तेली समाजातील महान विभुती (भाग 2)
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
संत दमडाजी महाराज
नागपूरपासून पश्चिमेस 21 किलोमीटरवर वर्हाड नावाचे गाव वसले आहे. येथे टापरे या आडनावाचे क तेली घराणे आहे. या घराण्यात 150 वर्षांपूर्वी भिकाजीबुवा यानावाचे सत्पुरूष होऊन गेले. दमडाजी महाराज हे भिकाजीबुवांचे चिरंजीव. लहानपणापासून भक्ती, साधना, पूजापाठ, नामस्मरण यात दमडाजींचा वेळ जात असे. त्यांची कीर्ती तालुका ओलांडून जिल्हाभर गेली. तेली जातीतील एक सामान्य माणूस इतक्या लैकिकास पोहोचल्यावर त्याचा उत्कर्ष समाजकंटकांना सहन झाला नाही. त्यांनी त्यांची चेष्ट आणि हाल आरंभला. मात्र सत्याच्या मागे ईश्वर असतो याचा पडताळा आला. हाल करणार्यांचा परस्पर नाश झाला. 1912 साली महाराजांनी विठ्ठल रखुमाईचे भव्य मंदिर बांधले. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि मंदिरावी व्यवस्था लावून दिल्यावर त्याच दिवशी बरोबर एक वर्षाने त्यानी देह ठेवला. विठ्ठल मंदिराच्या पायरीशी त्यांची समाधी बांधलेली आहे. दर एकादशीस येथे अनेक लोक दर्शनास येतात. आषाढी आणि रामनवमीला मोठी यात्रा भरते.