काँग्रेसने तेली समाजाची थट्टा केली समाज काग्रेसला त्यांची जागा दाखवून देणार - गोपाळ पाटील
यवतमाळ दि. २६ - निवडणूक म्हटली की पक्षोपक्षीच्या राजकारणात जातीय समिकरण महत्वाचे ठरते. बिहार राजस्थान व गुजरात च्या खालोखाल महाराष्ट्रात ८० लाख तेली समाजाची लोकसंख्या आहे. तथापी एका सव्र्हेक्षणानुसार काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही ते ली समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नसल्याची माहीती प्राप्त झाली आहे. रडत कुंथत चंद्रपुर येथील लोकसभेकरीता बांगळे यांना तिकिट दिल्याचे अगोदर जाहीर झाले. परंतु नंतर ते रद्द करुन बाहेरुन आलेल्या उमेदवारास तिकिट देवून काँग्रेसने तेली समाजाचा घोर उपमर्द केलेला आहे. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची बुज खित एस.सी.एस.टी. समाजाला तिकिट वाटपात काही प्रमाणात का होईना प्रतिनिधीत्व मिळाले. दुर्दैवाने इतर ओबीसी समाजाला तिकिट वाटपात हेतू पुरस्सर डावलण्यात आले हो वस्तुस्थिती आहे. या काँग्रेसच्या लांगुलचालन निती मुळे तेली समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून भेदभावपूर्ण नितीमुळे जाणीवपूर्वक झालेला तेली समाजाचा अपमान हा तेली जनतेच्या जिव्हारी बसला असून येत्या लोकसभा निवडणुकीत तेली समाज एकसंघपणे काँग्रेस विरोधी भूमिका घेवून पंक्षाला त्यांची जागा दाखवून देईल असा इषारा तेली समाजाचे जेष्ठ नेते व यवतमाळ येथील प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते गोपाळ पाटील यांनी दिला आहे. आपल्या अनावर झालेल्या भावना व्यक्त करतांना त्यांनी शेवटी, कुछ तो बात है की, इस्ती मिटती नही हमारी मिट गये इसे मिटाने वाले अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.