माझी पहिली वारी

santaji maharaj jagnade palkhi vishvast  Arivandi Ratnaparkh

    माझं १२ संपुन १३ व लागलेलं शाळेची सुट्टी संपुन शाळा चालु होण्याची लगबग नवीन कपडे, बुट, पुस्तक याचं आर्कषन अन घरात आपल्या संताजींची पालखी निघण्याची गडबड मी. आईला हट्टाला धरल मला पन पालखीला यायंचच. मी सारखा हट्ट धरला आई म्हणाली ती ह्यांना विचारेल आई आज विचारीन मग विचारीन माझी तगमग चालु होती. वडील माजघरात आल्यानंतर घरातल्या १, २ माणसांशिवाय त्यांच्याशी बोलायच हिंम्मत कोणालाही नव्हती. आईने विचारले आहो ह्या पोराला घ्याल का आपल्या  बरोबर काही पडीलेली काम करील. वडीलांनी नाही म्हंटले मी एक युक्ती केली पुण्यातुन भगत दादा हा माणुस लाहनासंगे लहान मोठ्याबरोबर मोठा यांना मी सांगीतले तुमच तंबुच जेवणाच, लाईटच सर्व काम मी करीन माझ्या वडीलांना तुम्ही सांगीतल तर ते तुमचं एैकतिल दादानी सांगीतल .

   आज एकदम होकार मिळाला.  मनात चौतन्य आलं. वारीच्या तयारीच्या कामात लागलो| दादांबरोबर लुनावर सुदुंबर्‍याला जाऊन मदत करू लागलो. दादा भगत माझ्याशी सुद्धा ओ छोटे राऊत संबोधुन बोलायचे मी मोठा झाल्या सारखा माझ्या अंगावर शहारा यायंचा. पालखी प्रस्थान झालं. पुण्याहून दादांनी एका मुस्लीम समाजाचा बर्फाचा गाडा आनला चरचा पोती, प्लॉस्टीक बांधुन निवार्‍यासाठी तयार केला ट्रक टेंम्पो च्या सुविधा नव्हत्या रथाच्या खाली गोणपंट बांधुन त्यात भांडी बिस्तारे ठेवले. महाराजांचा मुखवटा ठेवून पालखी निघाली.  

   पुण्याहुन अनंत धोमकर, अंबादास शिंदे, ल. वि. शिंदे, मामा  कर्डीले, प्रकाशशेठ केदारी, प्रकाश महींद्रे बबन भागवत, बिटुमामा शिंदे, नामदेव उबाळे, भाऊसोा. भागवत चाकनहुन जगनाडे, मनोहर शिंदे हिराबाई जगनाडे, बारमुख बाबा, रानबा गाडे वरील केशव मामा काळेख पांडुरंग कटके, गिरजु भागवत कर्पे निगड, लक्ष्मण कटके, गोदाबाई कर्डीले, शाकुंतला भागवत, सुनंदा राऊत, दत्तोबा कहाणे, शालन  राऊत, गजानन राऊत तुकाराम औसरे, संभाजी अंबिके, संभाजी कटके, आदी मान्यवर पालखीला सहकार्य करण्याठी आली. इंदोरीत फुलांची उधळन करत ग्रामस्थांनी स्वागत केले. स्टेशन मार्गे पालखी बाळासाहेब पिंगळेच्या विष्णु मंदिरात गेली. तळेगांव करांनी निगडकर वैरागी, खोंड, टेकवडे, खळदे, कोथुलकर, मखामले, जगनाडे, कर्पे, किर्वे, शेलार, वालझाडे, हुलावळे या सहकुटुंबांनी खुप सहकार्य केले. पुढे. देहुरोउला व्यवहारे परीवार यांनी चिंचवडला चिलेकर सायकर, पवार, पोटे, बागल, भिसे, चौधरी, यांनी पुण्यात केदारी, पन्हाळे, भगत, व्हावळ, अंबिके, व्यवहारे, मनोहर डाके, शाम भगत, काका देशमाने, ताराबाई सुपेकर, बाळासोा. वाळुंजकर गणेश व्हावळ, विठ्ठलराव कर्पे, आंबादास शिंदे, नगिने यांनी सहकार्य केल. पुण्यानंतर मखामले, भोज, कर्पे मामा कर्डीले यांनी मदत केली. नांदेडकर दिंडीतून १ तुळसीवाली आली तिचं नांव गिताबाई भागवत तिनं तिचे पेनचे नातेवाईक शिंदूबा शेडगे, तुकाराम शेडगे, रामचंद्र शेजवळ, शंकर मारूती व्यव्हारे बाबा (झेंडेकरी), माई वाळुंजकर बबन वाळुजंकर बाबा तळेगांवचे पालखीचे १ चोपदार मधुकरमामा खोंड, भोरचे श्रींरग देशमाने, जगन्नाथ रघुनाथ काळे वाघोली, फडके हौद पुण्याच्या सुमन जाधव पुण्याच्या बाळासोा. वाळुंजकर काकांनी २ गॅस बत्या दिल्या वसंत व्हावळांनी पालखीचं पॉलीश केलं. पुरूषोत्तम व्हावळांनी घरातील तांब्याची घागर दान कलश म्हणुन दिली. अनंत धोमंकरांनी पालखीच्या गाद्या झुंबर आब्दगिरी दिली. पन्हाळ्यांनी वाकडेवाडी ते सासवड रस्ता अश्‍व व शिसमची पालखी प्रदान केली. लक्ष्मण तुकाराम आंबिके डेक्कन यांनी टाळ, पखवाज, विना पालखीला अर्पण केला. कस्ुतुरी चौकातील विठ्ठल मंदीरातून २ दिवसाच्या विसाव्या नंतर पालखी निघाली पुण्यातुन अनेक मान्यवर दानशुरांनी आपल्या परीने पालखीला मदत केली. घाटात वडकी गांवातुन पै. शंकर फल्लेंचे मित्र पै. पंडीत साबळे यांनी घरातून चावरी लावून घाट पार केला. सासवड मुक्कामी रोकडे, चिंचकर, उबाळे, कावडे, खळदे, खळदकर, हाडके यासरख्या अनेक घराण्यांनी पालखीला मदत केली. जेजूरी मुक्कामी आंदुबर शिंदे, मोहपाडकर, पंढरीनाथ एकनाथ पवार, दत्तोबा पवार ही मंडळी पालखीला समोरे आली. वाल्ह्यात पवार, राऊत तर निरेत गवळी, चांदवडकर नाना, नानी तात्या, अप्पा, विठ्ठलराव पवार, यांच्या घरातील मंडळी जिव्हाळने आदराने वारकर्‍यांची सेवा केली. लोणंद प्रकाश वायकर चंादवकडकर प्रकाश गवळी  यांनी आणि त्यांच्या सुहासिनीनी दारोदारी रांगोळ्यांनी व औक्षण करून यांनी स्वगात केलं दुपारी सुरवडी विहीरीजवळ सावळाराम रामचंद्र पोटे (बारामती) यांनी बैलगाडीतून जेवन आणले व वारकर्‍यांना भरवले. तरडगांव आबा शिनगारे, तात्या वाईकर यांनी आणि सर्व समाज बांधवांनी लापशीच्या खिरीचा मसाला भात, शाकभाजीचा नौवद्य दाखवून रात्री पालखी समोर भजनी जागर केला., तिथून पालखी फलटनला रवाना झाली. फलटनला परदेशी तेली - तिळवण तेली यांच जुळ्या भावासारख सख्य पाहिल. रात्री पाऊस आल्यावर शंकरमंदीरात वारकर्‍यांना पाऊस लागु नये म्हणुन डोक्यावर ताडपत्री धरली विडजीला पालखी दुपारी जेवनाला थांबली सोपान राऊतांच्या घरी थांबली त्यांनी गवार भाकरी डाळ भात शिरा यांचा बेत केला. रात्री नातेपुते मुक्कामी वसंतराव दळवी, चंद्रकांत भिसे आणि समाज बांधवांनी पालखी वाजत गाजत गावात आणली माळशिरस येथे सुग्रिव वाघमोडे पाटील यांनी भारूडंाची हजेरी घेतली जेवन करून सकाळी पालखी वेळापूरला अर्धनारी नरेश्‍वराजवळ पेट्रोल पंपापजवळ मुक्कामी राहिली. अकलुज वरून बाळकृष्ण शिनगारे आपल्या सुना बाळांना घेऊन जेवन देण्यासाठी आले. 

    भंडीशेगावला दर्गाजवळ थांबलो रात्री जर्नादन महाराज यांच किर्तन अन सकाळी रामचदद्र देखने यांचे प्रवचन ऐकनू पालखी वाखरी मुक्कामी नामदेव गवळी यांच्या घरी मुक्काम केला भजन किर्तन यात जात असताना रात्र कशी गेली कळलं सुद्धा नाही. पंढरपुर येथे तेली मठ नवीपेठ येथे पालखी गेली कारटकर, वाठारकर, नागमल, देशमाने, फलटनकर या परिवारांनी लेकीबाळी सह आपला व्यवसाय सोडून वारकर्‍यांची अतिशय सेवा केली. मानवतर मंडळी दरवर्षी बारस घालत त्यामध्ये मारूतराव क्षिरसागर आणि मंडळी अग्रेसर होती. पालखीचं त्यांनी अतिशय चांगलं स्वागत व व्यवस्था केली पालखी सोहळ्याच्या सुरूवातीला सामाजातिल ज्ञात अशाात समाज बांधवांनी मदत केली त्यामुळेच आज पालखी सोहळ्याची पंढरपूर येथे बांधकाम केलेली जागा रथ, तंबु, भांउी, लाईट साहित्य, पालखी|, टँकर या सर्व समजातून व समाजेत्तर लोकांच्या सहकार्यामुळे झाल्या 

    मी वयाच्या १२ ते १३ व्या वर्षी ज्या ज्या लोकांनी पालखीला मदत केली ते मी हे पाहिलंय माझ वय आणि नजर यांच्या अलीकडंही आनेकांनी आर्थिक शारिरीक, मानसीक आधार दिला ताकद दिली. त्या सर्व बळावर संताजी महाराजांची पालखीचे वारकरी चालतायेत आश्या भक्तीची पताका फडकतोय भक्त्ीचा लामन दिवा तेवत ठेवतायेत माझ्या मते जे लोकवारी करत नाहीत व जे यथाशक्ती मदत करतोय तेही खर्‍या अर्थााने वारकरीच आहेत. संताजी महाराजांच्या सोहळ्याला मुस्लीम, धनगर, जैन, मराठा, माळी, साळी, शिंपी, ब्राह्मण १२ बलुतेदार १८ अलुतेदार प्रांतिक परप्रातिय सर्व धर्माचे लोक मदत करतात खर्‍या अर्थाने सर्वधर्माचे लोक मदत करतात खर्‍या अर्थाने सर्वधर्म समभावांंंचं संताजी महाराज हे प्रतिक आहे. मला एवढंच म्हणावसं वाटत यारे यारे लहान थोर याती भुलती नारी नर.

दिनांक 10-07-2015 23:32:03
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in