घाण्याचा बैल, बैलाची झापड व चिंतन शिबीर भाग (6)
आ. विनायक मेटे हे बिड जिल्ह्यात आ. जयदत्त क्षिरसागर यांच्या जवळील मराठा कार्यकर्त्याना म्हणाले असे समजते. ते सत्य असत्य याचा ठाव ठिकाणा लागू दिला जात नाही. परंतू काही निषेध व्यक्त करतात काही पळवाटा शोधतात. पण तेली, माळी सुतार, लोहार, शिंपी कुंभार परीट वंजारी आशा जातींना गलित गात्र करणारी संस्कृती मधील विकृती आहे त्या बद्दल चिंतन होणार आहे का ? का नुसती सिंहगर्जना, नुसत्याच जेवणावळी नुसताच संताजी उत्सव, वधुवर मेळावे समाज पातळीवरचा नुसताच संघर्ष म्हणजे समाज कार्य हे असे आहे म्हणुन मेटे कार्यक्रमात बोलणारच. दुबळ्यांचा निषेध मराठा व ब्राह्मण जमेस धरत नाहीत.