उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह येथे आज दि 30/06/2019 रोजी संपन्न झाली या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याबैठकीत खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली १) 70 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले २) कार्यक्रमाची नियोजन समिती स्थापन करून प्रत्येकावर जवाबदारी देण्याचे ठरले ३) सूत्रसंचालन करणारा व्यवस्थित व समाजातलाच असवा ४) इ ५ वी ला नवयोदय ला निवड झालेल्या विद्यार्थी व इ ८ वी ला शिष्यवृत्ती धारक झालेला विद्यार्थ्यांचा गौरव करणे ५) मेडीकलला लागलेल्या विद्यार्थींचा गौरव करणे, आय आय टी मध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे ६) १० जुलै पर्यंत सर्व तालुकाध्यक्ष यांनी विद्यार्थींची यादि देणे बंधनकारक आहे ७) नुतन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,रामदास जी तडस, विजय भाऊ चौधरी ओ बी सी नेते यांचा नागरी सत्काराने सन्मान करणे
या सर्व विषयावर चर्चा करून सर्वानुमते नियोजन ठरले या बैठकीस उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे,लोहारा तालुकाध्यक्ष भीमाशंकर डोकडे,कळंब तालुकाध्यक्ष सचिन देशमाने,उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी प्रसिद्ध प्रमुख कपिल नवगिरे,अमरनाथ राऊत,सुर्यकांत चौधरी,शाहुराज कचरे,अशोक चिंचकर,दत्ता शेवडे,दत्ता चिंचकर,रामलिंग ओटीकर,खंडु घोडके,शिवकुमार दळवी,परमेश्वर मेंगले,नागेश निर्मळे,इंद्रजित म्हेत्रे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते