नगर, ता .२३ - तुळजाभवानी मातेस मुलगी समजल्या जाणाऱ्या भगत कुटुंबियांकडून महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची इतिहासामध्ये प्रथमच श्री तुळजाभवानी देवीच्या सिंहासनवर १११११ हापूस आंबेची देवीला पूजा मांडली गेली, तसेच देवीच्या मुख्य मंदिरासह भवानीशंकर खंडेराया नरसिंह मंदिर येमाई मंदिर दत्त मंदिर या सर्व मंदिरात देखील पूजा केल्यानंतर भाविकांनी देवीची विशेष पूजा पाहण्याकरिता मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
देवीच्या सीमोलंघनासाठी बुन्हाणनगर येथील पालखी दसऱ्याला येते व भगत कुटुंबीय व देवीची भेट होते जितेंद्र भगत यांनी मातेस आंब्याची आरास करून या प्राचीन परंपरेला नव्या उपक्रमाने वेगळा शिरपेच रोवला गेला आहे. यावेळी सर्वत्र हापूस आंब्याचा सुगंध दरवळत होता यासाठी पुणे येथून ३० कलाकार आणण्यात आले होते.
यावेळी ३५ कॅरेट रत्नागिरी हापूस आंबे भाविकांना वाटण्याकरिता नगरचे पलंगाचे मानकरी गणेश पलंगे यांच्या सहकार्याने भगत कुटुंबीय आनंदीत होऊन गेले. ओंकार, अरविंद, घनश्याम, कुमार, महेश, अमित दिनेश,उमेश, सचिन,रामकृष्ण भगत आणि तुळजाभवानी देवी पलंगाचे मुख्य मानकरी गणेश पलंगे आदि उपस्थित होते.