श्री. संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा आजचा एक नजर.

श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.

santaji maharaj jagnade palkhi vishvast  Arivandi Ratnaparkh

    शेकडो वर्षा पासून पंढरपूरला पायी वारी करत विठ्ठल भेटीला जाण्याची परंपरा, वारकरी संप्रदायातील महान संतानी चालू केली. याच संतमंडळी मध्ये संत शिरोमणी तुकाराम महाराज देहूकर यांच्या निकटच्या शिष्यांपैकी व १४ टाळकर्‍यां पैकी एक असलेले आमचे संत श्री. संताजी महाराज जगनाडे (चाकणकर) यांची सुद्धा सुदुंबरे ता. मावळ, जि. पुणे या समाधी स्थळा  पासून पालखी सोळहा सुरू केला गेला.

    १९७८ साली श्री. राऊत, श्री. भगत, श्री. फल्ले, श्री. शिंदे, श्री. जगनाडे, श्री. दहितुले व इतर जेष्ठ समाज बंधु भगिनी च्या सहकार्याने पहील्यांदा सोहळ्याची सुरूवात झाली. माझी आई सुभद्रा, वडील रामचंद्र रत्नपारखी यांनी २००६ सालापर्यंत सलग २५ पक्षेा अधीक वर्षे पायी वारी पुर्ण केली त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी २०१२ पासून पायी वारीला सुरूवात केली. ३७ वर्षे पुर्ण  ३८ व्या वर्षात पदार्पण करणारा आपल्या महाराजांचा सोहळा, वारीतील घडामोडील. वारीचा दिनक्रम व वारतील अनुभव ते आपणा पुढे मांडतांना आंनद होत आहे.

    पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी पहील्या वर्षी वाल्हे ता. पुरंदर येथून जाऊ शकलो या तीन वर्षात वारीमध्ये सोहळ्याच्या नियेाजन व आयोजनामध्ये माझा सहभाग मला खूपच समाधान मिहवून देत आहे. महाराजांच्या रथासाठी स्वत:चे बैल देणारे समाज बांधव ज्या श्रद्धेने महाराजांसाठी काय पण ? ही भावना ठेऊन एक महिनाभर आपली बैलजोडी देतात, स्वत:ची शेतीची कामे बाजुला ठेऊन कुटुंबातील दोन तीन सदस्यांना बरोबर ठेवतात. या बैलांसाठी दररोज पुढे जा्न हिरवा चार कापून आणणारा नागपूरचा ’साण्डू ’ हा माणसातला प्राणीमित्र मला येथे भेटला तर स्वत:च्या कुटुंबाचा चरितार्थ ज्याच्या मुळे भागविला जातो. त्या आपल्या घोड्याबरोबर पायी पंढरपूरला येणारा विनोद लोखंडे (कोथरूडकर) अत्यंत साध्या स्वभावाचा अक्षर आळख नसेलेला महाराजांचा भक्त भेटला.

    श्री. संताजी महाराजांचे रथावर बसुन जाणारे ह. भ. प. श्री. हिंगे महाराज, ज्यांच्या समुधर आवाजाने वारीतील सकाळ प्रसन्न होते. भोजन साहित्यांच्या गाडीमध्ये बसलेल्या उंच तुकाराम मामा. जो या कोठाराची राखण करता करता मुक्त हस्ते, सकाळ संध्याकाह जेवणासाठी लागणारी प्रत्येक वस्तु बिनचुक कशी काढून देतो हे मला नवलच वाटते. जेेवणाला उशीर असो, लवकर करायचे असो. सलगर काका वेळेत चवदार आणि चाटून पुसून खावेसे वाटणारे पदार्थ करून सर्वांनाच आपले वाटतात. त्यांच्या बरोबर वय झालेल्या मात भगिनी जणू आपल्याच घरी आज हे वारकरी जेवायला आलेत या भावनेने मनापासुन राऊत आजींच्या मार्गदर्शना खाली घरच्या सुग्रण आईच्या हातचे जेकवल्याचा आनंद वारी मध्ये देतात. घरी आज हे वारकरी जेवायला आलेत या भावनेने मनापासून राऊत आजींच्या मार्गदर्शना खाली घरच्या सुग्रण आईच्या हातचे जेवल्याचा आनंद वारीमध्ये देतात.

    यापुर्वी वाटचालीमध्ये आळंदीचेे विद्यार्थी भजनासाठी आणावे लागले होते. मागिल वर्षी मावळ तालुक्यातील २० तरूण महाराजांच्या प्रेमाखातर सांप्रादायिक पंरपरेचे जतन करतांनाच वारीचा खरा आनंद देऊन गेले. आपल्या समाजातील ह. भा. प. नामदेव तेली, ह. भ.प. बाळकृष्ण वांळुजकर, ह. भ.प. कोंडीभाऊ दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गावर मुक्कामात किर्तन व दुपारी प्रवचनांचा लाभ मार्गावर मुक्कामात किर्तन दुपारी प्रवचनांचा लाभ वारकरी बंधु भगिनीनी घेतला. श्री. आत्माराम बारमुख मुख्य विणेकरी वाटचालीतील भजनासाठीच नाही तर इतर सोयी व्हाव्यात म्हणून माझ्या कानी लागले नाहीत असा एकही दिवस गेला नाही.

    नागपूर, औरंगाबाद, बीड, नगर, नाशिक, पुणे, सातारा, आणि मुंबई या जिल्ह्यातुन आलेले महाराजांच्या रथासोबत चालतांना ज्ञानोबा तुकाराम म्हणतात आमच्या संताचा ही जय जयकार करतात नव्हे आरती म्हणतांना तन्मयतेने गातात पाहून मनात येते यांना महाराजांचे महत्व समजले आणि आमचे समाज बांधव मात्र स्वत:चे कुटुंब, घरर, प्रपंच, व्यवसाय, नोकरी मुले यातच रमताहेत वारीमध्ये २५ पेक्षा कमी वयाची हजारो भगवत भक्त मंडही भेटली दररोज कपाळाला गंध लावून पांढर्‍या शुभ्र कपड्यात टाळ मृदंगाच्या नादावर नाचत गात जाणारे हेे तरूण मला खूप भावले. कारण त्यांच्याकडे गायन वादनांचे कौशल्य होते. आपल्यातील हा कच्चा दुवा मनात ठेऊन जास्तीत जास्त वेळ भजनाला देण्याचा मी प्रयत्न करतो. येथे आवाज नाही पाठांतर हवे, अभंगाचा क्रम चुकू न देणारे जेष्ठ व आजच्या तरूण भजनी वारकरी बंधूची जुगलबंदी हा नित्य क्रमचा अनुभव त्यातुनच बरेच काही शिकलो.

    महाराजांच्या रथावर बसणारे बाळू काळे सारथ्य करता करता सर्व गोष्टी वेळेत व्हाव्यात म्हणून सतत सगळीकडे लक्ष देतांना दिसले. मुक्कामाचे ठिकाणी पुढे जाऊन उपाशी पोटी तंबू ठोकणारे सेवक हे या वारकर्‍यांच्या सोयीसाठी करत असलेला त्याग पाहून मन भरून येते.. पिण्याचे पाणी वारकर्‍यांना मिळावे म्हणुन तासनतास रांगेत थांबणारे टँकरवाले ड्रायव्हर बंधू पंक्तीमध्ये सर्वांन वाढुन झाल्यावर शेवटी जेवणारे समाज बांधव, सकाळी चहा, नाष्टा देण्यासाठी स्वत: होऊन सेवा देणारे असंख्य भगवत भक्त मला वारीत भेटले. उल्हास शेठ वालझाडे, ज्ञानेश्वर कहाणे, नंदु चोथवे, धोंडीभाऊ भागवत स्वत:ची गाडी घेऊन इतरांसाठी मदतीचा हात देतांना दिसले. 

    जस जसे एक एक गाव मागे पडते. तसा विठ्ठल भेटीसाठी आतुर झालेले वारकरी बंधू भगिनी भारूडा चा आनंद घेतात श्री. दत्ता धोत्रे व्यक्ती एक पण अनेक पात्रांचा अनुभव आपल्या भारूडातून कधी मला तर कधी बारमुखांना सामिल करून सर्वांना देतांना वाटचालीचे दु:ख नक्कीच कमी करतात. अनेक माता, भगिनी, मुली  वृद्ध तरूण हे फुगडी या झिम्मा टाळ मृदुंगाच्या तालावर गिरक्या घेत नाचत असतात.  निगड्याच्या भजनी मंडळाचे गायन वादन खूपच छान होई. सुंदर आवाजची देणगी मिळालेल्या जगनाडे व अंबिके बाई गवळणी म्हणतात तेंव्हा भान हरपून जाते.

    गेल्या दोन वर्षापासून श्री. अरूण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा मार्गस्थ होत आहेे. श्री.  नारायण क्षिरसागर आर्थिक व्यवहार पाहतात तर अनिल राऊत अन्नदात्या यजमानासाठी महाराजांचे दूत बनून जे कुटुंबासाठी आर्शिर्वाद देतात. ते ऐकतांना सर्वांची मने गलबलून जातात. सर्व दिंडी प्रमुख वारीमध्ये एकमेकांना सहकार्य करतांना पाहून समाधान वाटते. विश्वास डोंगरे आणि सौ. डोंगरे यांच्या मुळे आरोग्य सेवा देेणे शयक्य झाले आहे.

    श्री. दहीतुले, श्री. क्षिरसागर, श्री. कर्पे, श्री. साखरे, श्री. चवार, श्री. गणेश आवजी या सर्व भगवत भक्त महाराजांच्या दिंड्या सकाळी ७ पासून संध्याकाळी ७ पर्यंत मार्गक्रमण करतांना आपल्या बरोबरच्या वारकरी बंधु भगिनीसाठी सर्व सुखसोयी देतात अनेनक अन्नदाते या सर्वांना मदत करतात. महाराजांच्यावरील श्रद्धेपोटी एकत्र आलेल्या या तीनहजारापेक्षा जास्त वारकरी बंधूचा मला अभिमान वाटतो कारण माझ्या इतर मित्रांना मी अभिमानाने सांगतो की आमच्याही पालखी सोहळा स्वतंत्र आहे. पालखीरथ घोडा ३००० वारकरी आमच्या महारांजा बरोबर आहेत. पुढील भविष्यात आमचा सोहळा यापेक्षा मोठा होणार आहे. आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

 श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.

दिनांक 10-07-2015 22:27:08
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in