तालुका मौदा स्नेही सोशल फोरमचे पाचवे वार्षिक स्नेह संमेलन व कोजागिरी कार्यक्रम प्रगती सभागृह वर्धा रोड नागपूर येथे नुकताच पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून आमदार रामदास आंबटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, जवाहर विद्यार्थी गृह अध्यक्ष रमेश गिरडे, नगराध्यक्ष स्मृती इखार, स्नेही सोशल फोरमचे अध्यक्ष शंकर लांजेवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ए. जी. भोळे, महामेट्रोचे महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, मेडिकलचे उपअधिष्ठाता डॉ. दिनकर कुंभलकर, गोंदियाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे, भंडाऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप तलमले,
उपविभागीय अधिकारी सूरज पडोळे, हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, अखिल भारतीय तैलीक महासभेचे राष्ट्रीय सचिव सुभाष घाटे, सहसचिव बळवंतराव मोडघरे, डॉ. चंद्रकांत रागीट, विजया मारोतकर, कवियत्री लेखिका किशोर चन्ने, बाबासाहेब डाबरे व अन्न मान्यवरांची उपस्थिती होती.
नेही सोशन फोरम तर्फे पीएचडी प्राप्त व दहावी, बारावी तसेच देशामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करून सन्मानित केले. यावेळी स्नेही सोशन फोरमचे ५५० सदस्य व त्यांचा परिवार व इतर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. शंकर लांजेवार यांनी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना वर्षभर असणारे कार्यक्रम ज्यष्ठ नागरिकांचा सत्कार समाजातील पदोन्नती व सेवानिवृत्ती व दहावी, बारावी विद्याथ्यांचा सत्कार वीज बचत व पाणी बचत निःशुल्क कार्यशाळा पार पडली.
शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी मार्गदर्शन तसेच सामाजिक दृष्टीने वेगवेगळ्या गावात जाऊन रोगनिदान शिबिर व ब्लँकेट, कपडे व औषधी वाटप करने तसेच गरीब मुलांचे व वयोवृद्ध व्यक्तीचे आर्थिक रूपाने मदत करणे तसेच आत्महत्याग्रस्त व सैन्यात वीर मरण आलेल्या पाल्यांना दत्तक घेऊन मदत केली. २०१७-१८ वार्षिक अहवाल सादर केला. तसेच निखिल भुते यांनी युपीएससी व एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आयोजना करिता अनिल कहारे, दिलीप देशमुख, आर. टी. जेस, ए. के. झाडे, एन. पी. सावरकर, दीपक भोळे, केशव भोळे, अरूण करंजेकर, मुरलीधर जयपुरकर, सुखदेव इखार, निखिल भुते, राजू बावणकर, मोहन वैरागडे, मंगेश भिवगडे, सौ. रमन लांजेवार, कु. अश्विनी भुते, बोसुरकर, सौ. देशमुख, सौ. कहारे, कु. वनश्री गोळे, डॉ. ऐश्वर्या इखार, भावना चौधरी यांनी सहकार्य केले. संचालन प्रविण आष्टनकर यांनी तर प्रास्ताविक निखिल भुते व शंकर लांजेवार यांनी केले. आभार अनिल कहारे यांनी मानले.