आपल्या भारतीय इतीहासाला संत परंपरा फार पुरातन काळापासुन ज्ञात आहे. श्री. वेद व्यासपासुन ज्ञानेश्वर तुकाराम, तुळशिदास, नानकदेव, सावता माळी, संंत गोरा कुंभार आणि चोखा मेळा या ज्ञात अज्ञात अशा अनेक संत महापुरुषाना समाजाच्या उत्कर्षा साठी देह झिजवला.
या महान संतानी भारत वर्षात ज्याला समाज रचनेचा प्राण म्हणता येईल अशी, "नैतिक मुल्य” समाजासाठी निकोप वाढीसाठी रुजविनी जोपासली व वाढीस लावली. अशी नैतीकता समाजाच्या सर्वच पातळयावर संतच वाढवतात. समाजाच प्रबोधन व वैचारिक जागरण हे नेहमी संताच्या माध्यमातुन होत आलेले आहे.
महाराष्ट्राला संताची फार मोठी समृध्द अशी पंरपरा लाभलेली आहे. याच परंपरेला भुषणभुत ठरलेले श्री. संत शिरोमनी जगनाडे महाराज हे संत परंपरेतील थोर संत होवुन गेले.
संत जगनाडे महाराज हे संत तुकाराम महारांजाचे शिष्य होते. व ते तेली समाजाचे होते. खरेतर संताना जात नसते. संताचे कार्य अखिल मानव जातीच्या उध्दारासाठीच असते.
जगनाडे महाराजाचा जन्म 8 डिसेंबर 1624 मध्ये पुणे जिल्हातील मावळ तालुक्यातील खेड जवळील संदुबरे येथे झाला. संताजी महाराजाचे वडीलांचे नाव विठोबा जगनाडे व आईचे नाव माथाबाई असे होते. हे पांडुरंगाचे निरसीम भक्त होते. त्यामुळे लहानपणापासुन महाराजांच्या बालमनावर धार्मीकतेचा पगडा होता. त्यांचे घरची आर्थीक परिस्थिती चांगली होती. श्री. संताजी जगनाडे महाराजांचे शिक्षण लिहीता वाचता येणे व हिशोब करता येणे एवढेच मर्यादीत होते. त्यांचे अक्षर अतिशय सुंदर व वळणदार होते. महाराजांवर आई वडीलांच्या धार्मीक सस्कारामुळे ते भजन किर्तनाला जात असत. जवळच असलेल्या चकेश्वर मंदिरात भजन किर्तन चालत असे. एकदा असे झाले देवाचा नैवद्याचे ताट ते मंदिरात घेवुन गेले असता तेथील मंडळी भुखी कष्टी असल्याचे महाराजांचे निदर्शनास आले. नैवेद्याचे ताट त्यांनी मंदीरातील मंडळीला खाण्यासाठी देवुन टाकली.
संताजी घरी परत आल्याने झालेलावृतांत आई वडीलांस सांगीतला अन्नाची गरज देवा पेक्षा मंदिरातील व्यक्तीना होती. म्हणुन मि ताट दिले. महाराज माणसात देव पाहात होते.
"जे काय रंजले, गांजले त्यांशी म्हणी जो आपुले ।
तोच साधु ओळखता देव तेथीची जाणावा।।"
अशी त्यांची मनोवृत्ती होती. महाराजांचे अल्प शिक्षणानंतर त्यांची प्रांरपारीक व्यवसाय तेल गाळणे व विकणे या व्यवसायाकडे वळणे व वडीलाचे व्यवसायात मदत करुन लागले.
सदरील कालखंडात बाल विवाहाची प्रथा होती. संताजी महाराजाचे वय अवघे 12 वर्ष व त्यांची पत्नी यमुनाबाई यांचे वय 7 वर्षाचे असतांनाच त्यांचे लग्न झाले. परंतु विवाह बंधनात अडकल्यामुळे त्याचा वेळ संसारात जावु लागला खरा, पण लहाणपणापासुन झालेल्या धार्मीक संस्कारामुळे त्याचे मन संसारात लागत नव्हते. त्यामुळे त्यांचे मन भजन किर्तन व समाज कार्यात अग्रेसर राहु लागले. योगा-योग म्हणजे संत तुकाराम महाराजाची जगनाडे महाराजाची सासुरवाडी एकच होती ति म्हणजे 'खेड.
चाकण येथे चकेश्वराचे मंदिर आहे तेथे संत तुकाराम महाराजाचे किर्तन होत असे व संताजी नित्यनेमाने किर्तन श्रवणास जात असत त्यामळे त्यांची आध्यात्माकडे ओढ निर्माण झाली. अन्तरीक चैतन्याची अनुभुती येण्यासाठी मानसांला दिव्यलाचा स्पर्श व्हावा लागतो. त्याच प्रमाणे संताजी महाराजांचा जिवणाला संत तुकाराम महाराजाचा “स्पर्श" असाच महत्वपुर्ण होता. तुकाराम महाराजांही संसारात राहुनही परमार्थ करता येतो असा हितोपदेश संताजीना केला. संत तुकाराम महाराजांचे सोबत राहुन त्यांची अंभगे तोंडपाठ करणे व लिहीणे हे त्याचे नित्यकर्म झाले. तुकाराम महाराजांच्या प्रमुख 14 टळकऱ्यात त्याची गनणा होवु लागली.व तुकाराम महाराजाचे लेखक म्हणुन लोक ओळखु लागले. संताजी महाराजांना तुकाराम महाराजाचा 16 वर्षे सहवास लाभला.
संताजी तेली बहुत प्रेमळ ।
अभंग लिहीत बैस जवळ
धन्य त्याचे भाग्य सबळ ।
संग सर्वकाळ तुकयांच्या।।
-संत गोपाळ महाराज (संत तुकाराम महाराजाचे नातु)
तत्कालीन सनातन्यांना संत तुकाराम महाराजाची वाढती लोकप्रियता आवडली नाही. त्यामुळे तुकाराम महारांजाचा विरोध करु लागले. त्यांचा छळ करण्यास सुरवात झाली इतकेच काय तर त्यांनी लिहीलेली सर्व अभंगाची गाथा इद्रायणी नदीत बुडवुन नष्ट केल्या गेली.
परंतु संत संताजी जगनाडे महाराजानी संत तुकाराम महाराजांचे लिहलेले अंभग तोंडपाठ असल्यामुळे सर्व अभंग पुन्हा लिहुन काढले.
त्याच बरोबर संताजी महाराजानी "शंकर दिपीका" "योगाची वाट" “निर्गुर्णाचे लावण्य" "तेल सिंधु" इत्याची ग्रंथाची निर्मीती करुन संत अभंगाद्वारे लोक जागृतीचे काम केले.
1. भक्ती ते माऊली माझे नच पोटी।
जाणे उठाउठी देवराया।। 1 ।।
भक्ती या भावाची करुनिया लाट। अलगिंतो तीस रात्रंदिन ।।2।।
संतु म्हणे आपल्या कृपेचा प्रसार। घ्यावा मजलागी मजलगी।।3।।
2. आणिक ते तेल घेतले कोणी।
गोऱ्या कुंभारांनी चोख्या महारांनी।।
तसेच घेतले नरहरी सोनारांनी।
कबिरांनी आणि रोहिदास चाभारांनी।।
संतु तेली म्हणे घ्याहो तुम्ही तेल।
त्यांचे तुम्हा मोल देईल पांडुरंग ।।
अशा प्रकारच्या अनेक अभंगाची निर्मीती त्यांचे नावांवर आहे. सतांजी महाराजांच्या शेवटच्या क्षणी (इहहीकीचा त्याग) केल्यानंतर तुझ्या मुठ मातील येणार असे वचन तुकाराम महाराजांनी दिलेले होते. संत तुकाराम महाराज संताजी महाराजांचे अगोदरच वैकुंठवाशी झाले होते. तदनंतर जेव्हा संताजीने देह ठेवला तेव्हा अंतिम समयी संताजी महाराजांचे शरीर कितीही प्रयत्न करुन झाकल्या जात नव्हते त्याचा चेहरा उघडाच राहत होता. तेंव्हा वचना प्रमाणे संत तुकाराम महाराज वैकुंठावरुन परत येउन तिन मुठ मती टाकली व संताजी महाराजांचा देह झाकला गेला. आपल्या पार्थीव शरीराचा त्याग करुन संताजी महाराज ब्रम्हलीन झाले. अशा आख्यीका आहे. इस 1688 ला मार्गशिर्ष वद्य त्रयोदशीला महाराज वैकुंठ वाशी झाले.
भारताचे राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांच्या काळात दि. 09 फेब्रुवारा 2009 ला संत शिरोमणी जगनाडे महाराजांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टल तिकीट प्रसिध्द केले.
जसे जसे उंच जावे तो तो आकाशांच्या कक्षा रुंदावत जातात त्याच प्रमाणे संत जगनाडे महाराजांचे चरित्र व कार्याचा अवाकाही प्रंचड मोठा आहे. हा अल्पसा जिवन गाथा पुष्पस्मरण त्यांचे चरणी सादर करतो.
न्युन ते पुरते। अधिक ते सरते।। करुन घ्यावे हे तुमते। विनवितु असे ।।
हरि ओम तत्सत. दिव्यत्वाची जेथे प्रचिती। तेथे कर माझे जुळती ।।