घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (3)
मी २००९ साली मराठे आपले भाऊ आहेत का ? या नावाचे पुस्तक लेखन करून प्रसिद्ध केले. २०१३ साली खर्या ओबीसींवर होणारा अन्याय हे पुस्तक प्रसिद्ध केले. पुणे येथे ओबीसी तर्फे आरक्षण बचाव अभियानांतर्गत जो मोर्चा २०-११-२०१३ काढला त्यात सुकाणा समितीचा प्रमुख होतो. मराठ्यांच्या ओबीसीतील घुसखोरी बाबत ऑगष्ट २०१३ मध्ये पुण्यात अभियान संपन्न केले. हजारो ओबीसींच्या जाहिर परिषदा महाराष्ट्रात घेतल्या. म्हणुन अधीकाराने सांगू शकतो. समाज पातळीवर फड गाजवणारी फडकरी मंडळी तेंव्हा कोठे होती ? तेंव्हा विनायक मेटे महाराष्ट्रभर वातावरण तापवत होते त्यावेळी समाजाच्या फडावरील मंडळी खाजगीत सांगत मराठ्यांशाी पंगा नको रे बाबा. बीड मधील हणुंमत उपरे यांनी उच्चवर्णींयांना ठणकावून सांगीतले ओबीसी बौद्ध धर्माच्या वाटेवर. तेंव्हा अभीयानाची मिटींग एका शहरातील तेली समाज कार्यालयात ठेवली. सर्वांना एसएएम.एस. गेले. मिटींग दुपारी पण सकाळी अध्यक्ष कळवितात देशमाने समाज कार्यालयात मिटींग नको. या नंतर बरोबर ३ महिन्याने एका शहरात अभियान होते. समाजातील एक पी.एस.आय. महाराष्ट्रातील हायकमांडला सांगावयास गेले. त्यांनी तोंडावर हात फिरवला. परंतु हेच महाशय जाती अंताची लढाई किती बेगड लावून आम्ही लढतो हे मला फोन केल्यावर समजुन आले. कारण बौद्ध धर्मात जायचे का नाही हा प्रश्न नंतरचा पण पिळणार्या समाजाला हा एक दणका आहे. हे समजुन घेण्यास हायकमांड समर्थ नसेल तर आमदार विनायक मेटे यांचे चुकलेच नाही ? या ही पुढचा प्रसंग मांडतो मला टिका करावयाची नाही. मला परिवर्तनाचे, संघर्षाचे होमकुंड विझू देवायचे नाही. कारण हे होमकुंड संत संताजींनी सुरू केले. ते तेवत ठेवायचे यातूनच एक वेळ सर्वांना जावे लागेल. आणी पिळणारा वर्ग आपल्या दडपशाही सह संपेल. मराठा समाजास ओबीसी घेण्यासाठी सहा वेळा प्रयत्न केला पण यश येत नाही म्हणुन सत्तेत असलेल्या मराठा नेत्यांनी राणे कमिटी नेमली. या राणे कमिटीने अहवाल तयार केला. इथे न्याय देणारा व न्याय मागणारा एकाच समाजाचा म्हणजे न्यायाची अपेक्षा काय करणार. सत्तेतील ओबीसींनी जरा कुरबुर केली असावी. त्याचप्रमाणे ओबीसी संघटना रस्त्यवर उतरण्याच्या तयारीत होत्या. आशा वेळी राणे कमिटी संघटना व्यक्ती यांची मते जाणून घेणार होते. अनेकांना फोन केले. त्यातील काही समाज संस्था व महाराष्ट्र तेली महासभेचे जिल्हा पातळीवरील अध्यक्ष व पदाधिकारी पुणे विभागासाठी आले या नंतर नाशिक विभागत राणे कमिटी जाणार होती. त्या दिवसा आधी त्या विभागातील अनेकांना फोन केले उत्तर काय आम्ही नांदेड येथे चिंतन शिबीरास निघालो आहे. समाजाचे मराठा अतिक्रमण किती तरी मोठे पण उघड संघर्ष नको.