घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (2)
विदर्भ तेली संघर्ष समितीचे प्रमुख मधुकर वाघमारे यांनी ४ पानी पत्रक तेली समाजाच्या राजकीय मंडळींना दिले. तसेच प्रसिद्धीस ही दिले. पण समाजाच्या खासदार, आमदार व राजकीय क्षेत्रातील मंडळींना साधी या पत्राची दखल ही घ्यावी वाटली नाही. तेली समाजाचे नाव पाहिजे. तेली समाजाची मते पाहिजेत. पण समाजाच्या हिताचा विचार येताच आपली सोय पाहिली जाते. परवा बिड मधील बातमी वार्या सारखी पसरली काही हौश्यांनी समाज पातळीवर आपल्या समाज निष्ठेचे प्रदर्शन ही भरवले. समाज पातळीवर या साठी की ही मते बिड मधील मेटे पर्यंत जाणार नाहीत याची सुरक्षितता. दुसरी गोष्ट संघर्षाचा नुसता मुखवटा त्याची साधी झळ ही पोहचणार नाही याची शंभर टक्के हमी. आशी ही संघर्षाची लढाई सुरू झाली. मी संपर्कातून सत्य समजून घेतले. ते बोलले ते आपल्याला नाही. ते बोलले ते त्यांच्या समाजातील व्यक्तीला म्हणजे संघर्ष कश्याला करावयाचा. या गोष्टीचा संबंध काय ?. अशी ही झकास पळवाट समोर आली. मला एक प्रश्न पडला समाज पातळीवर एका शब्दा साठी, एका रूपया साठी, पदासाठी, मी संघटनेचा निष्ठावान आहे. मी हायकमांडशी निष्ठा ठेऊन आहे. अशा प्रकारच्या पाट्या लावून वावरणारी जी मंडळी आहेत ती गप्प का ? कारण संघटना व हायकमांड म्हणजे यांचे दैवत्व या दैवत्वावर अप्रत्यक्ष टिका करून समाजाला डिवचले तरी गप्प का ? कारण ही मंडळी समाजपातळीवरी वाद, दमदाटी शिवराळ पणा यावर उभे असतात. मग ही भाषा या ठिकाणी गप्प का ? एकच समाज पातळीवर वाद खेळणे, संघर्ष करणे तसे सोपे आसते. आणि समाजा बाहेरील समाजाशी आणि त्यात जर मराठा, ब्राह्मण आसेल तर तोंडावर बोट हाताशी घडी ठेवण्यात मोठे पणा समजला जातो ? ही वास्तवता आहे.