ब्राह्मण्याचे काळ श्री. संत संताजी महाराज.

- मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ, महाराष्ट्र.

    म्हणोत बापुडे संत संताजी हे संत संताजींचे लेखनीक म्हणोत जन हे संताजी हे संत तुकोबांचे शिष्य म्हणोत बापूडे संत संताजी हे तुकोबांच्या चौदा टाळकर्‍या पैकी एक, म्हणोत बापूडे संत संताजी हे फक्त हरिनाम पुरते म्हणोत, बापुडे संत संताजी हे तेल्यांचे होते. असे आनेक जन  आपल्या परिणे संत संताजींना समजतात पण मी संत संताजींना प्रथम मानवतेचा पहिला भाष्यकार, संंत संताजींना ब्राह्मणशाहीचा पहिला कर्दन काळ, मानव मुकतीचा पहिला योद्धा.  मी संताजींना समजून घेतले हे घेताना त्या वेळचे एैतिहासिक 

sant santaji jagnade maharaj photo

संदर्भ. त्यावेळचे सामाजीक ठेवण ही मुळात समजून घेतली तर. इतिहासात महात्मा फुले, राजषी शाहु, डॉ. अंबेडकर, संत गाडगे बाबा यांच्या बरोबरीने महाराष्ट्रात उभे राहू शकतात. आज या विचार पीठावर त्याचा मागोवा घेत आहे. हे पटत असेल तर सांगा आणी नाही पटलेतरी कळवा आपल्या विचाराची नोंद ही वाट चाल असेल.

उजळावयास आलों वाटा | खरा खोटा निवाडा ॥

    मी मागील अंकात संताजींनी वाटा उजळवल्या म्हंटले होते. या ठिकाणी पहिला प्रश्न हा आहे की. हा अभंग संत तुकारामाचा तो संत संताजींनी लेखन करून जपला संत तुकारामांच्या बरोबर किर्तनात तो गायला ही. म्हणजे तुकारामांचे लेखनीक व टाळकरी संत संताजी काहीजन संत संताजी हे लहानाचे मोठे देहूत झाले म्हणातात. चित्रपटामध्ये तसा प्रसंग ही दाखवतात. जर ते कुटूंब देहूत होते तर देहूगावात पिड्यान पिड्या रहाणारे एक ही घर आज का नाही. दुसरा प्रसंग असा  चाकण रूामल ही चाकण येथिल किल्ल्याची त्या काळची लेखण साहित्य. त्यात जगनाडे घराण्याचा संदर्भ सापडतो असो तेंव्हा संत संताजी चाकणचे. त्यांचे आजोळ सुदुंबरे त्यामुळे बालपण इथे गेले हे ही सत्य. सुदुंबरे ते देहू २/३ कि.मी. अंतर त्यामुळे संत संताजींचा संबंध लहान पणा पासूनचा हे सत्या जवळ ठेवूया. त्या काळात बाह्मणशाही मातली होती. संत नामदेवांनी त्यांना लोळवळले होते. आणि आसे लोळवणे पुन्हा नको यासाठी त्यांच्या घरातील सर्वांना जलसमाधी घ्यावी लागली इथे ब्राह्मणशाहीकडे बोट दाखवता येते. कारण पुन्हा शेकडो वर्ष आसा काळ येऊ नये यासाठी ब्राह्मण्य जागे असावे. म्हणून संत तुकाराम म्हणातात नामदेव विठोबा सह स्वप्नात आले आणि म्हणाले कवित्व नेटके कर. त्या काळात राज सत्ता मुसलीम परंतू धर्म सत्ता ही ब्राह्मण्याच्या ताब्यात या साठी मुसलीम  प्रशासनात राहून आपला वचक ब्राह्मणशाहीने ठेवलेला सामाजीक भेद हे धर्माच्या नावावर खपवलेले जन्मा पासुन मरे पर्यंत  कर्मकांड या कर्मकांडाला समाज पुर्ण कुजवलेला. देवळातला माणुुस म्हंटले की त्याला जे हवे ते देणे न दिल्यास धर्मशाास्त्रात अनेक शिक्षा ठेाठावल्या. या बद्दल का हा प्रश्न करणे हा सुद्धा फार मोठा अपराधाच्या विरोधात जो बोलेल वागेल त्याला जीवंत पणी मरण आसे. यामुळे समाज मन विरोधात बोलत नव्हते. राऊळातील देवा पेक्षा राऊळातील देवाच्या माणसाला देवबाप्पा म्हणून भजत होता. संत नामदेवांनी समतेचे ठिकाण पंढरपूर व पंढरपूर येथिल विठ्ठल निवडला. हे ठिकाण म्हणजे तरी काय ? बळीचा एक मुलागा बळीला जीवंत गाडल्या नंतर बिहारकडे गेला तेथून तो महाराष्ट्रात आला त्यांना पंडु म्हणत हे पंडू राजे पंढरपूरात राज्य करीत म्हणुन हे शहर पंढरपूर झाले. याच घराण्यातील महान पुरूषाने जनसामान्यासाठी आयुष्य पणास लावले म्हणून ते देव ठरले. म्हणुन विठ्ठल समतेची तेजोवलय ठरले. हा विठ्ठल संत संताजीनी मानला सामाजीक जगण्याची चीड त्यांच्या मनात साचत होती. या चिडीला साथ सोबत तुकोबांनी दिली. म्हणुन ते त्यांची शब्दांची शस्त्रे घेऊन लढण्याच्या लढाईत सामील झाले. इथे एक समजून घ्या त्या काळात अनेक तेली किंवा इतर जातीतले लोक तेंव्हा होते, मग संताजी नेमके सामील होण्यास नेमके कारण कोणते आसवे. तर नेमके कारण असे की त्यांची विचाराची बैठक ही सामाजीक जाणीवेतून झाली होती. त्यांच्यात स्वत:चे म्हणुन अंगभुत गुण होते. स्वत:ची एक विचार प्रणाली होती. आणी याच प्रणालीतून ते उभे राहिले. ब्राह्मणजाती पेक्षा ब्राह्मण्य पणावर त्यांचा मोर्चा होता. ब्राह्मण्याने झाकळून ठेवलेल्या वाटा उजळावयाच्या आहेत ही त्यांची जीवण प्रणाली होती. ही प्रणाली राबवताना त्यांना प्रस्थापीत ब्राह्मणशाहींने प्रथम हिन जातीचे समजून दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु दडपशाही झुगरावयाची हि दडपशाही झटकावयाची ही दडपशाही शब्दशा पायदळी तुडवायची आणी त्यांनी तेच केले.

चारी वर्ण जाले  एकाचिये अंगी | पापपुण्य भागी विभागिले ॥

    संत संताजींनी संत तुकारामांचे  अभंग लेखन केले. हे तुमच्या सह मी ही मान्य करतो माझे या पुढे मत आहे. लेखन करणे याचा अर्थ असा होतो की तुकोबांनी सांगीतले संताजींनी उतरले एवढे काम संत संताजीनी केले हे बिंबवले जाते पण हे पुर्ण सत्य नाही. पुर्ण सत्य हे त्या वेळच्या समाज व्यवस्थेत दडलेले आहे. सुताराने सुतारकी करावी, नाभीकाने केसच कापावेत. माळ्याने देवासाठी फुले द्यावीत, परिटाने कपडेच धुवावीत, तेल्याने तेलच काढावे. त्याला उभे केलेल्या पायरीवर उभे रहावे पायरी चढू नये चढला तर संपला. कदाचीत उतरला तर अधीक बरे. ब्राह्मण ज्याला धर्मशास्त्र समजते त्या धर्मशास्त्रात याच बाबी जास्त होतात. त्याचे पालन काल उघड होते आज ही सुशिक्षीत परिवर्तन इ.  मुखावटे रचून चालले आहे. त्या काळात ह्या झळा तिव्र होत्या. ब्राह्मणाचे देव काळानुरूप बदलतात. त्यांचे ठिकाण बदलतात ज्या देवाची चलती होऊ शकते त्या देवाच्या जवळ हे आसतात. आगदी पूर्वीचे देव त्यांचे आज अस्तीत्व नावा पुरते आहे. लोक मन जी कडे जास्त त्या ठिकाणी हे आसते. मग त्या ठिकाणी स्थळ महात्मा, देव महात्मा लिहीले जाते. या साठी अनेक कथा रचल्या जातात या कथा सत्य म्हणुन बिंबवल्या जातात. आणी वेळोवेळी बदल करून सत्य महात्मा जावून भक्त एकवटले व त्याच ठिकाणी कसे रमतील हा प्रवास यशस्वी करणे यात ब्राह्मण्याचे  हित आसते. ब्राह्मणशाही ही आशी जाणते. याची जाणीव संताजींना होती. तेली, माळी, वाणाी, सुतार, लोहार, परिट कुणबी, माळी आशा आठरा पगड जातीला हिन लेखून आडवलेले आहे. विठ्ठल हे सत्य विठ्ठलाची समता हे सत्य संत नामदेवांची समता हे सत्य ते रूजवताना ब्राह्मण्याचे मुखवटे टरा टरा फाडत होते. ते लोकांना सांगत वेद वाचने, एैकणे हे माझ्या बापजाद्यांना अधीकार नव्हता. त्यामुळे त्यावर विचार कसा करू. यावर तुकोबा व मी कधी बोललोच नाही. हे जे आम्ही रूजवतोय ते आमचे आहे. ब्राह्मणा, क्षत्रिाय, वैश्य व शुद्र हे चार वर्ण तुम्ही सांगता हे वर्ण एका शरीराचे आहेत म्हणता पाप पुण्य विभागले म्हणता. परंतू यात मध्य व अंत भेद कोणी केला. आंबा, बोर, वड, वाभुळ, चंदन ही झाडे वेगवेगळी आहेत परंतु अग्नी समोर दोन्ही एक म्हणजे तुम्ही भेद सांगता परंतू देवा समोर सारखे आहेत. हा उच्च हा निच हा भेद रूजवत होते. पूर्वीच्या वाटा ज्या अंधारून ठेवल्या होत्या व उजळण्यांचे काम संत तुकारामांच्या खांद्याला खांदा लावून केले हे एैतिहासिक विसरता येणार नाही.

लाजती पुराणें | वेदां येऊं पाहे उणें ॥

    एक किर्तनकार ग्रामिण भागात गेले गावातील प्रतिष्ठीत तेली बांधवांनी त्यांचे किर्तन ठेवले होते. किमान एका हाजार गावकरी उपस्थीत होते. मी ही उपस्थीत होतो. किर्तनकार आपले विचार गोड भाषेत मांडत होते. भक्त रंगून गेले. पण मी त्यांचे सावध राहुन किर्तन एैकत होतो. त्यांनी वि. ल. भावे यांच्यावर तुफान टिका केली. एक ब्राह्मण एका ब्राह्मणावर टिका करतो म्हणजे किर्तनकार किती मोठा ही चर्चा सुरू झाली. श्रिमंत  तेली बांधवानी भली मोठी बिदागी देऊन किर्तनकाराचा सत्कार ही केला. मी मात्र शांत होतो. बांधवाला  समजावयास गेलो तेे एैकण्याया अवस्थेत नव्हतो वि. ल. भावे. व संत संताजी यांचा संबंध काय ? आशा काही ज्या घटना आहेत हे जेंव्हा आपण अभ्यासू तेंव्हा संत संताजी यांचा संबंध काय ? अभ्यासू तेंव्हा संत संताजी समजण्याचा मार्ग सापडतो १८६० ते ७० दरम्यान संत तुकारामांच्या अंभंगांचे मोडीतून देवनागरी कारण करणे सुरू झाले. परंतु फक्त महिपती  आपल्या लेखनात म्हणतात चाकणचा संतु तेली तुकोबासह अभंग लेखन करी परंतू या दरम्यानच्या मंडळींनी संत संताजी हस्ताक्षरातील वह्या मान्य केल्या नाहित. ही वाटचाल अशीच सुरू होती. परंतू वि. ल. भावे यांनी १९२० च्या दरम्यान फक्त संत संताजींच्या अभांगावरून तुकोबा गाथा तयार केला. संत संताजींना दडपून टाकणारे ब्राह्मण आजही आपल्या पैशावर आपल्या जीवावर मुखवटे रचून वावरत आसेल तर चुक  कोणाची. आगदी पुराणातील वांगी पुराणातच बरी हे काही म्हणतात. या पुराणात काय आहे या पेक्षा या मध्ये आपला खरा इतिहास दडवून पूराणे तयार केलीत ही लबाडी शरमेने लाजु शकते. ज्याला वेद म्हणतो आणी वेदावर उभी असेलेली ब्राह्मणशाहीचे  ब्राह्मण हे उणे आहे.  हे बिंबवणारे संत संताजी होते. मोडीतले अभंग देवणागरी किरताना शास्त्री पंडीतांनी फार मोठी हातचलाखी केली कडूसकरांची वही नक्कल होती. त्यामुळे मुळ वह्या जीवंत राहिल्या. तुकारामांच्या वंशजाकडील वही व त्रिंबक कासाराची हास्ते लिखीते ही देवणागरी करण होताच हरवली. परंतू पंढरपूरला असलेली शिरवळकरांच्या कडील वही ही परंपरेची  होती ती जीवंत राहिली. यात ब्राह्मण चलाखी सिद्ध होते. अभंग नक्की कोणाचा हे ठरविण्याचे शाास्त्र आहे. यात त्या काळचे व्याकरण एैतिहासिक संदर्भ त्या संताची मंडनी पद्धत यावर तो अभंग प्रक्षिप्त का नाही हे ठरवता येते. आसे अभंग अनेक संतांच्या नावावर खपवले आहेत. संत तुकारामांच्या अभंगाचा शेवट हा तुका म्हणे आसाच त्यांनी केला आहे. परंतू त्यांच्या नावावर तुका बंधु किंवा सेवक तुक्याचा असे जे अभंग आहेत हे संत तुकारामांच्या नावावर खपवलेत हे म्हणावयास जागा निर्माण होते. हे सत्य जवळ ठेऊन आपण  महाराष्ट्र शासनाने सन १९९८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या श्री. तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा मधील अभंग क्र. ३०३५ हा जरी सेवक तुक्याचा या नावाने शेवट केला असला आणि अभंग तुकारामांचा आहे का नाही याला शंका असली तरी या अभंगात सेवक तुक्यचा याने त्या काळातील सामाजीक व्यवस्थेची चिरफाट केली आहे. आशी सामाजीक व्यवस्था विठ्ठलाला सामोरे ठेऊन झीडकारण्याची तुकाराम सेवकांच्यात आणि संत संताजी याला अपवाद नव्हतो.

सिद्धीचा दास नव्हे श्रृतीचा अंकिला |  होईन विठ्ठला सर्व तुझा ॥

    संत संताजींच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ब्राम्हण्य हे सिद्धाी, श्रृती, पुराणे पायावर उभे आहे. या तुमच्या पायाचा मी बांधाीला नाही. आमच्या जवळ सतत सुख आहे. ते आहे म्हणून तुम्ही आमचा नाश करू शकत नाही. तुमच्या मुक्ती पेक्षा मला पांडूरंगाची भक्ती मोठी वाटतो. कारण माझ्या मनात पांडूरंग आहे. त्यामुळे दुसरे विचार मी ही मनात येऊ देत नाही तुम्ही ही येऊ देऊ नका संत संताजींच्या जीवनातली ही एक ठेवण  संत तुकारामांच्या संगतीत याला बाळसे आले. सत्य असत्याचा निवाडा करण्याचा अधीकार त्यांनी मिळवला गुन्हेगार असलेल्या ब्राह्मणाने जेंव्हा संत तुकारामांना शिक्षा ठोठवली तेंव्हा पहिला प्रश्न संताजींना पडला आरे गुन्हेगार कोण ? गुन्हेगार हे ब्राह्मण्य आम्ही आरोप कुणावर करतोय या ब्राह्मण्यावर सत्य असत्य नेमके काय आहे. हे आम्ही मांडतोय मग आशावेळी ब्राह्मण्याच ब्राह्मण्य न्यायालयात तुकारामांना आरोप ठरवत आहे. शिक्षा जाहिर करण्याचा अधीकार आरोपीला नसतो. कारण आरोप करणारे ब्राह्मण्य, न्यायाधीश ब्रह्मण्य. या विरोधात जर प्रथम कोण उभे असेल तर ते संत संताजी शेकडो वर्षाचे बा्रह्मण्याचे पायदळी तुडवले असेल तर ते संत संताजींनी. ते तुडवले म्हणुन ब्राह्मणाच्या तावडीतुन तेली, माळी, परिट, लोहार, मातंग, महार, शिंपी, कुणबी आशा जाती मुक्त झाल्या. या साठी प्रथम संताजींनी तुकारामांना दिलेली शिक्षा समजुन घेतली. स्वत:कडील अभंग उतरून काढले. जनमानसातील अभंग गोळा केले. ब्राह्मण्याने त्रासलेले लोक गोळा केले. आणि संघटीत पणे तुकारामा जवळ गेले. अभंगाच्या वह्या दिल्या आणि संत तुकारामांचे बहिषकृत पण नष्ट केले. ही एैतिहासीक घटना घडविण्याची ताकद संत संताजींची होती आणि ती त्यांनी सिद्ध ही केली. ती केली म्हणून रामेश्वर भट, आप्पा गोसावी, मंबाजी यांचे गड कोसळले. त्यांची हुकमत दादागीरी, अतीरेकीपणा लबाडी उध्वस्त झाली. ती झाली म्हणुन सरळ सरळ शरण येऊन रामेश्वर भटाने संत तुकारामांना आपले मानले. आपले पण किती वरून व किती आतुन खोटे पणा होता हे ही काही दिवसात स्पष्ट झाले. कारण धुळवडीच्या दिवशी संत तुकारामांचे जाणे. पुष्पकयानाची लोणकडी पसरवणे व भविष्यात संत संताजींना संदर्भ हीन ठेवणे. यात स्पष्ट होते. १८६० मध्ये बाजूला ठेवणे विल. भावे यांनी संत संताजींच्या वह्यांचे देवनागरी करण केले.  म्हणून त्यांना संधी मिळेल तेंव्हा फटकारणे. ही खरी ब्राह्मणांची पोटतिडीक आपण निदान समजुन तरी घेऊ.

जय संताजी |

दिनांक 12-07-2015 15:37:10
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in