श्री शनैश्वर फौंडेशन, मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस 26 वर्षे पूर्ण झाली. संस्थेतर्फे संपुर्ण महाराष्ट्रभरातून व्यावसायिक शिक्षण घेणा-या गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रतिवर्षी प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे, दरवर्षी 120 विद्यार्थ्यांना बारा लाख रुपये एवढया रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात येते. आतापर्यंत 446 विद्यार्थ्यांना 1 कोटी 20 लाख रुपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले.
आपल्या समाजातील हुतात्मा झालेल्या वीर जवानांच्या असीम कर्तृत्वाची व त्यागाची गाथा समाजातील सर्वांना प्रेरणादायी ठरावी यासाठी याअगोदर हुतात्मा ग्रुपकॅप्टन समीर नेरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी एका विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात होती, त्यामध्ये गेल्यावर्षी पासून हुतात्मा मेजर प्रफुल्ल अंबादासजी मोहोरकर व हुतात्मा मेजर प्रसाद गणेश महाडिक यांच्या नावांची भर पडली. यापुढे फौंडेशनतर्फे या तिन्ही वीर जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृतज्ञतापूर्वक दरवर्षी 3 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कायम चालू ठेवली जाईल.
आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वीरपत्नी गौरी प्रसाद महाडिक यांनी सैन्यात भरती होण्याचा धाडसी निर्णय घेतला. सैनिक अधिकारी प्रशिक्षण प्रवेशासाठीच्या खडतर शारीरिक व बौद्धिक परीक्षा पार करून 1 एप्रिल 2019 रोजी पासून "लेफ्टनंट" पदाच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांच्या धैर्याचे व निर्णयाचे कौतुक करण्यासाठी फौंडेशनने 17 मार्च 2019 रोजी ठाणे येथे "वीरांगना गौरव" समारंभाचे शानदार आयोजन केले होते, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबियांचाही सत्कार करण्यात आला. तसेच वीरपत्नी अबोली प्रफुल्ल मोहोरकर व वीरमाता सुमन काशिनाथ नेरकर व समाजातील इतर निवृत्त सैनिकी अधिकारी व जवानांचाही सत्कार करण्यात आला.
या वर्षी महाराष्ट्राच्या विविध भागातून 2019-2020 च्या शैक्षणिक वर्षाकरिता खालील प्रकारच्या शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
1. प्रतिवर्षाप्रमाणेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवड झालेले विद्यार्थी.
2. केंद्रीय लोक सेवा आयोगातर्फे घेण्यात येणा-या Common Enterance Exam for India Services साठी IAS, IPS इ. उच्चश्रेणीच्या पदासाठी होणा-या, प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण होवून अंतिम निवडीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार.
3. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यस्तरीय प्रथम श्रेणीच्या (Deputy Collector, Dy. S. P Dy.Registrarइ.) प्राथमिक परीक्षांतील उत्तीर्ण विद्यार्थी.
4. भौतिक (Physics), रासायनिक (Chemistry), गणित (Mathematics) यासारख्या मूलभूत विषयांत पदव्यूत्तर (M.Sc./M.A.) अथवा संशोधनात्मक (Ph.D.) अभ्यासक्रम स्विकारणारे विद्यार्थी.
5. चार्टर्ड अकांऊटंट (C.A.), कॉस्ट अकांटंट (ICWA), चार्टर्ड फायनान्स अॅनालिसीस्ट C.F.A.), कंपनी सेक्रेटरी (C.S.), ह्यूमन रिसॉर्सेस डेव्हलपमेंट (H.R.D.), इ. अभ्यासक्रमांची निवड करुन त्यांची प्राथमिक चाचणी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
6. महाराष्ट्रातील ख्यातनाम महाविद्यालयांत कमर्शियल आर्टर, फाईन आर्टस, इ. च्या विविध शाखांत प्रवेश मिळवून या विषयातील पदवी / पदविकांचा अभ्यासक्रम स्वीकारलेले विद्यार्थी.
प्रतिवर्षी प्रमाणे वरील विषयांपैकी क्र. १ द्वारे येणा-या आजची छाननी करुन निवड झालेल्या विद्याथ्र्यांस वार्षिक रु. १०,०००/- (रुपये दहा हजार) या प्रमाणात शिष्यवृत्ती दिली जाईल व त्या विद्याथ्र्याने आपला शैक्षणिक स्तर समाधानकारक राखल्यास त्याला, त्याने स्वीकारलेल्या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. क्र. २ ते क्र. ६ मध्ये निर्देशिलेल्या अभ्यासक्रमासाठी आलेल्या अर्जाची छाननी झाल्यानंतर त्यांनी निवडलेला अभ्यासक्रम/अभ्यास यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी, त्यासाठी लागणारी आर्थिक गरज व अर्जदार विद्याथ्र्यांची आर्थिक निकड या सर्व बाबींचा फौंडेशनच्या शिक्षण तज्ञांकडून व मार्गदर्शकांकडून विचार विनिमय करुन शिष्यवृत्तीची रक्कम व कालावधी निश्चित केला जाईल व सदर रक्कम निवडलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल.
सदर निवड ही फौंडेशनच्या शैक्षणिक समितीमार्फत आजवर निःपक्षरित्या केली गेलेली आहे व यापुढेही केली जाईल तसेच समितीचा निवडीबाबतचा निर्णय अंतिम समजून त्याप्रमाणे शिष्यवृत्ती वाटपाची कार्यवाही केली जाईल. सदर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर स्वतःची संपूर्ण माहिती, पत्रव्यवहाराचा पत्ता, संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक व ई-मेल अॅड्रेस इ. लिहून पाठविल्यास त्यास शिष्यवृत्तीसाठीचा अर्ज विनामूल्य पाठविण्यात येईल. शिष्यवृत्तीचे अर्ज आपणांस वेबसाईट वर उपलब्ध आहेत. त्यापोबतच या शिष्यवृत्तीबाबत सविस्तर माहिती आपणास या वेबसाईट वर मिळू शकेल. अर्जाची प्राथमिक छाननीद्वारे निवड झालेल्या विद्याथ्र्यांशी काही केंद्रावरुन On line video conferencing द्वारे संपर्क साधून प्रत्यक्ष मुलाखत घेण्याचा मानस असून, त्यानंतर अंतिम निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्याथ्र्याने अर्जात नमूद केलेल्या जागेत स्वतःचा दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अॅड्रेस इ. सविस्तर माहिती देणे अत्यावश्यक आहे. प्राथमिक चाचणीत निवड झालेल्या विद्याथ्र्यांशी याबाबत संपर्क साधून, त्यांची मुलाखत घेतल्यानंतरच अंतिम निवड केली जाणार आहे याची प्रत्येक अर्जदाराने जाणीव ठेवावी.
फौंडेशनच्या आजवरच्या वाटचालीस आपले मार्गदर्शन, सहकार्य, विश्वास व आर्थिक सहभाग याच्या पाठींब्यामुळे आम्ही हे पार पाडू शकलो याची आम्हांस नम्र जाणीव आहे. सर्व देणगीदारांस आयकर नियम 80G च्या तरतूदीनुसार करमाफी मिळते याची अवश्य नोंद घ्यावी तसेच आपल्या परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या विभागातील गरजू विद्यार्थ्यास या शिष्यवृत्ती योजनेची माहिती जरुर द्यावी, ही विनंती करीत आहोत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०१७ आहे याची नोंद घ्यावी.
फौंडेशनच्या आजवरच्या वाटचालीत असंख्य देणगीदार, आपले मार्गदर्शन, विश्वास , सहकार्य, आर्थिक सहभाग, आमच्या हितचिंतकांचे श्रम व पाठिंबा यांचा सिहांचा वाटा आहे याची आम्हांस पूर्ण जाणीव आहे.
सर्व देणगीदारांस आयकर नियम 80G च्या तरतुदीनुसार करमाफी मिळते, याची अवश्य नोंद घ्यावी. तसेच आपल्या परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या विभागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेची माहिती जरूर द्यावी, ही विनंती.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2019 आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्याचा व अर्ज भरून पाठविण्याचा पत्ता श्री शनैश्वर फौंडेशन, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना द्वारा: श्री प्रभाकर संतु कोते-विश्वस्त वी/२६, श्री सतगुरु को-ऑप. हौ. सोसायटी, ९० फूट रोड, भांडूप गांव, भांडूप (पूर्व), मुंबई ४०० ०४२. भ्रमणध्वनी: ९८२१४ ३१७१८
पत्रव्यवहाराचा पत्ता- डॉ शाम शिंदे -- चेअरमन, 20 ए, 147-151, शिंदे बिल्डिंग, ऑर्थर रोड नाका, साने गुरुजी मार्ग,
चिंचपोकळी, मुंबई 400011. मोबाईल 9869186549 / 8104578471