तेली समाजातील महान विभुती (भाग 4) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
सातारा जिल्ह्यातील आरफळ गावी राऊत घराण्यात काळोजी महाराजांचा जन्म झाला. एके दिवशी ते घराबाहेर पडले आणि जरंडेश्वराच्या डोंगरावर जाऊन मारूतीची उपासना करू लागले. झाडपाला खाऊ न त्यांनी 12 वर्षे उपासना केली. आश्चर्य म्हणजे या काळात महाराजांना 3 इंच लांबीचे पुच्छ फुटले. जरंडेश्वरावर यांनी मारूतीचे भव्य मंदिर बांधले आणि त्यासमोर जिवंत समाधी घेतली हा दिवस होता सोमवार दिनांक 18/10/1887. ग्रामस्थांनी महाराजांची समाधी आणि मंडप उभारला. दरवर्षी समाधीच्या दिवशी तेथे फार मोठा उत्सव होतो.