पाऊले चालती पंढरीची वाट

श्री. गंगाधर का. हाडके,  उपाध्यक्ष श्री. संताजी महाराज जगनाडे  पालखी सोहळा सदुुंबरे

    पुण्यनगरी ही विविध बाबीमुळे देशाचे नव्हे तर जगाच्या स्मरणांत राहणारी अशी नगरी आहे. आणि या नागरीत आपण वास्तव्य करतो आहोत हे आपले परमभाग्य आहे असे समजतो. कारण ही पुण्य नगरी ही भुमी संताची आहे. श्री. क्षेत्र आळंदी देहू, भंंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर तसेच श्री क्षेत्र सुदूंबरे ही पावण तिर्थक्षेत्र पुण्याच्या हाकेच्या अंतरावर आहेत.

    ज्ञानदवे रचिला पाया तुका झालासे कळस !  या संमत वचना प्रमाणे सांप्रदायाचा पाया महान संत ज्ञानयोगी ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केला. व त्यावर कळसाचा मान श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी मिळविला आणि आणि या जगद्गुरूचे  १४ टाळकर्‍यांपैकी एक व त्यांचे अभंग लेखक पट्ट शिष्य संत शिरोमणी श्री संताजीमहाराज जगनाडे हे सदोदित त्यांचे समावेत राहिले त्यामुळे आज तुकारामांची गाथा सर्व जगामध्ये सर्वाचा माथा शांत करीत आहे. या महान संतापैकी श्री. ज्ञानेश्वर महाराज व श्री संतशिरीमणी श्री. संताजी महाराज जगनाडे यांचा समाधी श्री. क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र सुदुंबरे येथे आहेत आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठी गेले. अशाी ही पावन क्षेत्र आहेत.

    या तिन्ही संताच्या पालख्या प्रतिवर्षी पंढरपुर गमन करीत आहेत. हा पालखी सोहळा क्षेत्र आळंदी देहू, तसेच सुदूंबरे येथून लाखोंच्या संख्येने पंढरपुर कडे मार्ग आक्रमण करीत असतो. हा सोहळा जगामध्ये वाखाणण्या सारखा आहे. त्यामध्ये या सोहळ्याची हौस पुरविण्यासाठी परदेशी नागरीक सुद्धा बहुसंख्येने सोहळ्यात सामील झालेले आहेत. असा अप्रती पालखी सोहळा संपुर्ण जगाचे लक्ष केंद्रीत करीत आहे.

    त्यामध्ये सामील होण्याची संधी आपल्या समाजातील जेष्ठ समाज बांधव कै. श्री. दादा भगत पुणे कै. श्री. धोंडीबा राऊत व पोलिस खात्यांतील कै. श्री देशमाने यांनी १९७७ श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्यांची संधी अनंत अडचणीला तोंड देत उपलब्ध करून दिली. आणि आता हा पालखी सोहळा दिमाखांत श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्तगुरू श्री. संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळ्या बरोबर मार्गक्रमण करीत आहे.

    श्री. संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळ्यांमध्ये वरील जेष्ठ समाज बांधवांचे बरोबर. समाजातील कै. ह.भ.प. दहितुले महाराज वाघोली, श्री. मेरूकर, देवराय, श्री. अंबिके यांनी देखील योगदान दिले आहे. तसेच कै. कहाणे, कै. फल्ले, कै. जगनाडे, कै. घााटकर यांची तेवढाच सहभाग होता. त्यामुळे आज सोहळ्यांस खचितच चांगले वैभव प्राप्त झाले आहे.

    चालु स्थिती मध्ये सदरचा सोहळा हा श्री अरूणशेठ काळे, श्री. क्षेत्र सुंदुबरे यांचे अध्यक्षते ख,ाली त्यांचे सहकारी श्री. नारायण क्षिरसागर, श्री. गंगाधर हाडके, श्री. अरविंद रत्नपारखी, श्री. बाळु काळे उल्हास वालझाडे, श्री. देवराय यांचे सह कार्यरथ आहे.

    संस्था म्हंटले की त्याठिकाणी सर्वाच योगदान महत्वाचे असते त्यामुळेच संस्थेचा विस्तार होत असतो. कोणी तरी झाड लावतो त्याची फळे पुढील पिढीला चाखावयांस मिळतात त्यानुसार कै. ह.भ.प. दहितुले महाराज वाघोली यांचे कालावधीमध्ये श्री. क्षेत्र पंढरपुर मध्ये  नविन कुंभारवाडा कैकाडी मठा शेजारी ११ गुंठे जागा घेवून तिला संरक्षण भित व श्री. संताजी महाराज मंदिराची  रचना केली आहे. त्यामुळे आजपर्यंत वारीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहणारे वारकरी यांची निवासाची उत्तम सोय होत आहे.

    त्यानंतरच्या विश्वस्त मंडळींनी त्यांत वाढ करून खोल्याची सुविधा देखील वाढविल्या आहेत.

    तसेच संघाचे कार्यरथ असणारे श्री. अरुणशेठ काळे व त्यांचे सहकारी यांनी वारकर्‍यांचे सोई सुविधा मध्ये वाढ होण्यांचे द्दष्टीने अतिशय परिश्रम घेवून पंढरपूरमध्ये महिना मुक्काम करून वारकर्‍यांचे सुखसोई साठी स्वयंपाक गृहाची दुरूस्ती तसेच विठ्ठरूख्मीनी मंदिर समीतीचे माध्यमातुन प्रयत्न करून अनुदान प्राप्त करून शौचाल्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ड्रेनेज लाईन ची व्यवस्था केली आहे पिण्याच्या पाण्याचे नविन जोडणी करून घेतली आहे. त्यामुळे आता वारकर्‍यांना पुरेपूर सुविधा प्राप्त करून दिलेल्या आहेत.

    तरी देखील श्री क्षेत्र पंढरपूर येथे अजुनही खुप सुविधा होने अत्यंत गरजचे आहे. दोन वर्षापुर्वी पनवेल येथील समाज बांधव यांनीसंपुर्ण मंदिरांमध्ये कोटा फरशीचे काम करून दिले आहे. अशाा प्रकारे समाज बांधवांचे सहकार्याची अत्यंत गरज आहे. कारण सदर जागेमध्ये सर्व सोईनी मुक्त आशि एक सुंदर भक्त निवासाची अत्यंत गरज आहे. त्यासाठी सर्वाचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे.

    या सोहळ्यांत आपण सर्वांनी तन मन घनाने सहभागी होवून भगवंती चरणी लिन होवु या.

श्री. गंगाधर काशिनाथ हाडके 

दिनांक 12-07-2015 00:19:02
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in