साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र शिर्डी येथे साई संताजी प्रतिष्ठाण अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु - वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा. शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 रोजी संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांनी आपल्या वधु-वरांचा सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे. या मेळाव्याची वैशिष्ट्ये मोफत प्रवेश, मोफत सुरूची भोजन, मोफत चहा पाणी, समन्वय कक्ष, सुसज्ज पार्किंग उपल्बध करण्यात येतील. जे वधु-वर स्टेजवर येऊन आपला परिचय देतील त्यांना मोफत पुस्तिका देण्यात येणार आहे. मेळाव्याचे ठिकाण सिद्ध संकल्प लॉन्स, नगर- मनमाड रोड, साकुरी (शिर्डी) ता. राहाता, जि. अहमदनगर, संपर्क कार्यालय हॉटेल बँक बिल्डींग, नगर - मनमाड रोड, गोंदकर पेट्रोल पंपासामोर, शिर्डी.