औरंगाबाद माजी ऊर्जामंत्री, भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेवर संधी देऊन तेली समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व तेली सेनेतर्फे गडकरींना निवेदन देण्यात आले.
'बावनकुळे महाराष्ट्रातील एक लोकाभिमुख नेते आहेत. त्यांना विकासाची दृष्टी आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्व शैलीमुळे, संघटन कौशल्यामुळे भाजपचा जनाधार सातत्याने वाढत आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.
या वेळी तेली समाजाचे विभागीय अध्यक्ष कचरू वेळंजकर, विभागीय सचिव भगवान मिटकर, प्रदेश संघटन सचिव तथा तेली सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, शहराध्यक्ष सुनील क्षीरसागर, कार्याध्यक्ष महिंद्र महाकाळ, महिला अध्यक्षा लक्ष्मी महाकाळ, आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.