ब्राह्मणी पणाचा हा एक मतलबी पणा समोर आला. सत्य झाकून आपले मोठे पण मिरवणे इतरांना मुठीत ठेवणे ही यांची एैतिहासिक पंरपरा. ज्ञानेश्वरांनी जी आळंदी येथे समाधी आहे. बिंबवले आहे तेथे आज ही भोजलिंग काका यांची समाधी आहे. ते ज्ञानेश्वरांचे पालनकर्ते सांगतात पण भोजलींग काका व्यवसायाने सुतार होते हे बिंबवतात. त्या काळी सुतारच सुतारकी करित होते. ही वास्तवता आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, विज्ञानेश्वर व महानुभवी ज्ञानेश्वर असे चार ज्ञानेश्वर होऊन गेले. आहेत. यावर ही बाबत मी नंतर लेखन करील परंतु संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधी नंतर शेकडो वर्षानी जी ज्ञानेश्वरी शुद्ध केली हे बिंबवले आहे ते बिंबवताना स्वप्नाची घटना सांगीतले जाते परंतु सत्य या पेक्षा समोर आले. ते सत्य ही बाजूला ठेवले कारण मुळ ज्ञानेश्वरीची हस्तलिखीते एकनाथांना पैठण येथील एका तेली बांधवांनी दिली हा पुरावा सापडला.
सन १९०० च्या दरम्यान शेवगांव जि. अ. नगर येथिल शिवराम एकनाथ भारदे उर्फ भारद्वाज या अभ्यासू व्यक्तीने त्या वेळच्या सुधारक या नावाच्या वर्तमान पत्रात ज्ञानदेव व ज्ञानेश्वर हे वेगळे कसे या बाबत लेखमाला लिहिली आहे. त्यांच्या मृत्यू नंतर १९३१ मध्ये अकोळनेर, जि. नगर येथील गंगाधर गणेश दाभोळकर यांनी भारदे यांची लेखमाला पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. त्यातील हा भाग पहा.
एकनाथाच्या हाती ज्ञानेश्वरी पडण्यापुर्वी तो भागवताच्या एकादशस्कंदावर स्वत: लिहिलेल्या टीकेचे व भावार्थरामायणाचे पुराण सांगत असे. त्याच्या पुराणास येणार्या मंडळीत एक तेली होता. त्याने एक दिवशी ज्ञानेश्वरीची जुनी पोथी एकनाथाकडे आणली आणि म्हणाला. ’महाराज, ही एक पोथी माझ्या घरात फार दिवस पडली आहे, हिचा आपल्यास काही उपयोग झाल्यास पहा. ब्रह्मज्ञानाने ओतप्रोत भरलेला तो ग्रंथ पाहून एकनाथास फारच आनंद झाला. पुसत आलेल्या त्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करण्याच्या हेतूने एकनाथाने त्याची एक नवीन प्रत तयार केली. पण या नव्या प्रतीतत्याने मनास वाटेल तसा फेरफार केला ! नंतर लवकरच त्याने स्वरचित ग्रंथास फाटा देऊन, ज्ञानेश्वरीचेच पुरणा सांगण्यास प्रारंभ केला. इकडे पैठणात एकनाथाच्या वेळी मौलाना म्हणुन एक वृद्ध अवलिया होता. तो जातीचा यवन खरा, पण मोठा विरक्त व ज्ञानी असल्यामुळे पुष्कळ ब्राह्मणमंडळी देखील त्याच्या दर्शनास जात असत. एकदां कोणाी एकाने त्यास शालजोडी पांघरू घातली. पण हा अवलिया
चातुर्य लपवी ॥महत्त्व हारवी ॥पिसेपण मिरवी ॥आवडोनी ॥
या कोटीतील असल्यामुळे त्या शालीस मध्ये मध्ये मोठाले भोकसे पाडून तेथे रकट्याची ठिगळे देणाचा त्याने नित्यक्रम ठेविला ! एके दिवशी त्याचे हे ठिंगळे देण्याचे काम चालले असता काही गृहस्थ नित्याप्रमाणे त्याच्या दर्शनास आले, त्यांत एकनाथ होता. हा त्या अवलिया विक्षिप्तपणा पाहून एकाने त्यास विचारले, ’महाराज, हे आपण काय करिता ?’ त्याने उत्तर दिले, ’ज्ञानेश्वर महाराजाने रचलेल्या उत्कृष्ट ग्रंथात फेरफार करून एकनाथ नावाच्या एका ब्राह्मणाने नवीन ग्रंथ तयार केला आहे, त्याचे स्वरूप मी नीटसे ध्यानात आणीत आहे !’
ही वास्तवता लपवून एका तेली बांधवाने जपलेली खरी ज्ञानेश्वरी संत एकनाथांनी ज्या पद्धतीने बदलली ते स्पष्ट होते. दु:ख या गोष्टीचे वाटते सदा सर्वकाळ ब्राह्मण्य हे सावध आसते. ते हुशारीने, गोडबोलुन, दडपशाहीने खरे दडवून आपल्या सोईचे खोटे पण खरे म्हणुन बिबवत आसते याचा हा एक नमुना सांगीतला. एका स्वतंत्र लेखात मी अधीक खरे स्वरूप मांडत आहेच.