तडित जैसी कडाडे ताई तेलीण
लेखक - सुकलाल नथू चौधरी
तेलियांचे सुपूत्र - कन्या म्हणून या भारत देशात अनेकांनी अनेक क्षेत्रात आपले योगदान देऊन समाजसेवा केलेली आहेत. कोणतीही प्रसिध्दी किंवा कर्मफळाची आस न धरता निरलस सहकार्य करत राहाणारर्या सर्वच कार्यश्रेष्ठांची माहिती आज उपलब्ध नाही. जी उपलब्ध आहे, त्यांची नावंही काळाच्या पडद्यावर पुसटशी व्हायला लागलेली आहे. आज त्यांची नोंद ठळक करणं आवश्यक आहे.
महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या तुळजाभवानी मातेचा परमप्रिय भक्त, अहमदनगर जिल्हयातील बुर्हाणनगर येथील राहाणारा - जानकोजी तेली. आयुष्यभर अध्यापन करता करता अध्यात्मिक अधिकारी म्हणून नावारूपास आलेले मुंगसाजी महाराज, दामा शहर, उत्तर प्रदेशातील रहिवासी - सेवाश्रमाचे संस्थापक - संत घोगलेमहाराज, समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे संत काळोजीमहाराज, महान शिवभक्त एकलिंगजी तेली. परमपूज्य संत गोटीरामयाव्या. शिखर शिंगणापूरच्या चैत्र शुफ द्वादशीच्या पर्वणीवर 700/800 कावडयांमध्ये पहिल्या कावडीचा मान असलेला सासवड, जि. पुणे येथील संत भूतोजी तेली. भारतीय सुवर्णयुगाचा जनक - सम्राट समुद्रगुप्त मौर्य, जगप्रसिध्द अंजिठा - वेरूळ लेण्यांच्या उभारणीस हातभार लावणारा - गुजराथचा दानशूर दाता - भामाशाह, राजस्थानातील शूर राज्यकर्ते - हेमु राजे, सोरटी सोमनाथच्या मंदिराची उभारणी करणारे - दक्षिण भारतातील - चालुक्य राजे, बंगाल प्रांतातीलपालवंशीय राजे, असे अनेक तेलीयसुपूत्र इतिहासाला ज्ञात आहेत.
अगदी अलिकडे संताजी महाराज जगनाडे, कडोबामहाराज मुरडाजी तेली, वासुदेवबाबा दगडू तेली या संतांनी त्यांची जन्मभूमी अनुक्रमे चाकण-सदुंबरे, शेंदुर्णी व शिरपूर-चुंचाळे-वाई या स्थानांना देवमहात्म मिळवून दिलंच शिवाय आपल्या भक्तीसामथ्याने महाराष्ट्रात व भारतातील अनेक राज्यांत आपले लाखो भक्त निर्माण करून स्वत:च्या शिकवणीची व शुध्दाचरणाची पूर्तता करून घेतली. त्यांच्याप्रमाणेच जोगा परमानंद हेही संतपदाला पोहोचलेले एक तेलीय सत्पुरूष होते.
पुरूषांप्रमाणे अनेक तेलीयमहिलांनीही स्वत:च्या कर्तृत्वाने इतिहासात जागा मिळवलेली आहे. उत्तरप्रदेशातील झाशीच्या संत कर्माबाई या पुरीच्या जगन्नाथ भक्तीने आजही अदृश्यरूपात जगन्नाथपूरीला नांदत आहेत. निष्ठेने तेलघाणा चालवणार्या रेजिया तेलिणीच्या घाण्यात स्वत: श्रीकृष्ण भगवान राहतात, असे स्वप्न रायपूर जिल्हयातील दृगलोचन राजाला पडलं. त्याने रेणियाला घाण्याचीच निदा मागितली. भगवान श्रीकृष्णाला दगलोचनकडे राहायचे नव्हते. ते अचानक घाण्यातून बाहेर आले. राजाने त्यांच्यासाठी देऊळ बांधले. तेच राजीवलोचन मंदिर म्हणून आज प्रसिध्द आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापण्यास आपलीही मदत व्हावी, म्हणून मोगलांनी ताबा मिळवलेल्या पन्हाळगडावरची गुप्त माहिती राजांना पुरवता पुरवता आत्मबलिदान करणारी, इतिहास प्रसिध्द, कोल्हापूरची शूर महिला गंगू तेलीण, परशुरामपंत प्रतिनिधींच्या जहागिरीच्या रक्षणासाठी तलवार घेऊन स्वत: लढाईसाठी सज्ज झालेली. त्यांची उपपत्नी, जिच्या शौर्याचा उल्लेख केल्याशिवाय सातार्याचा व वासोटा किल्ल्याचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही, अशी वीरांगना रमा उर्फ ताई तेलीण अशा अनेक संत-शुरवीर महिलांनीही तेली समाजाची समृध्द परंपरा प्रवाही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
रमा उर्फ ताई तेलिणीची तलवारबाजी
सातार्यातील एका गरीब तेली कुटुंबात रमाचा जन्म झाला. पाच-सहा वर्षाचं बाल्यजीवन संपता संपताच तिला आपल्या गरीबीची जाणीव व्हायला लागली. आईवडिल गरीबीत वाढले, तरी आपलं मनगट केवळ बांगड्यांची किणकिण वाजवण्यासाठी नसून, तलवारीचा खणखणाट करण्यासाठी आहे, अशी तिला ठाम खात्री होती. अनेक वेळा हातातल्या बांगड्या वर-खाली सरकवत ती आपल्या दणकट मनगटाचं निरीक्षण करत राही. हेच मनगट आपल्याला विलासी राजवैभव प्राप्त करुन देईन, असं तिला मनोमन वाटत राही.
जनरिती प्रमाणे 10-12 वर्षांची असतांनाच साता-यातील एका दरिद्री कुटुंबातच तिला सून म्हणून जावं लागलं. जातीरिवाज व वडिलधार्यांच्या वर्चस्वापुढे तिचे काही चालले नाही. तात्पुरती तडजोड म्हणून प्राप्त परिस्थीती स्वीकारून ती सासरी गेली. फाटकं धुडंत नेसून, गबाळ्या शरीराने मोलमजुरी करत आयुष्य घालवण्यासाठी आपला जन्म नाही, सुगंधी शरीरानं राजगादीवर लोळण्याची आज नाही उद्या आपल्याला संधी मिळणारच आहे, अशा दृढ विश्वासाने ती आला दिवस ढकलत राही.
दररोजच्या मजुरीचे दीड-दोन आणे सासूच्या हातावर टेकवल्याशिवाय तिच्या तोडाची टकळी थांबत नसे, सासरा - नवरा मजुरीला नाही गेले, तरी ती काही बोलत नसे. पण एखाद्यादिवशी पैसे न दिल्यास सासूचा तोंडपट्टा थांबवणे रमाला शक्य होत नसे.
सातार्याच्या उत्तरेला 5-6 कोसावर बामणोली नावाचे गाव होते. बामणोली पासून 10-12 कोसावर वासोटा किल्ल्याची घनदाट टेकड़ी सुरू होई. एकटी बाईमाणूस त्या दुर्गम एकांत झाडीतून किल्ला चढून जाणं धोकेदायक होतं. त्यातूनही बामणोलीहून किल्ल्याच्या टेकडीला जाण्यासाठी शिवसागर नावाचा - नावाप्रमाणे समुद्रासारखा -विशाल तलाव होता. होडीने तलाव ऑडल्याशिवाय वासोटा किल्ल्यावर जाणे शक्य नव्हतं. दिनांक 6 गुन 1660 रोजी श्री छत्रपती शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकल्यापासून तो आजपर्यंत पेशव्यांच्याच अमलाखाली असला, तरी सातार्याची जहागिरी परशुरामपंत प्रतिनिधींना मिळालेली असल्याने वासोटा किल्ल्यावर त्यांचाच ताबा होता. सहाजिकच शिवसागर तलावातील होडयाही मराठा सैनिकांच्याच ताब्यात होत्या.
वैधव्य म्हणजे महिलांना रक्तपितीरोगाचा अनुभव. विषारी आयुष्याची दुर्दैवी कु-हाड, असंच वैधव्याचं वर्णन केलं जातं.
पण रमाच्या बाबतीत .....? रक्तक्षय झालेला रमाचा नवरा ती अवधी 15-16 वर्षाची असतांना गेला. सुदैवानं आपल्याला साथ दिली, असंच रमा मालायला लागली. आपण दासी, बटकी, नोकरांच्या गराड्यात राजवाड्यात राहात आहोत, असं दिवास्वप्न ती पुन्हा पाहायला लागली,
आता ती सासूचं ऐकेना आणि सासर्याला जुमानी ना. ती सरळ बामणोलीला गेली. तेथे शंभर सैनिकांच्या मनसबदार नायकाचा एक छोटास टुमदार वाडा होता. बंदोबस्त चढाई, लढाई हातघाईच्या दिवसात तो नायक महिना महिना, दोन दोन महिने वाडयाकडे फिरकत नसे. त्याची बायको एकटीच राही. तिलाही कुणाची तरी सोबत हवी होती. तिनं रमाला राहण्यासाठी दोन खोल्यो रिकाम्या करून दिल्या.
नायिकिणबाईचा स्वयंपाक करणे, तिच्यासोबत वासोटा किल्ल्यावरच्या श्रीभवानी देवीच्या दर्शनासाठी जाणे, मधून मधून गडावरच्या नागेश्वर गुहेच्या मध्यभागी असलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी नायिकीण बाईला सोबत करणे, ही कामे रमा करू लागली. किल्ल्याच्या सातारा दरवाज्यापासून नागेश्वर गुहेतील शिवलिंगाचं दर्शन घेणं फारच त्रासाचं आणि धोक्याचं होतं. एक तर रस्ता काटेकुटे, टेकडया - दर्यांनी दुर्गम केलेला होता. मधून मधून वीस - पंचवीस फूट उंचीवरुन खाली खळाळत वाहाणारे झरे, सपाट पाय वाटेवर थोडावेळ गाळत वाहातांना अचानक खालच्या शंभर सव्वाशे फुट दरीत कोसळत. त्यांच्या खळाळत्या प्रवाही आवाजाबरोबर अनेक वेळा वाघाच्या डरकाळयाही ऐकायला येत. अस्वलं, रानडुकरांचाही मधून मधून वावर दिसे. म्हणून जवळ शस्त्र असल्याशिवाय शिवलिंगाच्या दर्शनाला येत जाऊ नका, असं अनेक सैनिकांनी सांगितल्याने किल्ल्यावर येता - जाता रमा तलवार बाळगायला लागली. सणावारी कधी वासोटा किल्ल्यात, कधी शिवसागर तलावाच्या काठावर तर कधी बामणोली गावाच्या पटांगणात सैनिक तलवार - दांडपट्ट्यांचा खेळ खेळत. हे खेळ पाहायला जाता जाता रमा स्वत:च त्यात भाग घ्यायला लागली, सरावल्यासारखी सफाईदार तलवार चालवणं हे रमाचे वैशिष्टय होउन बसलं.
परशुरामपंत प्रतिनिधी - 1777 साली वडील भवानराव पंत ज्या दिवशी वारले, त्याच दिवशी परशुराम पंताचा जन्म झाला. 1795 ला तो 18 वर्षांचा सज्ञान होईपर्यंत सातारा - कराडच्या त्याच्या दौलतीचा कारभार पुणे दरबाराकडूनच पाहिला जात होता. त्यासाठी नाना। फडणिसांनी कृष्णराव जोशी नावाचा कारभारी नेमला होता, परशुराम पंताने कारभार हातात घेतल्या घेतल्या कृष्णरावला परत पुण्याला पाठवून दिले. त्याच्या जागी उणेशपंत कात्रे व बळवंतराव फडणीस असे दोन नवे कारभारी नेमले. बळवंतराव व परशुरामपंतांची आई काशीबाई हे दोघे दौलतीचा कारभार चालवत, पण परशुरामपंताला ते आवडले नाही. आई व कारभारी यांच्या विरूध्द परशुरामचे मत असे. तेढ वाढत गेली. आपसात झगडे व्हायला लागले. सैनिकही दोन गटात वाटले गेले. दोघांच्या फौजा आपसातच लढायला लागल्या, परशुरामपंत प्रतिनिधी रदद नाना फडणीस व पेशव्यांचेही आदेश मानेनासा झाला. उलट रामोशांना हाताशी धरून परशुरामपंत स्वत:च्याच मुलुखात दरोडे घालून लुटीची रक्कम खाजगीकडे जमा करायला लागला.
सातारच्या जहागिरीचा कारभार स्वत: हातात घेतांनाच त्याने लक्ष्मीबाई व काशिबाई अशा श्रीमंत व खानदानी मराठा घराण्यातील युवतींशी विवाह केला होता. ऐन तारूण्यात लग्नाच्या बायकांकडे दुर्लक्ष करून जिवी कानी नावाच्या कसबीणीच्या तो पूर्ण आहारी गेला. राज्यकत्यांनी एकदोन अंगवस्त्र ठेवणं यात त्या काळाच्या मानाने नवीन असं काहीच नव्हतं. मात्र घरच्या लक्ष्मींकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने त्या त्याच्या दोन्ही बायका त्याला सोडून कोल्हापूर संस्थानातील त्याचे भाऊबंद विशाळगडकर प्रतिनिधी यांच्याकडे इ.स.1806 पासूनच राहात होत्या.
एकदा वासोटा किल्ल्याचा बंदोबस्त स्वतः पाहण्यासाठी परशुरामपंत बामणोलीच्या षरीववार तलावाच्या काठा अलि, सातारा संस्थानच आघपती या नात्याने त्यांच्या स्वागतासाठी पोटयाचे किल्लेदार, प्रमुख फडकरी व ज्या मनसबदार नायकाच्या वाड्यात रमा राहात होती ती नायिकीणबाई हे सर्व शिवसागरच्या काठावर हजर होते. नायिकीणीबरोबर रमाही हजर होतीच,
रमाने आतापर्यंत आपल्या तलवारबाजीने किल्ल्यावर बराच दबदबा निर्माण केला होता. खुद्द किल्लेदारापर्यंत तिचे तलवारबाजीचे कौशल्य पोहोचले होते.
विधवा असली, तरी रमा तरूण होती. बामणोलीच्या वाड्यावर ती नायिकीण बाईसारखी टापटिपीने राहायला लागल्याने तिची देहकांती उजळून निघाली होती. परशुरामपंत प्रतिनिधीच्या ती नेमकी मनात भरली. आणि बामणोलीच्या वाड्यातून ती सातार्याला संस्थानिकाच्या वाड्यात कशी दाखल झाली, याचं तिलाही नवल वाटत होतं. मात्र फार दिवसांची तिची राजगादीवर लोळण्याची इच्छा पूर्ण झाल्याने जन्म सार्थकी लागल्याचं ती समाधान उपभोगायला लागली होती.
परशुरामपंत प्रतिनिधींचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी सरदार बापू गोखलेंची निवड केली. परशुरामपंत प्रतिनिधी स्वत: रंगेल वृत्तीचा असला, तरी डरपोक नव्हता, बापू गोखल्यासारख्या मुरब्बी सरदाराशी दोन हात करायला तो अजिबातच भीत नव्हता. अडचण होती, ती पैशांची आणि सैन्यशक्तीची. त्याचे जहागीरीचे सैन्य दोन पक्षात वाटले गेले होते. त्याचा कारभारी बळवंतराव फडणीस व त्याची आई यांच्या ताब्यात काही सैन्य होते. अर्थात या त्यांच्या सैन्याचा पाठिंबा सरदार बापू गोखल्यांना असल्याने बापूचे बळ वाढले होते. त्याच्याशी समोरासमोर दोन हात करायला परशुरामपंत प्रतिनिधींची ताकद कमी पडत होती. तशात त्याच्याच जहागिरीची कारभारी व आईच्या अधिपत्याखालची मोठी सैन्य तुकडी बापूच्या सैन्याला मिळण्यासाठी निघाल्याची खबर मिळताच स्वतः शे पाचशे सैनिकांसह ती तुकडी टोखण्यासाठी स्वत: परशुरामपंत कराडच्या दिशेने चालून गेला. सरदार बापू गोखल्यांना ही बातमी समजताच त्याने चपळाई करून आपले सैन्य सातारच्या दिशेकडे वळवले. परशुराम पंतांच्या जहागिरीचे मुख्य ठिकाण कराडच होते.
सरदार बापू गोखला सातार्यावर चाल करन येत आहे व परशुराम पंत ज्या सैनिकी तुकडीच्या पारिपत्यासाठी बोला होता, त्या तुकडीपर्यंत पोहोचण्याआधीच त्याला पुण्याला बोलावून घेण्यात आलंय, तेथेच त्याला नजर कैदेत ठेवलेले आहे. हया दोन्ही बातम्या रमाला समजल्या. जहागिरीचं सरंक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावरच येऊन पडलेली आहे, हे समजताच तिने । जलद हालचाली करायला सुरूवात केली. ती त्वरीत वासोटयावर दाखल झाली. चार पाच महिने पुरेल येवढी दाळ - दाणा, धान्याची बेगमी केली. राजधानीच्या सरंक्षणासाठी कराडला आणि राजवाड्याच्या राखणीसाठी सातार्याला असलेल्या सैनिकांपैकी एकएक तुकडी वासोटयाला आणण्याचे हुकूम दिले. बामणोली व शिवसागरच्या किनार्या वरील सैनिकांना किल्ल्याच्या पायथ्याकडील घनदाट रानात पेरून सावध राहण्याचे आदेश दिले. जहागिरीतील हेरांना बाप गोखल्याच्या सैनिकी तळावर व पुण्याला पिटाळून गुप्त बातम्या आणण्याचे फर्मान सोडलं.
इ.स.1807 च्या जुलै महिन्यात सरदार बापू गोखल्याने रमाला निरोप पाठवला की, जहागिरीच्या ताब्यात असलेले किल्ले व ठाणी आम्ही ताब्यात घेतलेली आहेत. 3ाता। तुमच्या ताब्यात असलेला वासोटा आणि इतर राहिलेले सर्व किल्ले आमच्या ताब्यात देउन लढाईत होणारा रक्तपात टाळावा. आमचं काहीच नाही, पण या लढाईत परशूरामपंतांच्याच जहागिरीचं सर्वच बाजुने नुकसान होईल, याचा विचार करावा.फ निरोपाचा उलटाच परिणाम झाला. स्वतः माने जिरेटोप व तलवार धारण केली. किल्लयावरच्या सैनिकांना एकत्र जमवलं. प्रसंगाचं भीर्य लक्षात आणून मराठयांचं वतन, परशुरामपंतांचं संस्थान आणि कष्टाने मिळवलेल्या जहागिरीचं प्राणपणाने सरंक्षण करण्याची सैन्याला प्रेरणा दिली. सर्व सैनिकांनी ताईचा जयजयकार केला. या जयजयकारातून ताईची तीन बाबींची खात्री पटली. किल्लेदारासह सैनिकांनी रवीकारलेलं ताईंनी नेतृत्व, मनापासून किल्ला लढवण्याची सैनिकांची तयारी आणि शशी दोन हात करण्यासाठी ताईनी निवडलेली वासोटया किल्ल्यासारखी सुरक्षित जाग.!
वासोटयावरच्या ताईच्या हालचालींवर बापू गोखला लक्ष ठेवून होताच. ताईने केलेली लढण्याची तयारी ऐकूल तोही क्षणभर आवाक झाला. लढाईसाठी वासोटयासारख्या दुर्गम किल्ल्याची निवड केल्याचं पाहून बापूनेही ताईच्या युध्दनीतीला आणि धैर्याला मनोमन सलाम केला. त्याच वेळी बापूला ताईकडचं एक अकमक पत्र मिळालं. त्यात तिने लिहिलं होतं, बापू गोखले, वासोटा हा बेलाग किल्ला आहे. तो तुमच्या हाती पडणार नाही. पराभूत होऊन तुम्ही पुण्याला पेशव्यांना आपले तोंड कसं दाखवाल ? सरदार बापू गोखले, आपणास मी परत जाण्याची विनंती करते. शेवटी तिने पराभवानंतर बापूंची होणारी फजिती पुढीलप्रमाणे वर्णन केली होती.
श्रीमंत पंतप्रतिनिधी, यांचा किल्ला अजिंक्य वासोटा ॥
तेलीण मारील सोटा, बापू गोखल्या संभाळ कासोटा ॥
पत्र वाचताच बापू गोखल्याने वासोटा घेण्याचा निर्धार पक्का केला. इ.स.1808 च्या मार्चपासून वासोटा जिंकण्याची कारवाई निश्चयाने व जोमाने सुरू केली. किल्ल्याभोवती सक्त वेढा टाकला. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दर्याखोर्यात ताईने आपलं अल्पसं सैन्य पेरलं होतं. ही तिची युध्दनीती वाखाणण्यासारखी होती, पण त्यांनी वेढा तोडण्याचा प्रयत्न केला असता, तर त्यांची चटणी झाली असती. म्हणून ताईने त्यांनाही किल्ल्यावर बोलावून घेतलं.
तब्बल तीन महिने बापू गोखल्याने ताईच्या सैनिकांना किल्ल्यात कोंडून ठेवलं. तरीही ताई डगमगली नाही. बापूने या काळात बर्याच वेळा तहाची बोलणी करण्यासाठी निरोप पाठवला. ही लढाई आपसातली आहे. दोन्ही बाजूंनी होणारा रक्तपात हा मराठयांचाच होणार असल्याने, तो टाळावा, असा बापूचा हेतू होता. पण ताईने या त्याच्या विनंतीला मान दिला नाही.
शेवटी 30 मे 1808 रोजी सरदार बापू गोखल्याने किल्ल्यावर अचानक हल्ला चढवला. आणि किल्ल्यावर आपले निशाण चढवलं.
ताईला गिरफ्तार करून पुण्याला पेशव्यांच्या समोर उभं करण्यात आलं. ताईचं नातं, तिचं धैर्य व पराक्रमाचा विचार करून पेशव्यांनी तिला काही काळ नजर कैदेची शिक्षा सुनावली !
संदर्भ - सरदार बापू गोखले, ले. सदाशिव आठवले.
लेखक - सुकलाल नथू चौधरी खोपोली, ता.खालापूर, जि.रायगड. मो.नं.7620596204/7758942508