पुणे :- संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचा विशेष अंक प्रसिद्ध करीत आहे. म्हणताच काही जागृत बांधवांनी प्रत्यक्ष भेटून काही बाबी स्पष्ट केल्या. सन १९८५ मध्ये नोंदणी करताना जे ट्रस्टी नमूद केले तेच ट्रस्टी आज ही धर्मादय आयुक्त कार्यालयातील नोंदीत कायम आहेत. आज तीस वर्ष या घटनेला झालेत. वयोमाना नुसार बरेच ट्रस्टी मृत्यू पावले यातील ४ ते ५ ट्रस्टी आहेत. गत ३० वर्षात पालखी सोहळा अतिशय प्रगती पथावर गेला असुन. अनेक बांधवांनी वस्तु व अन्यबाबी देणगी दाखल दिल्यात. मध्यंतरीच्या काळात या रितसर नोंद असलेल्या संस्थेने १४ गुंठे जागा पंढरपूर येथे खरेदी सुद्धा केली. बर्याच बांधवांच्या त्याागावर तेथे इमारत ही उभी केली गेली आहे. स्वच्छतागृह, बोअर व इतर सुविधा निर्माण केल्यात. हे करण्यासाठी त्या काळातील पदाधीकारी ट्रस्टी असलेल्या बांधवांची धडपड फार मोठी आहे. त्यांच्या धडपडीला शेकडो बांधवांनी सहकार्य ही केले गेले आहे. गत तिस वर्षात अध्यख व ट्रस्टी बदलले गेलत पण याची नोंद धर्मादय आयुक्ताकडे झालेली नाही.
या असलेल्या उणीवा मुळे भविष्यात काही प्रश्न निर्माण होंतील. असे स्पष्टीकरण काही बांधवांनी केले आहे. आळंदी येथे ही पूर्वजांनी असाच त्याग करून धर्म शाळा उभारली पण आशा उणीवा मुळी ती मलमत्ता कुणाची हा प्रश्न उभा राहिला आहे. काही गावात काही शहरात अशााच वास्तू एक तर विना वारस किंवा खाजगी मालकीच्या झाल्यात.
वरिल प्रश्न बांधवांनी उपस्थित केल्या नंतर काही आजी व माजी पदाधीकारी मंडळींना विचारले आसता त्यांनी मान्य केले ही वस्तुस्थीती सत्य आहे. गत ३० वर्षात फक्त प्रगती हा ध्यास घेतला होता. अध्यक्ष बदल्या नंतर तसे पत्र दिले परंतु पाठ पुरवा झाला नाही. काही तांत्रीक बाबीमुळे हे राहिले आहे. जे ट्रस्टी हायात नाहीत त्यांचे मृत्युचे दाखले गोळा करण्याचे काम मध्यंतरी केले आहे. जे दाखले उरलेत ते गोळा करून तसा अहवाल देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मादय आयुक्तांच्या कार्यालयाच्या नेमा नसार जो दंड आहे तो भरून कायदेशीर बाबी पुर्ण करण्याची धडपड केली जात आहे. असलेली जागा ही सीटी सर्व्हे मध्ये संस्थेच्या त्यावेळच्या ट्रस्टींच्या नावे असून जी इमारत आहे त्यांची नोंद झालेली नाही. सुज्ञ बांधवांच्या ज्या शंका आहेत त्या रास्त असुन त्या पुर्ण करण्याची जबाबदारी नवीन पदाधीकारी मंडळींची आहे. गत ३० वर्षातील ऍडीटर रिपोर्ट गेले आहेत. जमा होणारा निधी हा रितसर संस्थेच्या खात्यावर जमा होतो. व त्याचा खर्च ही विश्वसाने केला जातो. जुन्या, नव्या ट्रस्टी च्या समन्वयातुन हा प्रश्न सोडवावा भविष्यात धोक्या पासून वाचवावा लाखो बांधव की ज्यांनी त्याग, निष्ठा यांची सेवा दिली त्याला तउे जावू देऊ नयेत. ही भावना शेकडो बांधवांनी आमच्या जवळ व्यक्त केली.