रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ, रत्नागिरी जिल्हा वधु-वर सुचक मंडळ आयोजित
राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा 2019
सहसंयोजक जिल्हा सेवा संघश रत्नागिरी तालुका उपशाखा, संताजी जगनाडे मंदिर ट्रस्ट, रत्नागिरी
शनिवार दिनांक 9 फेब्रुवारी 2019 रोजी, वेळ सकाळी 9.30 ते 5.30 वाजेपर्यंत
मेळावा स्थळ : श्री बालाजी मंगल कार्यालय, शांतीनगर स्टॉप जवळ, युवराज फिटनेस जिमसमोर, नाचणे रोड, रत्नागिरी.
मेळाव्यासंबंधी समस्त वधू-वर पालकांसाठी विशेष सूचना १) रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघाच्या वधू-वर-पालक परिचय मेळाव्याला येणाच्या प्रत्येकाने मेळाव्याच्या ठिकाणी आपल्या हजेरीची नोंद करून सही करावी. २) वधू-वर-पालकांनी मेळाव्याच्या ठिकाणी कार्यक्रमापूर्वी १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहून सहकार्य करावे. ३) आपल्या अडचणीसंबंधी वा मेळाव्यासंबंधी अन्य काही कारणासाठी स्थानिक मेळावा स्वयंसेवक प्रतिनिधीकडे संपर्क साधावा. ४) अ) मेळाव्यासाठी उपस्थित राहाणाच्या वर किंवा वधू तसेच आई-वडील अथवा अन्य पालक म्हणजे तीन जणांसाठी रु. ५00/- आकारले जातील. सदर रकमेमध्ये तिघांचे चहा-नाश्ता-भोजन-चहा तसेच एक परिचय पुस्तिका इत्यादींचा समावेश असेल तसेच मेळाव्यामध्ये वधू-वरांसंबंधी जादा व्यक्ती उपस्थित असेल तर त्यांच्याकडून रु. २00/- रक्कम आकारले जाईल मात्र त्यांना परिचय पुस्तिका वेगळी दिली जाणार नाही. जादा पुस्तिकेसाठी रु. २00/- आकारले जातील. ब) मेळाव्यात सख्खी भावंडे उमेद्वार म्हणून भाग घेत असतील तर पहिल्या उमेदवाराने रु. ५00/- व पुढील उमेदवारांनी प्रत्येक रु. ३00/- भरावेत पण या कुटुंबास फक्त एकच पुस्तिका मिळेल. दहावीपर्यंत शिक्षण असलेल्या वधु उमेदवारसाठी प्रवेश शुल्क फक्त रु. ३00/- (पालकांसह) आकरले जातील. पैसे जमा केल्यावर सचिव श्री. प्रदीप रहाटे - ९४२०८४२७६८ यांना फोन करून कळवावे. (UTR नंबर) ५) मेळाव्यामध्ये उपस्थित असलेल्या वधू-वरांसंबंधि असणा-या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (हा ज्ञाती स्नेह मेळावा नाही.) ६) नोंदणी केलेल्या प्रत्येक ज्ञाती वधू-वर-पालक वा अन्य पालक यांनी आपली भोजन /चहा कुपन्स जपून ठेवावीत. कृपया कुपन्स हरवू नये. नवीन कुपन्स दिली जाणार नाहीत. वधुवर व पालकांनी आपले क्रमांकदर्शक विल्ले लावणे आवश्यक आहे. ७) वधू-वर तसेच पालक यांचा प्रत्यक्ष परिचय करून घेण्यासाठी कुपन्ससोबत दिल्या जाणा-या कोन्या कागदावर संदेश लिहून कार्यकत्यांकडे देण्यात यावा ते आपणास मदत करतील. चर्चेसाठी स्वतंत्र कक्ष व गुणमिलनासाठी तशाची व्यवस्था केली आहे. ८) अ) ऑनलाईन फॉर्म पाठविण्यासाठी ई-मेल: shubnmangal2019.ratnagiri@gmail.com
मेळावा प्रवेश फॉर्म सुवाच्च अक्षरात पूर्णपणे भरावा. त्यात सत्य माहिती भरावी. चुकीची माहिती दिली गेल्यास त्यास संयोजक समिती जबाबदार रहाणार नाही. फॉर्म शेवटी सही करणे आवश्यक असून विनासहीचे फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. तसेच प्रवेश शुल्क फॉर्मसोबत रोखीने किंवा डी.डी.ने देण्यात यावे. अन्यथा आपला प्रवेश निश्चित केला जाणार नाही. सर्व फॉर्म २३ जानेवारी २०१९ पूर्वी संस्थेच्या खालील पत्त्यावर पोहचणे आवश्यक आहे. त्यांचीच फोटोसह माहिती परिचय पुस्तिकेमध्ये राहील. सदरचे फॉर्म संपर्क प्रतिनिधीकडे किंवा पुढील पत्यावर पाठवावेत. १) द्वारा श्री संत संताजी महाराज जगनाडे सह. पत. संस्था मर्या., तेली आळी, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी - ४१५ ६१२ फोन 0२३५२-२२४४५३. २) श्री. रघुवीर शेलार द्वारा श्रेयस इलेक्ट्रीकल्स, साळवी स्टॉप, नाचणे रोड, रत्नागिरी-४१२६३९. । अलिकडे काढलेला रंगीत फोटो फॉर्मवर चिकटविणे व १ फोटो परिचय पुस्तिकेसाठी (फोटोच्या पाठी आपले नाव वॉलपेनने लिहावे किंवा फोटो खाली नाव टाकावेत फॉर्म प्लास्टिक पिशवीत घालून) सोबत जोडणे, प्रत्येक पालकांनी अथवा उमेदवारांनी आपल्या पत्रिकेची झेरॉक्स प्रत फॉर्म सोबत जोडणे तसे १ प्रत सोबत आणावी. गुणमिलनासाठी फॉर्मसोबत दिलेली पत्रिका देणे शक्य होणार नाही.