११ जानेवारी पैठण : संत तुकाराम गाथेचे लेखक श्री.संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्त येथील तेली धर्मशाळेत पद्मपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. तीन जानेवारी पुण्यतिथी निमित्त कांबी येथील किशोर महाराज भिषे यांचे किर्तण झाले. तसेच भाऊसाहेब महाराज जोशी यांच्या आमृतवाणीतुन सात दिवस पद्मपुराणाचे सुश्राव्य निरुपण झाले. व पुष्कर गोसावी यांच्या भजनाचा कार्यक्रम देखील पार पडला. समारोपाला शहरातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली. हभप रखमाजी महाराज नवले यांच्या काल्याच्या किर्तणाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष विक्रम सर्जे, उपाध्यक्ष केदारनाथ सर्जे, कोषाध्यक्ष यशवंतराव बरकसे, सचिव भगवान मिटकर, एकनाथ क्षिरसागर, भारत कसबेकर, गंगाधर म्हसके, सखाराम सिंदलबे, शिवमुर्ती ससाने, मधु सिंदलबे, डॉ.गंगाधर क्षिरसागर, प्रकाश सिंदलबे, रामचंद्र मिसाळ आदींनी परिश्रम घेतले.