घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (5)
कुमार केतकर लोकसत्ता दैनिकाचे संपादक आसताना समुद्रातील शिव स्मारका विषयी उपहासाने संपादकीय लेखन केले. त्याच दिवशी त्यांना काळे फासले गेले. हे काळे फासणार्या मधे जन्माने दलित व ओबीसी जास्त होते छ. शिवरायाचंा बापच जेम्स लेनने बदलला त्याला माहिती पुरवली त्या ठिकाणावर जो हाल्ला झाला त्यात जे होते ते संख्येने दलित व ओेबीसी होते दादोजी कोंडदेव हा गुरू नव्हे या बाबत रान माजले तेंव्हा आमच्या संघटनेने त्यांना साथ सोबत ही दिली. आगदी २०१३ मध्ये पुणे येथे इंग्लिश स्कुलच्या प्रारांगणात शिव संग्राम तर्फे मोठी सभा झाली या सभेच्या कामात एक अंबिके नावाचा युवक सामील होता. यावेळी मला काही बांधव घेऊन निघाले होते. मी गेलो नाही. दोन दिवसानी फोन आला त्या अंबिकेयुवकाने जीव संपवला. का तर एका मराठा समाजातील मुली बरोबर विवाह ठरवला त्यांची ही झालेली शोंकांतिका. हे या साठी मांडले की आपण सर्वच गाफील कसे राहुन बेसावध कसे राहु. याचे नियोजन केले जाते. अगदी २००३ ला आसा राष्ट्रवादी (मराठावादी) कॉंग्रेसच्या शरद पवारांच्या पायावर डोके ठेवण्यासाठी सुदूंबरे येथे मेळावा घेतला. आणी तारणकर्ते ठरणार म्हणुन मा. छगन भुजबळ यांच्या सह मा. जयदत्त क्षिरसागर यांना वाटले. पण सत्य काय याच वेळी मराठा - कुणबी ही अस्तीवात नसलेली जात निर्माण केली गेली. हे प्रमाण पत्र मिळवण्यासाठी काही लाख लागतात. दुसरी चाल आसी निवडणूकी आल्यावर ओबीसी कोर्टात जाणार कोण ? कारण या मराठा - कुणबी जी. आर. ला अव्हान देणार कोण ते द्याव तर सर्व पक्षातील मराठा समाज सहकार्यापासुन दूर. आणी मुल जन्मताच त्याचे मराठा - कुणबी प्रमाणपत्र अनेकांनी मिळवेले. आज पुणे शहरात २२ नगर सेवक, पिंपरी चिंचवड मध्ये १९ नगरसेवक व अ. नगर महानगर पालिका व नगर जिल्हा परिषदेमध्ये जवळ जवळ सर्व मराठा - कुणबी म्हणुन सत्तेत आलेत. शासकीय नोकर्या, विद्यार्थी शिष्यवृत्ती, विद्यार्थी सवलतीचे प्रवेश, ओबीसी विकास महामंडळाचे लाभार्थी हे मराठा- कुणबी जास त आहेत. आशा वेळी समाजाची संघटना मुलुख मैदान तोफ, शिवराळ तोंडे गप्प का ? आम्ही ओबीसी सेवा संघा तर्फे लढाई लढली व लढतो सुद्धा| समाजाच्या हितासाठी राबवले जाणारे चिंतन शिबीर न म्हणता मी त्याला इथे चिंतनाचे बुजगावणे म्हणतो, कारण समाजाला संपवणार्या आशा बाबीवर इथै चिंतन झाले नाही. आणि कधी कोण बोलला तर त्याला झटकुन टाकण्यात आनंद मांडला.