ओ.बी.सी. जातीनिहाय जनगनणा झालीच पाहीजे कारण जो पर्यंत खरा ओ.बी.सी. समाज किती आहे हे समजत नाही. तो पर्यंत आरक्षणासाठी भांउण्यात काही अर्थ नाही. ब्रिटीशांनी १८७१ ला जनगणना सुरू केली. १९३१ ला जी जनगणना झाली तेव्हा पासून ओबीसींची जनगणना झाली ती ५२ % धरली गेली नंतर १९४१ साली दुसर्या महायुद्धामुळे जनगणना झाली नाही. नंतरच्या काळात भारताला स्वातंत्र मिळाले आणि १९५१ मध्ये पंडित नेहरूंनी जनगणनेमध्ये जातींची नोंद होऊ दिली नाही. १९८० साली इंदिरा गांधीनी तेच केले. १९८१ साली सुप्रीम कोर्टाने सरकारला ओ.बी.सी. ची जात संख्या किती हे विचारले असता सरकारने २००१ साली जातीनिहाय जनगणना करू असे सांगतिले परंतु ती केली गेली नाही कारण जनगणना आयुक्तानेच नकार दिला होता. पण आता २०१५ पर्यंत ओ.बी.सी. च्या टक्केवारीत वाडही झालेली आहे. परंतु जाणीवपुर्वक ओ.बी.सी ची जातीनिहाय जनगणना ही होऊ दिले जात नाही. कारण ओबीसीच्या टक्केवारीत वाढ होणारा आणि तो समाज शिक्षण, नोकरी, सत्ता या सर्वांमध्ये वाटा मागणार या सर्व कारणांमुळे ओ.बी.सी. ची जातीनिहाय जनगणनला हो् दिली जात नाही. असे मत श्री. रमेश भोज अध्यक्ष पुणे ओबीसी सेवा संघ, पुणे जिल्हा दि. २६/०६/२०१५ रोजी आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले सदर कार्यक्रमास ओ.बी.सी. सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री. मोहन देशमाने व गुरव समाजाचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्रतापवरा गुरव, श्री. जगनाडे पालखी सोहळ्याचे प्रमुख अनिल राऊत, ओबीसी पुणे जिल्हा अध्यक्ष राधिका मखामले शहराध्यक्ष कल्पना उनवणे, हजर होते श्री. मोहन देशमाने यांच्या हस्ते शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर पिंपरी - चिंचवड मधील कार्यकर्त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते काही नियुक्त्याही करण्यात आल्या. यासंपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पिं.चि. शहराचे ओ.बी.सी. सेवा संघाचे अध्यख भगवान श्राद्धे यांनी केले. प्रदिप गडदे, अरविंद नाळे, बाबासाहेब करडले या सर्वांचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.