रविवार दि.७ जुलै २०१९ पुणे जिल्ह्यातील नंदनवन समजल्या जाणाऱ्या छोटे काश्मीर म्हणून एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा मावळ तालुका येथील तळेगाव दाभाडे मधील गजबजलेल्या वस्तीतील नाना नानी पार्क सभागृहात मावळ तालुका तैलिक महासभेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले.मावळ तालुका तैलिक महासभेचे अध्यक्ष श्री. राजेश राऊत यांनी प्रास्ताविक केले व मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान पुणे जिल्हा तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री.चंद्रकांतशेठ वाव्हळ यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिलभरतीय केंद्रीय शिक्षण समितीचे सदस्य व राष्ट्रपती पुरस्कार भूषविणारे,शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणारे पुणे येथील एम आय टि कॉलेजचे प्रा.दिलीपजी फलटणकर, सर, तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या विधिमान्य नगराध्यक्षा सौ.चित्राताई जगनाडे,व पुणे जिल्हा तैलिक महासभेच्या विभागीय महिला आघाडी अध्यक्षा सौ.सुनीताताई वाव्हळ हे होते.
नगराध्यक्षा सौ.चित्राताई जगनाडे आपल्या शैलीतून मुलांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे कधी जात,धर्म हे पाहात नाही त्या करिता सर्वांनी मन लावून अभ्यास करा व चांगले यश संपादित करा.तसेच पुणे विभागीय महिला आघाडी अध्यक्षा प्रा.सुनीताताई वाव्हळ यांनी सर्व पालकांना कळकळीची विनंती करून सांगताना आपण टिव्ही,मोबाईल यामध्ये लक्ष न देता मुलांशी जास्तीत जास्त संवाद साधा त्याच्या आवडी नुसार शिक्षण घेऊद्या व पालकांनी त्याना प्रोत्साहन द्या,प्रा.दिलीपजी फलटणकर सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सांगतांना दहावी/बारावी नंतर मुलांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय आहे आणि त्यानंतर पुढेजाऊन काय प्रॉब्लेम येतात आणि काय परिस्थिती निर्माण होते त्यासाठी मुलांनी काय करावे व पालकांनी आपल्या मुलांना कसे समजून घ्यायला पाहिजे हे आपल्या मार्गदर्शन भाषणातून खुप सुरेख मनोगत व्यक्त केले. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे प्रा.दिलीपजी फलटणकर,सर हे जवळ जवळ एक ते सव्वा तास बोलत होते पण ना मुले किंवा ना पालक जागेवरून हलले नाहीत सर्वजण मनलावून आयकत होते.
त्या नंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पुणे जिल्हा तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण आपल्या क्षेत्रात आवर्जून खुप चांगले यक्ष संपादन करा पण त्याच बरोबर आपल्या समाज्याला विसरू नका व समाज्याला पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या येणाऱ्या युवा पिढीवर आहे.
कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील तैलिक महासभेचे उत्तरपुणे जिल्हा अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर दुर्गुडे, पुणे विभागीय उपाध्यक्ष श्री. दिलीपजी शिंदे, श्री.सतिषजी दळवी, पुणे विभागीय महिला आघाडी कार्याध्यक्षा सौ.सुलोचनाताई कर्डिले, सचिव सौ.निलमताई घाटकर, उत्तरपुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा सौ. जयश्रीताई देशमाने,शिरूर तालुका अध्यक्ष श्री. गणपतराव लोखंडे, मावळ तालुका रा.कॉ.महिला आघाडी अध्यक्षा सौ. सुवर्णाताई राऊत, माजी नगराध्यक्षा मिराताई फल्ले,आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या कार्यक्रमासाठी दहावी/बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी श्री. संतोषजी पन्हाळे,सर व श्री. नवनाथजी दिवटे,सर यांच्या वतीने देण्यात आल्या आहे.मावळ तालुका तेली समाजाच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच अल्पउपहाराची वेवस्ता श्री. प्रदिपजी टेकवडे, श्री. संजयजी कसाबी,श्री. सुजित लोखंडे यांच्या वतीने करण्यात आली होती.तर कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. हनुमंत राऊत यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मावळ तालुका सचिव श्री. सुनील शेडगे यांनी केले,तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष श्री. दत्ता वाल्हेकर व उपाध्यक्ष श्री.प्रविण शेडगे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तरपुणे जिल्हा अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे,तालुका अध्यक्ष श्री. राजेश राऊत,महिला आघाडी अध्यक्षा सौ.शालिनीताई झागडे,सचिव श्री. सुनील शेडगे,कार्याध्यक्ष श्री.दत्ता वाल्हेकर, खजिनदार श्री.जयंत राऊत,उपाध्यक्ष श्री.प्रदिपशेठ टेकवडे, श्री. संजय कसाबी,श्री.शंकरराव कटके,श्री. संतोष कटके,श्री. प्रवीण शेडगे,जेष्ठ मार्गदर्शक श्री. भिकाजी भागवत,श्री.प्रकाश वालझाडे, प्रसिद्धी प्रमुख श्री.सुजित लोखंडे यांनी परिश्रम घेतले.