दिनांक 12 मे, रविवारी श्री. शनिकृपा हितवर्धक तेली समाज, मुंबई व गट शिरवणे, दापोली खेड, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने लवेल येथे तेली समाजाचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी मुंबईहून प्रांतिक तैली महासभेचे व शैनेश्वर फौंडेशन चे ट्रस्टी श्री.विलासजी त्रिम्बक्कर, प्रांतिक महा सचिव श्री.जयवंत काळे, प्रांतिक महिला अध्यक्षा सौ.रोहिणी महाडिक व जनसंपर्क महिला सौ.मनीषा चौधरी ह्यांनी आपली उपस्थिती नोंदविली,ह्या समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून श्री विलासजी ह्यांचा सत्कार करण्यात आला त्या नंतर श्री विलास त्रिम्बक्कर ह्यांनी फाईबरची श्री संताजी महाराज जगनाडे ह्यांची मूर्ती श्री.शनिकृपा हितवर्धक मंडळास विनामूल्य सुपूर्त केली,ह्या समयी मुंबई अध्यक्षश्री.कृष्णा राऊत, स्थानिक गटप्रमुख श्री.अनंत राहाटे, प्रा.महाडिक,सौ.अरुणा इंगवले,माजी अध्यक्ष श्री.रमाकांत राहाटे व इतर मान्यवर मंडळी हजर होत्या. त्यांनी आपल्या भाषणात समाज प्रबोधन केले,अनुक्रमे काळे साहेब,रोहिणी महाडिक,अरुणा इंगवले,प्रा.महाडिक साहेब ह्यांची मोलाची भाषणे होऊन दुपारी 4 वाजता ह्या कर्क्रमाची सांगता झाली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade