नेवासा :- तैलिक समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण नेहमी तत्पर राहू त्यासाठी तैलिक समाज बाधवानी साथ द्यावी समाज उत्कर्षासाठी आपण काम करू अशी ग्वाही महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष भागवतराव लुटे यांनी केले.
नेवासाफाटा येथे शुक्रवारी द. 12 ऑगष्ट रोजी आयोजित तैलिक समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कारभारी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. विद्याताई कर्पे, सौ. नगारे, निरीक्षक सुधाकर कवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरूषोत्तम सर्जे भानसहिवरो सरपंच देविदास साळूंके, पोलीस अधिकारी प्रकाश लोखंडे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रांरभी तैलिक समाजाचे नेते देविदास साळूंके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. याप्रसंगी समाजाचे कार्यकर्ते बद्रीनाथ लोखंडे, गणेश - देशमाने, युवा नेते विशाल पवार, अर्जुन महाले, विजय दहीवाळकर, श्रीधर साळूंके, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरषोत्तम सर्जे यांनी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांं सह तैलिक समाजातील गुणवंत विद्यार्थांचा समाज गौरव चषक देऊन सत्कारा द्वारे गौरविण्यात आले.
यावेळी तैलिक समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना श्री. लुटे पुढे म्हणाले की तैलिक समाजाच्या हितासाठी कार्यकर्त्यांच्या सुचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असून पदाधिकार्यांमार्फत समाज संघटित करण्यासाठी समाजाची जनगणना करणार व जिल्ह्याची डिरेक्टरी काणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. उत्साह टिकून ठेवा, बंधुत्वांचे नाते निर्माण करा, साथ द्या, समाजाच्या उत्कर्षासाठी काम करू ही ग्वाही त्यांनी उपस्थित समाज बांधवांना दिली. अध्यक्षीय भाषात प्रा. कारभारी वेलजाळी म्हणाले की तैलिक समाज शेती व्यपार, प्रशासनात अग्रेसर आह. मागील इतिहासत अनेक प्रकारची युदधेझाली. सदाच्या कलियुगात चांगल्या विरूद्ध वाईट प्रवृत्तीचे युद्ध आहे. अशा परिस्थितीत समाजाभिमुख वाटचाल समाजाने करावी असे आवाहन त्यांनी समाज बांधवांना केले. माजी जिल्हापरिषद सदस्य पुरूषोत्तम सर्जे यांनी अभर मानले.