. संतोष व्हावळ ९३७०५५३८५१, श्री. प्रीतम केदारी ९२२५५१८३८३, श्री. महेश अंबिके ९८५०१३८६३५, श्री. गणेश चव्हाण ९८९०१२४०५६, श्री. संदीप चिलेकर ९८२२६०७१७१