तेली समाजातील महान विभुती (भाग 7) -
सौ. अरूणा इंगवले, अध्यक्ष चिपळूण तालुका तेली समाज महिला आघाडी
मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार पन्हाळा किल्ला पेशवाईत ओस पडला. गडावर नवनाथांपैकी गहिनाथांनी काही दिवस वास्तव्य केले. ते ठिकाणही ओस पडले. एके दिवशी गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य विश्वनाथ फल्ले यांच्या स्वप्नात येऊन त्यांना गडावर जाण्याची आज्ञा दिली. विश्वनाथ फल्ले कसलाही विचार न करता संसाराचा त्याग करून गडावर आले. गहिनाथांच्या पादूकांची पुनर्स्थापना केली. मंदिराची डागडुजी केली आणि ध्यानाला बसले. लोकांची रिघ हळूहळू गडावर वाढू लागली. फल्ले महाराज ज्या दगडाला नाथांची गादी म्हणून पूजीत असत तिथे भाविकांनी मोठे मंदिर उभारले. त्यांच्या आशीर्वादाने लोकांची कामे होऊ लागली. विभूतीने आजार पळू लागले आणि फल्ले महाराजांची किर्ती दूरवर पसरली. आज स्वामी विश्वनाथ फल्ले यांचा फार मोठा शिष्यपरिवार आहे.