संताजी महाराजांची पालखी कै. धोंडीबा राऊत, कै. दादा भगत, कै. शरद देशमाने यांच्या धडपडीतून आकारली कै. अर्जुनशेठ तेली यांनी याला आश्रय दिला. या नंतर अनेक जन यात सामील झाले. लोहगांव येथिल कै. जगन्नाथ काळे यात सामिल झाले. शिक्षण नावा पुरते ही नाही. उमेदीच्या काळा पासून कष्ट व धडपड केलेली शिक्षण धेण्यास वेळच मिळाला नाही. परंतु मुले मोठी झाली व्यवसाय व उद्योगात स्वकष्टावर नाव कमवू लागले तसे जगन्नाथ (आण्णा) निवांत झाले. आणि ते संताजी पालखीत सामील झाले. टाळ कसा वाजवावा, ताल कसा पकडावा या पासून चार पावले लांब होते. फक्त माहित झाले संत संताजी महाराज एक महान होते. माहीती वाघोली गावातील जाधव गिरण वाल्याने व ह. भ.प. दहितुले बुवांनी दिलेली अभंग वाचावेत गावेत तर अक्षर ओळख नाही. परंतू ते वारीत सामील होताच त्यात मगन् झाले. वारकर्यांचा जीवन क्रम समजुन घेतला. आपल्या वागण्यात, रहाण्यात बदल करून घेतला. पालखी सुदुंबरे ते पंढरपूर नेहण्यात सर्वच असतात पण परतीला हा समुह कमी आसतो. परंतु काळे हे पालखी जाताना येताना बरोबर थांबतील. या वाटेवर त्यांच्यात अमुलाग्र बदल झाला. नवी दिृष्टी, नवा विचार, नवा आचार त्यांना आपला वाटला.
थोड्याच काळात ते संताजी मय झाले घरी आल्यावर, तुकोबांची गाथा ज्ञानेश्वरी सुनाकडून वाचुन घेऊ लागले. हरीपाठ वाचून घेता घेता पाठ करू या ही पेक्षा ते संताजी मय झाले. यातूनच एक विचार जोपासला ते रहात असलेला परिसर पुण्या लगत परंतू तसा माळरानाचा. आपली भरपूर जागा व शेती. या परिसरात संताजी मंदिर बांधवयाचे व परिसराला संताजी नगर नाव द्यावयाचे. हा विचार घरात सांगीतला सांगताना हे ही सांगीतले मी कष्ट करेल त्या कष्टातून मंदिर उभे करेल. जर मी दमलोच तर तुम्ही साथ द्या. त्याप्रमाणे त्यांनी एक गोडाऊन मध्ये रात्र पाळीला वॉचमनचे काम केले. त्यातून १५ हजार रूपये आले. हे पंधरा हजार रूपये व स्वत:ची जमीन मंदिराला दिली. भुमी पुजनास मा. डॉ. प्रकाश महिंद्रे, मा. नंदुशेठ क्षिरसागर मा. माणिकराव पाटील आसे मान्यवर होते. एक उमेद आली या उमेदीतून उभे राहिले. घरातील जुनी सायकल घेतली आणी या सायकलीवरून जाऊन एक एक रूपया गोळा करू लागले. कधी सहकार्य कधी उपदेश घेऊन ह.भ.प. दहितुले बुवांनी मुर्ती दिल्या व मंदिर पुर्ण झाले.
एक साधा शेतकरी, शिक्षण नाही, राबणे आणि राबणे वढेच माहित होते. या आडगळीतून भक्तीमार्गात येऊन एक संताजी मंदिर उभे करू शकले आपल्या परिसराला संताजी नगर हे नाव देऊ शकले.