कै. ह. भ. प. श्री. वैद्य महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेचे मध्ये चंदनापरी देह झिजवून संपूर्ण जीवन अविवाहीत राहुन संस्थेचे मध्ये हजारो लाखो गुणवान विद्यार्थी घडविले ते आज संपुर्ण देशात सांप्रदायांचे कार्याचा झेंडा मिरवित आहेत. त्यांमध्ये नामकंत रामचरित्र कथाकार ह. भ. प. ढोक महाराजा सारखे महान विभुती त्यांचे शिष्य गण आहेत. त्याचा आपला समाजांस सार्थ अभिमान आहे कारण ह. भ.प पांडुरंगबुवा वैद्य महाराज हे तेली समाजाचे होते ते नागपूर निवासी होते पुर्ण आयुष्य श्री क्षेत्र आळंदी येथे विद्यार्थांचे उन्नती करण्यात व्यतीत केले आहे.
व आपला पवित्र देह देखील त्यांनी जेथे आयुष्यभर वारकरी संस्था आळंदी येथ झिजलिला तेथेच ठेवला हजारो लाखो शिष्य गण अवघा महाराष्ट्रा मधून त्यांचे अत्यं दर्शनास आले होते त्यांनी देह आषाढी वारीचे दरम्यान ठेवला होता.
संग्रहक (श्री गंगाधर काशिनाथ हाडके)